'कन्टेट'ची कमतरता भासू देणार नाही, ‘आयव्हीक्लिक’चा दावा

'कन्टेट'ची कमतरता भासू देणार नाही, ‘आयव्हीक्लिक’चा दावा

Thursday November 19, 2015,

4 min Read

न्यूयॉर्कमध्ये ‘गुंतवणूक बँकर’ असलेले अंजन पुरंदरे एकदा आपले नेहमीचे १७-१८ तासाचे काम संपवून घरी परतले. आपल्या दहा वर्षांच्या मुलीला देखील ते ओळखू शकले नाहीत, इतके ते त्या दिवशी थकले होते. ही स्थिती लक्षात आल्याने त्यांनी निर्णय घेतला, की यापुढे आपण आपले आयुष्य अशा प्रकारे कदापि जगायचे नाही.

अंजन सांगतात, “ जणू काही मी एक्सेल शीटमध्येच गुंतून गेलो आहे असे मला जाणवले. मला लक्षात आले, की एखाद्या मशीन प्रमाणे मी काम करत माझ्या आयुष्यात येणा-या छोट्या छोट्या आनंदांच्या क्षणांना देखील मुकत आहे.” आणि इथे ते ज्यावर प्रेम करत होते अशा गोष्टी करण्याची संधी त्यांच्याकडे होती. चित्रपटांसाठी स्क्रिप्ट रायटिंग करण्याचा प्रयत्न करून त्यांना स्वत:मधील प्रतिभा तपासून बघायची होती. परंतु, ‘फ्लिपबोर्ड’ सारखा ‘ऑनलाईन कंटेट बँके’ची संकल्पना त्यांच्यासाठी व्यवसायातील यशाच्या दृष्टीने योग्य ठरेल असे त्यांना जाणवले. आणि इथूनच मग ‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) ची सुरूवात झाली.


image


भूतकाळाच्या झरोक्यातून

त्यांच्या कारकिर्दीच्या दृष्टीने विचार करता अंजन हे फायनान्स मधील किडा होते. आपली स्टार्टअप कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी मोठा काळ रिलायन्स, डॉईच बँक, आयसीआयसीआय बँकेसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक व्यवस्थापक ( Investment Manager) म्हणून घालवला. २०१३ मध्ये अमेरिकेहून परतल्यानंतर त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैद्राबाद इथे एमबीएसाठी प्रवेश घेतला. अंजन हे स्वत:ला एक लेखक आणि चित्रपट निर्माते समजतात. जेव्हा केव्हा अंजन यांना वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा ते वाचनात तल्लीन होऊन जात असत.

युरेका क्षण

ऑनलाईन कंटेटची घुसळण केल्यानंतर या मजकुराचा स्तर खूपच वाईट आहे हे अंजन यांच्या लक्षात आले. लोकांना जिथे दर्जेदार मजकूर (प्रीमियम कंटेट) मिळू शकेल आणि त्यांना तो मजकूर तमाम सोशल व्यासपीठांवर शेअर करता येईल असे चॅनेल निर्माण करण्याचा निर्णय अंजन यांनी घेतला.

अंजन सांगतात, “ केवळ दर्जेदार मजकूरच (प्रीमियर कंटेट) नव्हे, तर मला सुद्धा मजकूर शेअर करण्याचीही संधी मिळेल अशा व्यासपीठाबाबत मी नेहमीच विचार केला. मजकूराबाबत फिडबॅकच्या आधारे मी पुढचा एखादा निर्णय घेऊ शकेन असाही माझा हेतू होता. लोक आजकाल हे काम सिंपल ब्लॉग्जद्वारे करतात. परंतु मी एकाच छताखाली बसून सर्व काही करू इच्छित होतो.”

आयएसबीमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याबरोबर अंजन यांनी आपल्या या संकल्पनेवर काम करायला सुरू केले. ‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये लॉंचिंगसाठी तयार होते.

काय आहे हे ‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) ?

‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) हे तीन प्रकारचा मजकूर असलेले व्यासपीठ आहे. एक म्हणजे इन-हाऊस लेखक किंवा ‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) डेस्कचे लिहिलेले लेख, दुसरा प्रकार म्हणजे सोशल मिडियाची ट्रेडिंग स्टोरीज आणि तिसरा उपयोगकर्त्यांनी लिहिलेला मजकूर.

‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) कडे ८० विषयांवरील मजकूर आहे, तर ‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) डेस्कवर २० लेखक आहेत. हे लेखक विविध विषयांवर दररोज २५ हून जास्त मजकूर तयार करण्याचे काम करतात.

