लाखो झाडे वाचविण्यासाठी बिहारच्या महिला कशा मधुबनी पेंटींग्जचा वापर करत आहेत?

लाखो झाडे वाचविण्यासाठी बिहारच्या महिला कशा मधुबनी पेंटींग्जचा वापर करत आहेत?

Saturday December 17, 2016,

2 min Read


ज्यावेळी देशभरातील जनता हवेच्या प्रदुषणाच्या समस्येमुळे चिंतीत झाली आहे, बिहार मधील मधुबनी मधील महिला आणि मुली त्यांच्या वेगळ्या पध्दतीने या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे, कलेच्या माध्यमातून या प्रश्नाशी लढा देण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय असू शकतो.

उत्तरी बिहारमधील या गर्द हिरव्या परिसराचा इतिहास जाणला जातो तो मधुबनी चित्रकारीसाठी. मागील काही वर्षांपासून, या भागात बेसुमार जंगलतोड झाली आणि त्यातून हरित आच्छादन नष्ट होत गेले. या सर्वाचा मुकाबला करण्यासाठी येथील महिला आणि मुलींनी त्यांच्या पारंपारीक कलांच्या माध्यमातून हजारो झाडांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न सुरु केला.

image


तीन वर्षापूर्वी सुरु झालेल्या या उपक्रमातून या महिलांनी झाडांवर चित्रकला करण्यास सुरुवात केली आहे, आज सुमारे पाच किलोमिटर परिसरातील झाडांना या चित्रकारीने वेढले आहे. त्यांच्यावर मधुबनी चित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे ही झाडे पर्यटक आणि येणा-या जाणा-यांच्या दृष्टीने आकर्षणाची केंद्र झाली आहेत. 

एका अहवालानुसार, महिलांनी देवीदेवता यांची चित्र काढली आहेत, त्यामुळे रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडांना रामपट्टी आणि राजनगर भागात संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे ही झाडे कुणी तोडणार नाही. या झाडांचे बुंधे आधी लिंबाने रंगविले जातात, त्यातून या झाडांचे किटकांपासून रक्षण होते, पांढ-या रंगाच्या लोंबाच्या पार्श्वभुमीवर या महिला आणि मुली मग राम, कृष्ण, सीता बुध्द आणि महावीर यांची चित्र रेखाटून रंगवितात. याशिवाय इतरही अनेक देवी देवतांचा त्यात समावेश असतो, त्यामुळे या झाडांना मंदिरांचा दर्जा मिळतो आणि ती तोडण्यापासून वाचवली जातात.  

सौजन्य : थिंक चेंज इंडिया