मध्यरात्री लागलेल्या भुकेतून 'फूड्रॉल'ची स्थापना

0

मध्यरात्रीच्या सुमारास पोटात लागलेली भूक आणि उपहारगृहांच्या तोकड्या सेवा यातून दिल्लीस्थित फूड्रॉलचा जन्म झाला, ज्यात पंचतारांकीत उपहारगृहातील खाद्य तुमच्या दरवाजापर्यंत येणे शक्य झाले. 

२०१५च्या प्रारंभीचा तो काळ होता, २१ वर्षाचे तन्मय गर्ग आणि त्यांच्या मित्रांना मध्यरात्री भूक लागली होती. त्यामुळे कुणीही करेल तेच त्यांनी केले. त्यांनी ऑनलाईनवरून जवेणाची ऑर्डर दिली. मात्र त्याच्या दुर्दैवाने हे जेवण मिळायला रात्रीचे दोन वाजले, आणि त्यावर ताण म्हणजे जी ऑर्डर दिली होती ते हे जेवणच नव्हते. तन्मय सांगतात,

“ आम्ही शाकाहारी जेवण मागविले होते, आणि आम्हाला मिळाले ते मांसाहारी. आम्ही ते परत पाठविले आणि उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला आमच्या भावना कळविल्या तर त्याने उलट प्रश्न केला की- ‘ तुम्हाला इतके सारे समजते तर स्वत:चा व्यवसाय का करत नाही?’”.

जास्त काही न बोलता तन्मय यांनी त्यांच्या बोलण्याला विचार म्हणून घेतले, आणि ‘फूड्रॉल’ हा एक असा ऑनलाईन मंच स्थापित केला जो मध्यरात्रीनंतरही भूक लागल्यास चांगले जेवण देवू शकेल. फूड्रॉल हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डिस्ट्रीब्युशन करणारा दिल्लीतील मंच आहे, ज्यात पंचतारांकीत हॉटेल पासून साधारण उपहारगृहातील जेवणाची मागणी देखील करता येते, जे १२ किमीच्या परिघात डिस्ट्रीब्युट केले जाते.


टीम फूड्रॉल
टीम फूड्रॉल

मंचाच्या कामकाजाची पध्दत

तन्मय सांगतात की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असलेला मार्केटिंग स्टाफ त्यांची जमेची बाजू आहे. तयार केलेले अन्न विशिष्ट कॅरीबॅग्ज मधून दिले जाते, ज्यातून अन्न अर्धा ते एक तास गरम राहते. “ आमच्याकडे गरम पदार्थ वितरीत करण्यासाठी खास व्यवस्था आहे, त्यामुळे थंडीच्या डिंसेंबर महिन्यातही गरम जवेण मिळू शकते” तन्मय सांगतात.

उपहारगृहांच्या वतीने देखील फूड्रॉल मागणी पूरविते, त्यावर त्यांचा रेव्हेन्यू स्टॅम्प लावून. अशा प्रकारच्या स्टार्टअपच्या माध्यमातून उपहारगृहांना देखील ग्राहकांपर्यत पोहोचता येते. फूड्रॉल त्याच्या मागण्या वेळेत पूर्ण करते. असे असले तरी चमूला सुरूवातीला त्यांच्या मालकांसाठी जेवण वेळेत पोहोचवणे कठीण होते. या शिवाय, हॉटेल आणि उपहारगृहांना निवडण्यासाठी बाजारातील प्रस्थापितांमधून निवडणे देखील कठीण होते.

अन्नाचे स्थान

सुरूवातीला, फूड्रॉल हे केवळ दोन किंवा तीन जणांच्या मदतीने चालविले जात होते, त्यात संकेतस्थळाला हाताळण्यापासून त्यांच्या तांत्रिक बाबी विकसित करण्यापर्यंतच्या सा-या गोष्टी होत्या.

देशातील ऑनलाईन अन्न बाजारपेठ विस्तारत आहे, आणि त्यात आणखी वाढ होणार आहे. या महिन्यात ‘उबेर इटस’ भारतात सुरू झाले आहे. त्यांचे नवे स्पर्धक आहेत स्विगी. त्यांना मोफत डिस्ट्रीब्युशन सेवा सुरू करण्याची गरजच भासली नाही. त्यांनी प्रत्येक डिस्ट्रीब्युशनला १५ रूपये आकारण्यास सुरूवात केली. उबेरने या बाजारपेठेत उशिराने सुरूवात केली त्यामुळे त्यांनी सवलत देण्यास सुरुवात केली, जेणे करून त्यांना संधी मिळेल. असे असले तरी ही सेवा सध्या केवळ मुंबईत आहे. लवकरच ते भारतभर ती विस्तारत आहेत.

येथे बाजारात अग्रस्थानी आहे स्विगी, ज्यांनी नुकतीच गंभीरपणे सिरीज डी- फंडिंग निधीची उभारणी केली आहे. आणि अगदी त्यांचे इंटरनेट किचन बंगळुरूच्या कोरामंगल भागात सुरू देखील झाले. उबेरइटला मागे टाकण्याचा त्यांचा मानस काही लपून राहिलेला नाही. अन्न वितरण बाजारात नेहमीच चढ-उतार येत असतात. आणि जरी गुंतवणूकदार याबाबतीत हात लावण्यात चोखंदळ असतात तरीही अनेकजण यात उतरले आहेत. तरीही अन्न हा कठीण व्यवसाय आहे, ज्यात त्याच्या पाकक्रिया आणि त्यांचे योग्य डीस्ट्रीब्यूशन महत्वाचे असते.

भवितव्य

यामध्ये अन्य सहभागीदार आहेत ते आहेत इंटरनेट उपहारगृह, ‘फ्रेश मेन्यू’ आणि ‘इनरशेफ’. यातील काही स्टार्टअपचे भवितव्य उज्वल आहे. त्यात यांचा विसर पडता कामा नये, त्यात टिनीओल, डाझो, आणि स्पूनजॉय यांनी जिद्दीने वाटचाल केली आहे. यातील अर्थकारणात पाहिले असता ३.५ दशलक्ष डॉलर्स ३८० गुप्त व्यवहारातून २०१५ च्या पहिल्या सहामाहीत गुंतविण्यात आले आहेत, मात्र २०१६ मध्ये पाहिले असता यांतील गुंतवणूक काहीशी खालावली असून ती ८० दशलक्ष डॉलर्स झाली आहे असे रेडसिअरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बंद आणि अडचणी यातून पुढे जात ऑनलाइन अन्न वितरण बाजारपेठ मागील वर्षात १५० टक्के वाढली असे मानले जाते. जो अहवाल आला आहे त्यात ही वाढ ३०० दशलक्ष डॉलर्स इतकी दाखवली आहे.

तन्मय यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे, जे तत्परतेने सांगतात की, इतरांपेक्षा ते वेगळे आहेत, ते म्हणतात की फूड्रॉल प्रत्येक उपहारगृहाशी सामंजस्य करार करू शकत नाही, त्यामुळे किमतीच्या दृष्टीने उपहारगृह पाहताना ते महसूलाकडे पाहूनच योग्य त्या उपहारगृहांची नोंदणी घेतात. “ दुसरे म्हणजे, आम्ही आमच्या स्वत:च्या मागण्याही पुरवतो, शिवाय इतरांच्याही त्यामुळे उपहारगृहांच्या ग्राहकांना आमचे ग्राहक बनविणे ही शक्य आहे. आम्हाला हे माहिती आहे की आम्ही केवळ जेवण बनवित नाही तर त्याचे वितरण मध्यरात्रीनंतरही योग्य वेळात करतो, त्यामुळे आम्हाला ते घेवून जाणा-या सहका-यांचाही विचार करावा लागतो. आमचे काही स्पर्धक डीस्ट्रीब्यूशन करत नाहीत, किंवा त्यांचे डीस्ट्रीब्यूशन इतरांना सोपवितात, तर काही उपहारगृहांच्या मागण्याचे डीस्ट्रीब्यूशनचे काम त्यांच्या मंचामार्फत पाहतात ” तन्मय सांगतात.

फूड्रॉलच्या चमूचा दावा आहे की, त्यांच्या महसूलात मागील वर्षाच्या तुलनेत सहा पट वाढ झाली आहे, आणि हा विक्रम देखील ते येत्या सहा महिन्यात ओलांडून जातील. लवकरच अन्य शहरातही ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यात मुंबईतही सुरूवात करण्यात येणार आहे.

वेबसाईट

लेखिका : सिंधू काश्यप