या मजकूराव्यतिरिक्त या व्यासपीठावर काही मजेदार गोष्टीसुद्धा आहेत. ‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) वर एक ‘Create Playlist’ बटन सुद्धा आहे. याबाबत जेव्हा आम्ही अंजन यांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले, की उपयोगकर्त्यांसाठी हे खूपच उपयोगाचे आहे. प्लेलिस्टही ही परस्परांना जोडलेल्या अशा मजकूराचा संग्रह आहे, ज्यामुळे उपयोगकर्त्यांना आपली रूची आणि आवडीनुसार मजकूर वाचण्यामध्ये चांगली मदत होते. उपयोगकर्त्याला वाटले तर तो मजकूर सानुकूल (कस्टमाईज) करू शकतो. तो कागदपत्रे, पीपीटी, व्हिडिओ, फोटो अशा गोष्टी आपल्या प्लेलिस्टमध्ये सानुकूल करून घेऊ शकतो. हे मजकूर आणि ‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) चे इतर मजकूर सोशल मीडिया व्यासपीठावर शेअर केले जाऊ शकतात.

अंजन पुढे सांगतात, “ असे गृहित धरा, की तुम्ही एक अभिनेते आहात. तुम्ही आपल्या पोर्टफोलिओतील फोटो, स्वत:वर लिहिलेल्या बातम्या, लेख, वृत्तलेख, कथा आणि आपल्या यू-ट्यूब व्हिडिओ अशा गोष्टी अंतर्भूत करून आपली प्लेलिस्ट तयार करू शकता. यानंतर ही प्लेलिस्ट शेअर देखील केली जाऊ शकते. तुम्ही त्याचा एक सिंपल ब्लॉगर्स पेज सारखा देखील वापर करू शकता. शिवाय यात आपले मत नोंदवू शकता आणि ते शेअर देखील करू शकता.”

या व्यासपीठावर चॅट करण्यासाठी रिअल टाईम सिस्टम असलेले #clique सुद्धा आहे. याद्वारे कंपन्या आपल्या उत्पादनांबाबत फिडबॅक मिळवण्यासाठी ‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) च्या उपयोगकर्त्यांसोबत चॅट देखील करू शकतात.

‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) एक मोफत अँड्रॉईड अॅपच्या रुपात देखील उपलब्ध आहे. शिवाय यात एखाद्या बेबसाईटवर उपलब्ध असलेले सर्व प्रकारचे फंक्शन्स देखील उपलब्ध आहेत.

अत्युत्कृष्ट

अंजन यांच्यामते वेबसाईट्सवर जवळजवळ ७ हजार लेख आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये याला एक लाख लोकांनी पहिल्यांदा भेट दिली आहे. भेट देणारे अधिकतर लोक अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाचे आहेत. सोशल मीडियावर सुद्धा ही वेबसाईट खूप लोकप्रिय झालेली आहे. फेसबुकवर तिचे ४० हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अंजन सांगतात, “ सध्या कितीतरी मोठ्या कॉर्पोरेशनसोबत त्यांच्या वेबसाईटसाठी प्रीमियम मजकूर उपलब्ध करून देण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे.”

स्पर्धा

या क्षेत्रात असलेल्या स्पर्धेबाबत बोलताना अंजन सांगतात, “ आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी हा बहुतेक फ्लिपबोर्डच असेल. परंतु, आमच्या मुख्य यूएसपीमध्ये एक खूपच मोठा फरक आहे, आणि तो म्हणजे उपयोगकर्त्याने तयार केलेला मजकूर. फ्लिपबोर्ड आणि त्यासारख्या इतर व्यासपीठांवर मी माझ्या स्वत:च्या मजकूराला अपलोडही करू शकत नाही आणि शेअर देखील करू शकत नाही.”

भविष्यातील योजना

अंजन सांगतात, “ आम्ही कॉर्पोरेटला पेड कंटेंट सेवांच्या माध्यमातून टार्गेट करणार आहोत. आम्ही ‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) चा ग्रुप वर्कसाठी एक एज्युकेशन टूलच्या रूपात उपयोग करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आक्रमक मार्केटिंग मोहिम चालवण्याचीही योजना तयार करत आहोत.”

अंजन पुढे सांगतात की व्यक्तिगत उपयोगकर्त्याच्या दृष्टीने विचार करता ‘आयव्हीक्लिक’ ( Ivyclique) नेहमीच एक वापरासाठी मोफत ( free to use) व्यासपीठ राहणार आहे.



लेखक : अपर्णा घोष

अनुवाद : सुनील तांबे