ऑस्करच्या माध्यमातून फ्रिडा पिंटो यांनी आठशे भुकेल्यांना अन्नदान केले!

0

सेलिब्रीटीजना ऑस्कर ही चांगले कपडे घालून मिरवण्याची आणि लाल कारपेटवरून चालत त्या वर्षीच्या त्यांच्या सिनेमांची प्रसिध्दी मिळवण्याची चांगली संधी असते. त्यामुळे फ्रिडा पिंटो यांनी देखील हेच करत असतानाही आणखी एक जबाबदारी सामाजिक बांधिलकीमधून स्विकारली. शिकागो मधील सेवाभावी संस्था कॉपिया सोबत त्यांनी हे पाहिले की, मेजवानीनंतर शिल्लक राहिलेल्या अन्नाचा विनीयोग लॉस एंजिलीस मधील गरजूंना होईल.


दरवर्षी येथे ऑस्करमध्ये मोठ्या प्रमाणात अन्न न खाताच सोडले जाते. या वर्षी देखील तसेच झाले, येथे उच्च प्रतिच्या अन्नाची मेजवानी देण्यासाठी जगातील सर्वोत्तम शेफ वुल्फगँग पूक यांना गवर्नर बॉल्स मेजवानीला आमंत्रित करण्यात आले होते. या भरगच्च आणि स्वादिष्ट मेजवानीत गोल्डन बेक्ड पोटॅटो विथ कॅवियर, गोल्ड डस्टेड पॉपकॉर्न, आणि ऑस्करच्या आकाराचे मॅटजो क्रॅकर्स विथ स्मोक सॅलमोन,अशा खाद्य पदार्थांची रेलचेल होती. येथे तीन हजार प्रकारच्या फॅन्सी फूडची बरसात होती आणि यात आश्चर्यासारखे काहीच नाही की, येथे या सा-या उच्च प्रतिच्या मुबलक अन्नाची नासाडी देखील स्वाभाविक होती.

अन्नाची नासाडी होवू नये यासाठी आणि या निमित्ताने समाजाला काही देण्याच्या कल्पनेतून फ्रिडा यांनी कोपिया सोबत सहभागिता केली. त्यांच्याशी बातचित करताना त्यांनी सांगितले की, “ आमचा हेतू हा असतो की,  कुणीही उपाशी राहू नये, त्यामुळे शिल्लक राहिलेले अन्न पोहोचवून आम्ही तेच साध्य करतो”. याबाबत त्यांनी त्यांच्या समूह संपर्क माध्यमातील इंस्टाग्रामच्या पोस्टमध्य़ेही नमूद केले आहे.

फ्रिडा यांनी हॉलिवूड मध्ये ऑस्कर विजेत्या स्लमडॉग मिलीयनेर मधून लोकप्रियता मिळवली आहे आणि त्यानंतरही त्यांनी अनेकानेक सिनेमातून भूमिका केल्या आहेत. या शिवाय त्यांनी त्यांचा वेळ सामाजिक आणि मानवतावादी कार्यासाठी देखील दिला आहे, इतर महत्वाच्या सेलिब्रिटीज ऍंजेलिना जोली, आणि मलाला युसूफजई प्रमाणे त्या देखील उच्च प्रेरणांनी हे कार्य करतात. फ्रिडा यांच्या सारख्या ‘स्टारडम’ मिळवलेल्या व्यक्ती ज्यावेळी हे करतात त्यावेळी ते ह्रदयला स्पर्श करते, ज्या लोकांसाठी काही करण्याची इच्छा ठेवतात; यासारखे दुसरे भाग्य काय असायला हवे ?  (थिंक चेंज इंडिया)