तरूण अभियंत्याच्या दोन यशस्वी आय टी कंपन्यांची कहाणी!

0

अभिषेक नायक एक प्रतिभावंत तरुण आहे. ज्याच्याकडे यशस्वी होण्यासाठी सारे गुण आहेत. त्याच्याकडे आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत केवळ दोन यशस्वी कंपन्याचा शुभारंभाच केला नाही तर त्याच्या प्रतीभाशैलीचे महत्त्व साऱ्या जगाने मान्य केले आहे. त्याच्या या चरित्रात (गोष्टीत) दोन असे अध्याय जोडले आहेत ज्यातून त्याचं कार्यनैपुण्य आणि प्रतिभा यांची ओळख होते. पहिले ‘यश सेक्वाया-घरोघर’चे आणि दुसरे ‘क्लाईनो’चे!


अलिकडेच त्यांची दहा महिने जुनी कंपनी ‘क्लाईनो ‘ला बंगळुरूच्या ‘इजटेप’ने खरेदी केले आहे. त्याची पहिली कंपनी ‘सेक्वाया-घरोघर’च्या यशानंतर तिलादेखील ‘देलिव्हेरी’ नावाच्या कंपनीने खरेदी केली होती.

२०१३मध्ये 'घरोघर'च्या यशानंतर त्यांनी एका तांत्रिक उत्पादनावर काम सुरु केले. हे उत्पादन बँकांना ऑनलाइन अदाच्या विश्लेषणाद्वारे त्यांच्या ग्राहकांच्या खरेदीच्या रिती –पध्दती समजावण्यात मदत करते. ‘क्लाईनो’ची अश्याप्रकारची भारतातील ही पहिलीच सेवा सुविधा आहे. तर ‘क्लाईनो’ खरेदी करणा-या ‘इजटेप’ कंपनीने देशी तंत्रज्ञानातून असे उपकरण निर्माण केले आहे, जे ग्राहकांना इंटरनेटशिवाय देखील त्यांच्या कार्डाद्वारे खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करते. त्यासाठी केवळ मोबाईलफोनचे नेटवर्क आवश्यक असते. ‘इजटेप’ने पैसे अदा करण्याचा उपाय शोधला तर ‘क्लाईनो’ त्यांच्या विवरणाचे विश्लेषण करते.याचा सरळ अर्थ असा की, संभाव्य ग्राहकांना चांगला निर्णय घेण्याची संधी मिळते.

सुरुवातीला क्लाईनोकडे एकच ग्राहक होता. ‘रत्नाकर लिमीटेड बँक’ त्यासाठी क्लाईनो दिड लाख डेबीट आणि क्रेडिटकार्डधारकांसाठी त्यांच्या खरेदीपासून खरेदीबाबतच्या विचारापर्यंतचे विश्लेषण करण्याचे काम करत होती. अभिषेक यांनी सांगितले की, सहा महिन्यापासून ते एचडीएफसी बँकेसोबत प्रायोगिक तत्वावर हे काम करत आहेत. इतर बँकांशी देखील बोलणी सुरू आहेत.त्यांचे म्हणणे आहे की, मुल्यवर्धित सेवा क्षेत्रात अधिक उत्पन्न नाही. परंतू काहीकाळाने नफा वाढत जातो. क्लाईनो नफा क्षेत्रात इजटेप सोबत पुढील काही महिन्यात नविन उत्पादने आणण्याची योजना देखील तयार करत आहे.

घरोघर ते क्लाईनोपर्यंत:

घरोघरच्या देल्हीवरीकडून अधिग्रहणानंतर जुलै २०१३ मध्ये क्लाईनोच्या कामाची सुरूवात झाली.क्लाईनोने या क्षेत्रात पदार्पण केले त्यावेळी व्यवहारांच्या आकड्यांचे विश्लेषण करणारी ती एकमेव कंपनी होती.

क्लाईनोच्या दहा महिन्याच्या कामकाजातून मिळाली शिकवण:

अभिषेक आणि त्यांच्या चमूने दहा महिन्याच्या अनुभवातून खुप काही शिकले आहे.त्या दरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या एका बँकेसह अनेक विदेशी बँकाना संपर्क केला आहे. त्यांच्यामते बँकाना ही उत्पादने विकणे सोपे काम नव्हते. परंतू धैर्याने मेहनत केल्यास नक्कीच अपेक्षित परिणाम मिळतो. बँकासोबत या कामात नफा मिळण्यास वेळ लागतो. अभिषेक सांगतात की बँकासाठी हे तंत्रज्ञान विकसित करणे त्यांच्या चमूसाठी कठीण काम होते.

इजटेप सोबत जाण्याचा निर्णय:

इजटेपसोबत क्लाईनो जोडली गेल्याने दोन्ही कंपन्याना एकमेकांच्या वैशिष्ट्यांचा उपयोग झाला आहे. क्लाईनो खरेदी करण्याबाबत इजटेपचे सहसंस्थापक संजय स्वामी मानतात की, अभिषेकचा चमू ठोस 'रोडमँप'वर काम करतो. संजय आणि अभिषेक यांच्यातील समन्वय चांगला आहे. त्यामुळे दोन्ही चमू एकत्र मिळून चांगले काम करतात.संजय सांगतात की,त्यांच्याकडे ऑनलाइन व्यवहारांशिवाय इतर तंत्रज्ञान विकसित करण्याची योजना आहे.

क्लाईनो खरेदी करण्याचे कारण:

क्लाईनोचे यश आणि अभिषेकचे कार्यनैपुण्य हे त्यातील मुख्य आकर्षण होते. संजय सांगतात की इजटेप ग्राहकांना विशेष प्रकारच्या सेवा देते. तिच्या विस्तारासाठी ग्राहकांच्या खर्च करण्याच्या पध्दतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानुसार क्लाईनो बँकाना चांगले यश मिळऊन देत आहे. हा तर सोन्यालाच सुगंध म्हणावा लागेल की, संजय आणि अभिषेक एकमेकांना चांगले ओळखत होते आणि मिळुन काम करण्यासाठी उत्सुक होते.

अभिषेक हे मात्र सांगायला विसरत नाही की,क्लाईनोला इजटेपने तरूण सहका-यांमुळेच खरिदले आहे. क्लाईनोच्या संघातील सर्वात जास्त वयाचा सदस्य इजटेपच्या सर्वात कमी वयाच्या अभियंत्यापेक्षाही वयाने लहान आहे. परंतू तरीही क्लाईनोच्या संघाला नविन कंपनीत समाधानकारक पदे देण्यात आली आहेत.

क्लाइनोचे भविष्य:

अभिषेक इजटेपसोबत खुश आहेत. नव्या कंपनीत त्यांना संचालक (उत्पादने) हे पद देण्यात आले आहे.तर त्यांच्या चमूमधील दहा जणांना देखील चांगली पदे देण्यात आली आहेत.त्यांचे म्हणणे आहे की, ते आता निधीच्या चिंतेशिवाय कामात लक्ष देऊ शकतील आणि अधिक चांगली उत्पादने विकसित करतील.

आतापर्यत भारताच्या कुशल डॉक्टर्स आणि अभियत्यांच्या कामगिरीचा सन्मान झाला होता. परंतू आता एक असा तरूण व्यापारीवर्ग उदयास येत आहे जो तांत्रिकदृष्ट्या शिक्षित आहे आणि आपल्या प्रतिभेने नवनवीन मार्ग निर्माण करत आहे. त्यांचे विचार उच्चविचारांच्या कल्पनाना साद घालण्यास सक्षम आहेत. विशेष म्हणजे हे तरूण त्यांचा मार्ग आणि संधी स्वत:च तयार करत आहेत आणि यशही मिळवत आहेत.अभिषेक असाच तरूण आहे ज्याच्यासमोर उज्वल भवितव्याच्या संधी उपलब्ध आहेत.

working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte