आशियातील पहिल्या डिझेल इंजिन चालविणा-या मुमताज काझींना राष्ट्रपतींच्या हस्ते 'नारीशक्ति' पुरस्कार 

0

तीन वर्षांपूर्वी, मुंबईच्या मुमताज एम काझी या डिझेल इंजीन असलेल्या रेल्वेच्या पहिल्या महिला चालक बनल्या. त्यांच्या रेल्वे मधील या सेवेसाठी या वर्षीचा नारीशक्ती पुरस्कार नुकताच त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सर्वोच्च सन्मान मिळवणा-या सात जणींमध्ये त्यांचा समावेश होता.


Source: Northeast Today
Source: Northeast Today

अधिकृतपणे मध्य रेल्वेच्या कर्मचारी असलेल्या या ४५ वर्षाच्या महिलेने वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वेच्या इंजिनचे सारथ्य केले आहे, आणि सध्या त्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे दरम्यान या सर्वाधिक वर्दळीच्या मार्गावर लोकल ट्रेन चालवितात.

सनातनी मुस्लिम कुटूंबातून आलेल्या, त्यांना या कामात २५ वर्षे झाली. त्यानी १९८९मध्ये सांताक्रुझ येथे आनंदीलाल पोदार महाविद्यालयातून पदवी घेतली, आणि रेल्वेत नोकरी करीता अर्ज केला. या अनेकांना प्रेरणा दायक ठरलेल्या महिलेने त्यांच्या वडिलांकडून नकार मिळवला, अल्लाराखू इस्माइल खाटवाला जे स्वत:देखील रेल्वेत कर्मचारी आहेत. सुदैवाने काही नातेवाईक आणि रेल्वेतील सहका-यांनी त्यांच्यासाठी वडिलांची मनधरणी केली की त्यांचे स्वप्न पूर्ण करू द्या.

त्यानंतर त्यांनी देखील अनेकांना प्रेरणादायी कामगिरी करत अनेकानेक पुरस्कार मिळवले, ज्यांचा त्यांच्या कुटूंबियाना सार्थ अभिमान आहे. मुमताज यांचा विवाह मसूद काझी, इलेक्ट्रीकल इंजिनीअर यांच्याशी झाला आहे. आणि त्यांना १४ वर्षांचा मुलगा तौसिफ आणि अकरा वर्षाची मुलगी फातिन आहेत.

त्यांनी त्यांचे नाव १९९५मध्ये लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविले ज्यावेळी त्या पहिल्या महिला लोकोमोटीव चालक बनल्या. त्यांना २०१५ मध्ये रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा पुरस्कार देखील मिळाला आहे. (थिंक चेंज इंडिया)