“नैसर्गिक” जीवन संजीवनी, "स्टेमारेक्स"...

“नैसर्गिक” जीवन संजीवनी, "स्टेमारेक्स"...

Tuesday January 26, 2016,

3 min Read

हिमॅटोलॉजिकल डिसऑर्डर, इम्युनोलॉजिकल डिसऑर्डर, मेटाबॉलिक डिसऑर्डर, सेरेबल पाल्सी ही नावं जरी एेकली तरी आपल्याला वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटतं. खरं तर आज जगात हे डिसऑर्डर्स असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जगभरातला मधुमेहाच्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. हे आजार झालेले रुग्ण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिटमेन्ट, औषधं घेऊन बेजार होतात. एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे अशी त्याची फरफट सुरु राहते. पण आपण हे विसरतो की निरोगी आयुष्याचे मुळ हे आपल्या शरीरात असते. निसर्गाने शरीरातच तयार केलेल्या घटकांमुळे या असाध्य रोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. स्टेमसेल थेरपी ही यापैकीच एक. गेल्या काही वर्षांमध्ये स्टेमसेल थेरपी हा शब्द चांगलाच परवलीचा झाला आहे. जन्माच्या वेळी बाळाच्या नाळेचं संवर्धन केलं तर पुढे होत जाणाऱ्या आजारावर त्याच्या माध्यमातून नियंत्रण मिळवता येते. किंवा या आजारातून मुक्तता मिळू शकते. स्टेमसेल थेरपी संदर्भात अनेक प्रयोग होत आहेत. काहींच्या मते ही स्टेमसेल थेरपीला अजूनही यश मिळायचं बाकी आहे. डॉक्टर प्रदीप महाजन यांनी रिजेनेरेटीव मेडीसीनमध्ये केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळं स्टेमारेक्सची किर्ती जगभरात पोचली आहे.

image


डॉक्टर प्रदीप महाजन सांगतात,” लहानपणी आपण खेळताना आपल्याला खरचटलं तर ती जखम आपोआप भरायची. अनेक मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही जखमा नैसर्गिक पद्धतीनं भरतात. कारण औषधांच्या माऱ्यानंतरही शरीरात नैसर्गिक पध्दतीनं असलेले घटक या जखमा भरण्यात मदत करतात. एलिओपॅथीची प्रॅक्टीस करताना हे लक्षात आलं. यामुळे असाध्य रोगांवर उपचार करण्यासाठी शरीरात नैसर्गिकरित्या असलेल्या घटकांचा वापर करता येऊ शकतो का याची जिज्ञासा मला स्वस्त बसून देत नव्हती. यातूनच मग मी संशोधनाकडे वळलो. व्हिएन्ना विद्यापीठातून युरोलॉजी संदर्भात पदविका घेताना या संशोधनाचा ध्यास वाढत गेला आणि त्यातून एक-एक करत अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला. बाळाच्या जन्माच्या वेळी पडलेल्या नाळेतल्या घटकांचा वापर करुन पुढचे आजार एक तर टाळू शकतो किंवा ते आजार बरे होऊ शकतात, यासाठी स्टेमसेल थेरपी जगभरात वापरली जाऊ लागलीय. यावर भारतातही संशोधन सुरु आहे. यातूनच स्टेमारेक्सची संकल्पना साकारली गेली. आता यातून अनेक आजारांवर नियंत्रण मिळवण्यात येतंय. हे विशेष”

image


नेचर हिल्स थ्रू नेचर यासंदर्भात डॉक्टर प्रदीप महाजन अगदी ठाम आहेत आणि हेच त्याचं ब्रीद वाक्य झालंय. यामुळंच निसर्ग, औषध आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून रिजेनेरेटीव मेडीसीनच्या आधारे असाध्य रोगांवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या उपचारात्मक औषध पध्दतीला स्टेमसेल थेरपी हा सशक्त पर्याय होऊ शकतो का यासाठी डॉक्टर प्रदीप महाजन यांचे प्रयत्न सुरु आहेत. यातूनच केलेले संशोधन आणि प्रयोगातून त्यांनी Avascular Necrosis Treatment साठी बोन मेरोचा वापर करण्यासंदर्भातलं पेटंटही घेतलं आहे. ही अगदी नवीन आणि आधुनिक उपचार पध्दती आहे. नाळ उपलब्ध नसल्यास बोन मॅरोचा वापर करुन असाध्य आजारांसाठी त्याचा वापर करण्यासंदर्भातलं हे पेटंट स्टेमेरेक्सकडे आहे. यातून स्टेमारेक्सची व्याप्ती जगभरात पोचली आहे.

image


गेल्या पाच वर्षांत रिजेनेरेटीव मेडीसीनचा वापर करत स्टेमारेक्सतर्फे जवळपास २००० हून जास्त रुग्णांना व्याधींपासून मुक्त केलं आहे. यापैकी सुमारे ८० ते ८५ टक्के रुग्ण हे पूर्णपणे बरे झालेत तर उरलेल्या रुग्णांच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झालेली आहे. स्टेमारेक्सची अत्याधुनिक प्रयोगशाळा नवी मुंबईतल्या रबाळे इथं आहे. आता मुंबईतल्या सेवन हिल्स रुग्णालयात स्टेमारेक्सनं आपलं सेंटर सुरु केलं आहे. डॉक्टर महाजन यांची प्रयोगशीलता, मेहनत आणि मेडीसीन क्षेत्रात नवनवीन गोष्टी करण्याचा ध्यास यामुळं स्टेमारेक्सची व्याप्ती जगभरात पोचलेय.