मोहित वर्मा: ‘चिकनकारी’ कारागिरांचं आयुष्य सजवणारा कलाकार

कलाकुसरीला मोठी किंमत, पण कारागिराला शून्य. कलाकुसरीला मोठी प्रतिष्ठा, पण कारागिराला मान नाही. बरं टाळूवरचं लोणी खाणा-या दलाल वर्गानंही या पारंपारिक कला जतन करणा-या दुर्लभ कारागिरांना लुटलेलं. काम सोडलं तर खाण्याचे वांदे, आणि काम करूनही शोषण. इकडे आड तर तिकडे विहीर अशा अवस्थेत हे कारागीर सापडलेले. ‘चिकनकारी’ मध्ये काम करणा-या या कारागिरांचं दु:ख नेमकेपणानं जाणलं ते मोहित वर्मा या उमद्या आणि हुशार तरूणानं. ऐतिहासिक वारसा असलेल्या या कारागिरीला व्यावयायिक रूप देत एक उद्योग म्हणून मोहितनी या कलाकुसरीला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्यांचं शोषण थांबवलं, दलालांची साखळी तोडली, आणि त्यांना योग्य तो मोबदलाही मिळवून दिला. याहून महत्त्वाचं म्हणजे या कारागिरांना त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. मोहित वर्मांना हे शक्य कसं झालं हेच ही कथा सांगते.

0

ही कथा DBS बँकेनं प्रायोजित केलेल्या ‘पोर्ट्रेट्स ऑफ सिरीजचा’ एक भाग आहे.

मुघल सम्राट जहांगीर यांची पत्नी सम्राज्ञी नूरजहाँ हीनं चिकनकारी हा भरतकामाचा प्रकार सुरू केला असं म्हणतात. करायला कठीण असा हा भरतकाम कलेचा प्रकार केवळ भारतातच नाही, तर जगभर प्रसिद्ध आहे. मात्र इतर सर्व कारागिरांप्रमाणेच चिकनकारी भरतकाम करणा-या कारागिरांचं उत्पन्न मधल्यामध्ये दलालच गिळून टाकतात. या एका पण मोठ्या कारणामुळं या कारागिरांचं आयुष्य बिकट बनलंय.

थ्रेडक्राफ्ट इंडियाच्या माध्यमातून मोहित वर्मा यांनी कारागिरांच्या नेमक्या याच समस्येला हात घातलाय. या मेहनती कारागिरांना त्यांचा वाटा मिळावा आणि भरतकाम कलेच्या या ऐतिहासिक परंपरेचं जतन व्हावं या उद्देशानं मोहित वर्मांचा थ्रेडक्राफ्ट इंडिया हा उपक्रम या कारागिरांसोबत काम करतो.

कारागिरांच्या आयुष्यावर प्रगतीचं भरतकाम करणारा कलाकार
कारागिरांच्या आयुष्यावर प्रगतीचं भरतकाम करणारा कलाकार

सुरूवातीच्या दिवसातले अनुभव

नवाबांचं शहर अशी ओळख असलेल्या लखनऊ या शहरात मोहित वर्मांचा जन्म झाला. व्यावसायाची परंपरा लाभलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले. लहानपणापासूनच मोहित आपल्या कुटुंबाच्या पारंपारिक व्यावसायात चांगलेच पारंगत झाले होते. त्यांचे आजोबा सोनार होते आणि त्यांच्याकडे या व्यावसायातली डिप्लोमा पदवी होती. पण आपण जे काही करतो आहोत याचा त्यांना कधीही अभिमान वाटत नव्हता. त्याचप्रमाणं त्यांच्या अनेक काक्या, मावश्या आणि इतर स्त्रीया चिकनकारीच्या कामात गुंतलेल्या ते पाहत होते. पण त्यांना हे काम मनापासून आवडत नव्हते. या महिलांचं आणि रोहित वर्मांच्या आजोबांचं असच म्हणणं होतं, की चिकनकारीसारखं तुटपुंजी मिळकत देणारं कोणतं ही काम समाजात प्रतिष्ठेचं समजलं जात नाही किंवा समाजाच्या दृष्टीनं त्याला फार किंमतही नसते. याच विचारानं मोहितना अस्वस्थ करून सोडलं. या कारागिरांना योग्य ती प्रतिष्ठा मिळेल यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांनी आपल्या मनाशी पक्कं केलं.

