अल्प उत्पन्न गटातील मुलांना मदत करत आहेत ‘ऐतिहाद एअरवेज’ आणि ‘मॅजिकबस’ यांचे उपक्रम!

अल्प उत्पन्न गटातील मुलांना मदत करत आहेत ‘ऐतिहाद एअरवेज’ आणि ‘मॅजिकबस’ यांचे उपक्रम!

Thursday February 02, 2017,

2 min Read

युनायटेड अरब एमिरेटस् ची विमान वाहतूक कंपनी एतेहाद एअरवेज आणि भारतातील सार्वजनिक बस उपक्रम मॅजीक बस यांनी सामाजिक बांधिलकीच्या नव्या उपक्रमात भागीदारी करण्याचे ठरविले आहे. भारतातील लहान मुले आणि तरुणांना पाठिंबा देण्याच्या या उपक्रमात या दोघांनी हातमिळवणी करण्याचे ठरविले आहे.

मुंबई शहरात मॅजिक बस या उपक्रमासाठी मुंबईतील ऐतेहाद एअरवेजचे कर्मचारी तीन दिवसांसाठी अबुधाबी येथील त्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी उपक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यात वॉटरप्रूफ आऊट डोर शेल्टर, आणि व्हेजिटेबल गार्डन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मॅजिकबस यांच्या समर्थनातून १५ स्वयंसेवकांचा गट एमिराती आणि विदेशातून येवून या उपक्रमात सहभागी झाला होता. आंतरराष्ट्रीय बालक दिना निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील मॅजिक बसने समर्थन दिलेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत दिली जाणार आहे.


image


हेरब अलमुहेरी, एतिहाद समुहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “ यातून हेच सिध्द होणार आहे की आमचे कर्मचारी त्यांच्यातील हुशारी आणि कौशल्यांचा समाजाच्या बांधिलकीतून कसा सदुपयोग व्हावा म्हणून काम करतात. एतिहाद एअरवेज त्यांच्या या उत्स्फूर्तपणे केलेल्या कामांचे कौतूक करते आणि त्यांना पाठिंबा देते. यातून भारतात कंपनीने सुरु केलेल्या धर्मादाय उपक्रमांची ओळख होते आणि आमची बांधिलकी दिसून येते.”

हा उपक्रम एतिहाद एअरवेजच्या स्वयंसेवा उपक्रमाद्वारे घेण्यात आला होता. यातून कर्मचा-यांना युएइ आणि जगभरात असलेल्या त्यांच्या वेगळेपणाची जाणिव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०१४ मध्ये हा उपक्रम सुरु झाल्यापासून एअरवेजच्या कर्मचा-यांनी त्यांचे हजारो तास त्याच्यासाठी खर्च केले आहेत. त्यातून अकरा देशात वेगवेगळ्या कार्यांसाठी त्यांनी स्वयंसेवा देताना स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यात बांग्लादेश, व्हिएतनाम, नेपाळ, केनिया या देशांचा समावेश आहे.


image


मॅजिक बसचे संस्थापक सदस्य मॅथ्यू स्पेस म्हणाले की, “ मॅजिक बसला एतिहाद एअरवेजने नेहमीच त्याच्या या उपक्रमात सहकार्य केले आहे. त्यात प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांचा समावेश असतो. आय व्हालेंटिअर या सारख्या उपक्रमातून समाजाप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीच्या भावनेला पाठिंबा मिळतो आणि मुलांना तसेच युवकांना गरिबीपासून मुक्त करता येते.”


image


या मध्ये शिक्षण, आरोग्य, अशा क्षेत्रातील उपक्रम राबविले जातात आणि मँजिकबस त्यासाठी अल्प उत्पन्न गटातील देशाच्या बावीस राज्यातील चार लाख मुले आणि तरुणांना सोबत घेवून काम करत आहे. बालपणापासून जीवन जगण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात यामुळे मदत दिली जात आहे. मे महिन्यात भारतातील आणखी सहयोगी कंपनी जेट एअरवेजच्या मदतीने एतिहाद एअरवेज कंपनी या मुलांना भारतीय क्रिकेट संघांची मुंबईत भेट घालून देणार आहे. २००४मध्ये भारतात विमानसेवा सुरु केल्यापासून एतिहाद एअरवेजने देशातील सेवांचा सातत्याने विस्तार केला आहे. सध्या जेट सोबत १५ भारतीय शहरांत ही सेवा विस्तारली आहे. अबू धाबी हे या सेवेचे मुख्य केंद्र आहे.