करिअरमध्ये महिलांना ब्रेकनंतर काम मिळवण्यास मदत करतो relauncHER

कंपन्यातील महिलांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न! ‘रि लॉंच हर’!

0

भारतातील महिलांना अनेक सामाजिक जबाबदा-या देण्यात आल्या आहेत, सीटिआय (Commission for Technology & Innovation)च्या अहवाला नुसार ३६ टक्के महिला लहान मुलांचे संगोपन, वडिलांची देखभाल, किंवा इतर गोष्टींमुळे काम सोडतात. असे असले तरी त्यातील ९१टक्के महिला वर्षभरात कामावर परत येवू इच्छीतात, मात्र त्यातील फार थोड्याजणी पूर्वीच्या नोकरीत सन्मानाने पूर्णवेळ परत काम करण्यात सक्षम असतात. त्यांच्यासाठी नव्याने नोकरी मिळवण्याच्या संधी मर्यादीत असतात, हा महिलांच्या शिक्षण आणि प्रशिक्षण यांचा क्षय आहे जर त्या त्यांचे करीअर पुन्हा सुरु करु शकल्या नाहीत. कंपन्यातून महत्वाच्या पदांवर केवळ पाच टक्के महिलांच आहेत आणि कंपन्यातून मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरही त्यांना लिंग आणि विविधता यांच्या मुद्यांना तोंड द्यावे लागते.


तंत्रज्ञान उद्योगात महिलांच्या नेतृत्वाची कमतरता पाहता, अंशु सिंह आणि ज्योतिका सिंह यांनी या अनुभवी महिलांना नेतृत्वाच्या त्याच पदांवर परत काम करण्यासाठी मदत करण्याचा मार्ग शोधून काढण्याचा निर्णय घेतला. महिला व्यावसायिकता लक्षात ठेवून त्यांनी मार्च २०१३मध्ये relauncHER ची सुरुवात केली. ज्याचा उद्देश व्यावसायिकपणे महिलांना त्यांच्या पूर्वीच्या पदांवर कामावर येण्यासाठी मदत करणे हा होता. हा व्यवसाय मुख्यत: अनुभवी आणि उच्च कुशल महिला व्यावसायिकांवर केंद्रीत आहे. व्यावसायिक महिलांना संकेतस्थळावरून ज्याप्रकारे सेवा हवी असेल त्या प्रकारे अर्ज भरून त्याची नोंदणी करावी लागते. नोंदणी नंतर उमेदवाराच्या प्रोफाईलचे मुल्यांकन केले जाते तसेच फोनवरून चर्चा करून उमेदवाराची योग्यता आणि व्यावहारीक कौशल्याचे मुल्यांकन केले जाते. ज्यावेळी व्यावसायिकाची निवड केली जाते त्यावेळी त्यांना डोमेन आणि स्थान यांच्या आधारे, relauncHER सहयोगी कार्यक्रम सोपविला जातो. पूर्णत: चौकशी नंतर जर प्रोफाईल नियोक्त्याच्या गरजेनुसार योग्य असेल तर रिज्यूम कंपनीला पाठविला जातो. कंपनी तांत्रिक मुल्यांकनाच्या प्रक्रियेतून निवड करते. जर उमेदवाराच्या तांत्रिक किंवा कौशल्याच्या बाबतीत कमरतरताअसेल तर त्यावर जास्त काम करावे लागते त्यावेळी त्यांना आवश्यक प्रशिक्षण देवून तयार केले जाते. प्रत्येक स्थितीत उमेदवाराला नियोक्त्याशी कसे बोलावे किंवा प्रगती कशी करावी याबाबत सूचना दिल्या जातात. रिटर्नर कार्यक्रमात निवड झालेल्या उमेदवाराला जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून मुल्यांकन करून कायमस्वरुपी कामावर ठेवले जाते.


relanuncHER दोन प्रकारच्या सेवा देते. पहिले ‘enricHER’ ज्यात महिलांना रिज्यूम, लिंक्डइन प्रोफाइल आणि मुलाखत देण्याच्या कलेत पारंगत केले जाते. व्यावसायिकांना त्यांच्या प्रोफाइलच्या गरजे नुसार योग्य प्रशिक्षणाबाबत देखिल सांगितले जाते. या कार्यक्रमात उमेदवारांना सुरुवातीपासूनच पूर्णवेळ कामावर ठेवले जाते.