मोहित वर्मांचं बालपण आणि सुरूवातीचे दिवस हे धडपडण्यात, यशाचे मार्ग शोधण्यात खर्ची झाले. त्यांचा तो काळ ‘ट्रायल अँड एरर्सनं’ भरलेला होता. शाळेत असताना त्यांना बॉक्सिंग आणि ज्युडो प्रकारांनी आकर्षित केलं होतं. ज्युडोमध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांच्या सैन्यदलात जाण्याच्या आवडीमुळं ते खेळाकडं वळले. शास्त्र शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी NDA ( नॅशनलस डिफेन्स अकॅडमी) मध्ये प्रवेश घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी परीक्षेची तयारी करता यावी म्हणून शिक्षणाचं एक वर्ष या परीक्षेच्या अभ्यासासाठी खर्ची घातलं. पण सैन्यदलात रूजू होऊन त्यांना हवं ते समाधानही मिळू शकलं नाही आणि त्याचं CA होण्याचं स्वप्न देखील ते पूर्ण करू शकले नाहीत. पण मोहित वर्मांनी हिम्मत सोडली नव्हती. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी काही केलं पाहिजे ही त्यांची इच्छा मात्र अधिक मजबूत झाली.

“मला पैसे कमवायचे होते, पण चांगल्या मार्गाने” - मोहित

B. COM. झाल्यानंतर ते IBM या कंपनीत रूजू झाले. ही लठ्ठ पगाराची नोकरी असली तरी आपण स्वत:चं काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना सतत वाटत होतं. मोहित म्हणतात, “ माझ्या डोक्यात हा किडा सतत वळवळायचा की आपल्याला स्वत:चं काहीतरी सुरू करून भरपूर पैसा कमवायचा आहे, पण तो चांगल्याच मार्गानं.” मोहित यांनी IBM मध्ये तीन वर्ष नोकरी केल्यानंतर ही चांगल्या पदाची नोकरी सोडून दिली. त्यानंतर ते गाझियाबादच्या IMT मधून MBAकरण्यासाठी गेले.

सामाजिक उद्योजकता क्षेत्रात उडी

गाझियाबादच्या IMT मधून MBAकरत असतानाच त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या ( TISS ) सामाजिक उद्योजकता कार्यक्रमाबाबत ऐकलं. समाजासाठी काहीतरी करावं, विशेषतः भरतकाम करणाऱ्या कारागिरांसाठी काही करावं या विचारानं मोहितना TISS च्या सामाजिक उद्योजकता कार्यक्रम अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त केलं.

TISS च्या प्लॅटिनम ज्युबली कार्यक्रमात मोहितनी सर्वात प्रथम ‘थ्रेडक्राफ्ट इंडिया’ ही आपली नवी संकल्पना सादर केली. इथेच एकप्रकारे या उपक्रमाची चाचणी झाली. संस्थेच्या परवानगीनं मोहित यांनी चिकनकारी च्या वस्तू विकण्यासाठी एक स्टॉल उभारला. त्यांनी स्वत: या वस्तू तयार केल्या नसल्या तरी या विक्रीतून त्यांनी चांगला नफा कमावला. यामुळं त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. या जोरावर मग त्यांनी भरतकाम केलेल्या वस्तू तयार करण्याचा कारखाना सुरू केला. आणि त्या उत्पादन युनिटला नाव दिलं ‘थ्रेडक्राफ्ट इंडिया’ .

कंपनीचं लखनऊमध्ये स्वत:चं युनिट आहे. या युनिटमध्ये भरतकाम करणा-या २५ कारागीर महिला काम करतात. शिवाय या महिलांवर देखरेख ठेवेल अशी एक सुपरवायझऱ महिलाही त्यांनी नेमली आहे. या कारागीर महिला युनिटमध्ये सुद्धा काम करू शकतात आणि घरी बसून सुद्धा काम करू शकतात असे दोन पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. थ्रेडक्राफ्ट हा ग्राहक आणि कारागिरांमधला दुवा आहे. ज्या प्रमाणात मागणी असते त्या प्रमाणात विणकामाचं कापड मागवण्यात येतं. त्यानंतर त्या कापडाला डाय केलं जातं, त्यांच्यावर छापकाम केल्यानंतर मग ते भरतकाम करण्यासाठी कारागिरांकडं सोपवलं जातं. भरतकाम केलेलं हे कापड मग धुलाईसाठी दिलं जातं. शेवटी, मग तयार झालेलं हे कापड पॅकिंग करून ग्राहकाकडं पाठवलं जातं.