दुसरे ‘Freelancer and SelfstartHER’ ज्यात व्यावसायिकांना उद्यमी म्हणून ऑनलाईन उपस्थिती ठेवण्यास मदत करतो. ज्योतिका म्हणतात की, “आम्ही स्थापित नियोक्त्यांना अनुभवी आणि कुशल प्रशिक्षित महिला व्यावसायी उपलब्ध करुन देतो. ज्यामध्ये वरिष्ठ स्तरावरील आणि नेतृत्वाच्या भूमिकेतील महिलांना प्रोत्साहन देवू इच्छितात. ज्यांना अनुभवी प्रतिभांची गरज आहे, परंतू उमेदवार शोधू शकत नाहीत.” त्या म्हणतात की, “ या कार्यक्रमाचा शेवटचा उद्देश व्यावसायिकांना नोक-या मिळवून देणे हा आहे, असे असले तरी relauncHER रिक्रूटमेंट कंपनी नाही. हा कार्पोरेट जगतातील महिला नेतृत्व  प्रमाणातील अंतर वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा भाग आहे, त्यामुळे कुणा प्लेसमेंट किंवा कंन्सल्टन्सी सोबत तुलना करणे योग्य होणार नाही”.

त्यांचा कार्यक्रम अनुभवी कर्मचारी कंपन्यांपर्यंत पोहोचविण्याचा सरळ मार्ग देतो. कंपन्यांना मध्य वरिष्ठ स्तरावरच्या नेतृत्वाच्या भूमिकांसाठी अत्यंत कुशल, योग्य महिलांची प्रतिभा मिळते. हे खरेतर संघटनेत पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या संतुलीत ठेवण्याचे प्रयत्न आहेत. जर कंपनी मुल्यांकना नंतरही उमेदवाराला नोकरीवर ठेवत नसेल तरी त्यांच्याजवळ अनेक पर्याय असतात.

अंशू सांगतात की, “ आम्ही आय टी क्षेत्रात सुरुवात केली, आणि आता हळुहळू अन्य क्षेत्र सुध्दा वाढवित आहोत. आमचे महसूलाचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही प्रत्येक उमेदवारासाठी कंपनीकडून रिक्रूटर शुल्क घेतो आणि उमेदवार कोणत्याही प्रकारच्या व्हँल्यू ऍडिंग सेवा देतात. तसे नोंदणी आणि प्रोफाईल देणे उमेदवारांसाठी वर्तमानात निशुल्क आहे.”

निरनिराळ्या व्यावसायिक महिलांशी केलेल्या चर्चेतून हीच गोष्ट समोर आली की, सर्व महिलांना पूर्णवेऴ काम करणे शक्य नाही, परंतू त्या आपले शिक्षण, अनूभव यांचा उपयोग करू इच्छितात. महिलांना त्यांच्या प्रतिभा आणि कौशल्याचा वापर करून आपल्या महत्वाकांक्षाना साकार करण्यात, उद्यमींना जोडण्यात, आणि डिजीटल तसेच समाज माध्यमातून जोडण्यास मदत करून महिलांना सक्षम बनविण्याचा हा एक प्रयत्न आहे. लाइफ कोच सोबत भागीदारी आणि महिला उद्यमींसाठी तयार करण्यात आलेला कार्यक्रम हे मोठे पाऊल आहे.

ज्योतिका म्हणतात कि, “ आमचे कार्यालय पूर्णत: डिजीटल आहे, आणि आम्ही आमच्या स्वत:च्या कार्यालयातून काम करतो,” त्या सांगतात की, “ मी पूर्णवेळ समूह सदस्य आहे, तर अंशू कुटूंबातील समस्यांमुळे अर्धवेळ काम करतात. आमचे व्यावसायिक सहकारी स्वत:च्या कामाचे तास, वेळा आणि स्थान निवडतात. मागील पाच महिन्यात आम्ही यशस्वीपणे मध्यम आकाराच्या आय टी कंपन्या, तसेच एनसीआर आणि पुणे येथील स्टार्टअप यांच्यासोबत परिक्षण केले. काही मोठ्या आय टी कंपन्यानी देखील आमच्या कार्यक्रमात रस दाखविला आहे आणि आम्ही त्याच्यासोबत सहभागीदारी करण्याबाबत चर्चा करत आहोत”.

अंशू यांना वाटते की, “ करिअर ब्रेक बाबतचा कलंक आणि नियोक्त्यांना महिलांचे परत येणे याबाबत समजावणे हे आमच्या समोरचे मोठे आव्हान आहे. ज्या प्रकारची तज्ज्ञता आणि क्षमता महिलांकडे आहे ती नियोक्त्यांसाठी फायद्याची असू शकते”. त्या पुढे सांगतात की, हा प्रयत्न कॉर्पोरेट संस्कृतीला वाढवेल जेथे महिला कोणत्याही नुकसानाशिवाय ब्रेक घेवू शकतील. आणि ज्यावेळी त्या तयार होतील त्यावेळी सहजपणे परत येवू शकतील. “ या मिशनचे लक्ष्य करिअर गॅपच्या विरोधात सामाजिक कलंक आणि भेदभाव संपविणे हा आहे आणि महिलांची संख्या व्यवस्थापन आणि नेतृत्वाच्य़ा भूमिकेत  वाढ करणे हा आहे.

लेखक : भागवत सिंग चिलावल