भरतकाम करणा-या कारागिरांना दररोज निश्चित रक्कम दिली जाते. विशेष सांगायचं म्हणजे, कंपनी सुरू झाल्यानंतर अवघ्या पाचच महिन्यात कंपनींनं या कारागिरांचं उत्पन्न दुप्पट केलं आहे.

कारागिरांचं हे काम गुंतागुंतीचं असल्यानं त्यांच्यासाठी नियमितपणे मोफत नेत्र तपासणी शिबिरं आयोजित केली जातात. जर गरज असेल तर त्यांना चष्मे देखील पुरवले जातात. थ्रेडक्राफ्टच्या या प्रवासामध्ये DBS बँकेनं नेहमीच मदतीचा हात पुढं केला आहे.

समाजाला परत काहीतरी दिलं पाहिजे या भावनेनं DBS बँकेनं गेल्या तीन वर्षाच्या काळात तब्बल ३० उपक्रमांना मदत केली आहे. त्यांपैकी थ्रेडक्राफ्ट इंडिया ही एक कंपनी आहे. आशिया खंडामधल्या सामाजिक उद्योगांना सहकार्य करणं हाच DBS बँकेचा सामाजिक कर्तव्य पार पाडण्याच्या प्रयत्नांचा मुख्य गाभा आहे. भारतात DBS बँकेनं TISS शी भागीदारी केली आहे आणि या माध्यमातून त्यांनी SBS-TISS हा सामाजिक उद्योजकता कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ते केवळ फंडच उपलब्ध करून देत नाहीत, तर TISS च्या विविध नाविण्यपूर्ण उद्योजकांसाठी मार्गदर्शकाची भूमिका देखील पार पाडत आहेत. मोहित म्हणतात, की प्रत्येक नव्या उद्योगाला सुरूवातीला फंड उभारण्याचं मोठं आव्हान असतं, पण DBS बँकेच्या मदतीमुळं ते मोठ्या आर्थिक अडचणीतून सहीसलामत सुटू शकले.

सध्या थ्रेडक्राफ्ट इंडियाकडं बुटिक आणि निर्यातदार असे दोन प्रकारचे ग्राहक आहेत. कंपनीनं मुंबईतल्या काही बुटिक आणि निर्यातदारांसोबत सहकार्याचा करार केलेला आहे. बुटिककडून आलेल्या ऑर्डर्सवर कंपनीच्या युनिटमध्ये काम करणारे कारागीर काम करतात. आणि निर्यातदारांनी दिलेली ऑर्डर्सची कामं कंपनी काही विश्वासू दलालांकडून पूर्ण करवून घेते. पण जे दलाल कारागिरांचं शोषण करत नाहीत अशाच दलालांना कंपनी हे काम देते. DBS बँक इंडियानं नेहमीच निधी आणि मार्गदर्शन अशा दोन्ही स्तरावर या उपक्रमाला सहकार्य केलं आहे. बँकेनं नेहमीच अशा उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवलेली आहे आणि अशा उपक्रमांना मदत करता यावी आणि कमतरता शोधून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून ही बँक सतत बैठका घेऊन विचारविनिमय करत असते.

आव्हानं आणि भविष्यातल्या योजना

भरतकामासारख्या प्रवाहाबाहेरच्या व्यावसायात असल्यानं थ्रेडक्राफ्ट इंडियाला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. निधी उभारणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. याचं कारण म्हणजे मालाच्या किंमती मोठ्या असल्या तरी या व्यावसायाला उत्पन्नासाठी आपल्या बुटिक आणि निर्यातदारावर अवलंबून रहावं लागतं हे होय. दुसरं मोठं आव्हान हे उत्तम कारागीर मिळवणं हे आहे. उत्तम कारागिरांची संख्या नगण्य अशीच आहे. मोहित म्हणतात, “ हा उद्योग इतका थिजलेला आहे की या उद्योगात जलद बदल होतील अशी अपेक्षा करता येत नाही. परंतु हळूहळू बदल घडू शकतात.”

आव्हानं ही जीवनाचा अविभाज्य भाग आहेत असं मोहितना वाटतं. या उपक्रमाला सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये ( SHG) रूपांतरीत करण्याची त्यांची योजना आहे. शिवाय या ग्रुपशी जोडल्या गेलेल्या स्वयंसेवी संस्थांसोबत त्यांना सहकार्य करार करायचा आहे. शेवटी, कारागिरांना चांगला पैसा मिळवून देता यावा म्हणून आपण स्वत:च हा माल निर्यात करावा असाही त्यांचा मानस आहे.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe