लाईफलाईन एक्सप्रेसची २५वर्षे; सेवाभावी मोफत आरोग्य सुविधांचा जगभरात गौरवण्यात आलेला लोकप्रिय प्रकल्प!

लाईफलाईन एक्सप्रेसची २५वर्षे; सेवाभावी मोफत आरोग्य सुविधांचा जगभरात गौरवण्यात आलेला लोकप्रिय प्रकल्प!

Wednesday October 12, 2016,

3 min Read


गेली अडीच दशके झाली, या मॅजिक ट्रेन ने सीएसआर पुढाकाराचे योग्य उदाहरण घालून दिले आहे. लाईफ लाईन एक्सप्रेस या देशातील आणि जगातील पहिल्या रुग्णालय रेल्वे गाडीने २५वर्षांच्या सेवेचा पल्ला गाठला आहे. या प्रवासादरम्यान तिने अनेक हजार रुग्णांचे आयुष्य बदलून टाकले आहे. त्यामुळे ती जेथे जाते तेथे या मॅजिक ट्रेनचे लोक प्रेमाने आनंदाने स्वागत करतात.

गेल्या २५वर्षात या मॅजिक एक्सप्रेसने १७३ प्रायोजित कार्यक्रम पार पाडले असून दुर्गम भागात जाऊन लाखो लोकांना औषधोपचार केले आहेत. भारताच्या अतिमागास भागात जिथे आरोग्याच्या सुविधा पोहचू शकत नाहीत अशा भागात संपूर्णत: मोफत अशा प्रकारच्या सेवा घेऊन सुमारे दोन लाख प्रायोजित सर्जन्स, स्वयंसवेक आणि आरोग्य क्षेत्रातील अधिकारी यांना घेऊन जाणारी ही रेल्वे खरीखुरी जीवन वाहिनी ठरली आहे.

फोटो सौजन्य : 'द इकनाॅमिक्स टाईम'

फोटो सौजन्य : 'द इकनाॅमिक्स टाईम'


१६जुलै १९ ९१ रोजी या जीवन वाहिनीचा प्रवास सुरू झाला आणि ती आजही वेगाने धावत असते. ज्यावेळी तिने सेवेची २५ वर्षे पूर्ण केली त्यावेळी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मोठा समारंभ करण्यात आला. त्यात मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक जी सी अग्रवाल, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आर सी सरीन, अध्यक्षा झेलमा लाझारुस, ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी इम्पँक्ट इंडिया फाउंडेशन या सेवाभावी संस्थेशी सलग्न आहेत, हजर होत्या. बारतीय रेल्वे सोबत इम्पँक्ट इंडियाने सहभागीत्वाचा करार केला असून गेली २५वर्षे देशभरातील दुर्गम भागात जाऊन आरोग्य सेवा सुविधा पोहोचविण्याचे महत्वाचे काम करत आहेत.

त्यांच्या प्रत्येक आरोग्य प्रकल्पात ही लाईफलाइन वेगवेगळ्या भागात जाउन ३५-४०दिवस रेल्वेच्या यार्डात उभी केली जाते. आणि रोग निदानापासून अगदी शस्त्रक्रिया पर्यंतच्या महागड्या औषध उपचारांची मोफत व्यवस्था केली जाते. या कार्यासाठी या उपक्रमाने अनेक जागतिक पातळीवरील पुरस्कार प्राप्त केले असून त्यात संयुक्त राष्ट्रांच्या ग्रँण्ड पुरस्काराचा समावेश आहे.

image


या जीवनवाहिनीच्या एका बोगीत एकाच वेळी तीन मोठ्या शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. शिवाय लहान प्रयोगशाळा, चिकित्सा केंद्र, १२ खाटांचे रुग्णालय, २० डॉक्टर्स, परिचारिका स्वयंसेवक यांना राहण्याची, जेवण्याची व्यवस्था यात आहे. ही रेल्वे सहा आठवडे एका मुक्कामी थांबते. आणि वर्षभरात पाच ते सात प्रकल्पांवर काम करते. ही जेथे जाते तेथे तिला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला जातो. गुजरात मध्ये २००१मध्ये झालेल्या भुकंपातही तीने हजारोंना सेवा दिली आहे.

भारतीय रेल्वे आणि इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशन यांच्या भागिदारीतुन सुरू असलेल्या या उपक्रमात ४,५० ००० लोकांना महत्वपूर्ण आरोग्य सुविधा मोफत देण्यात आली आहे. त्यात अत्यंत दुर्गम आणि ग्रामीण मागास भागांचा समावेश आहे जेथे आरोग्य सेवा देणे हे आव्हान समजले जाते.

या जीवनवाहिनीच्या केंद्रात डोळ्याच्या शस्त्रक्रियेपासून, बहिरेपणा, ओठ फाटण्यावरील शस्त्रक्रिया, पोलिओ अशा अनेक दुर्धर आजारांवर ईलाज केला जातो. ‘हिचा प्रवास अद्भूत आहे आणि आम्ही जिथे कुठेही जातो, आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतो’ असे श्रीमती लाझारुस यांनी सांगितले. या उपक्रमासाठी केवळ अर्थसहाय्यच नाही तर सर्वप्रकारची मदत जगभरातून केली जाते त्यात १९ विविध सेवाभावी संस्था आणि संयुक्त राष्ट्रातील काही संस्थाचा पुढाकारा आहे. युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी देखील या उपक्रमाला समर्थन दिले आहे.

image


या कार्याची सुरुवात कशी झाली त्याची कहाणी देखील रोचक आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की, “ भारतीय रेल्वे हे असे एक साधन आहे जे देशातील अनेक खेड्यापाड्यांना जोडते. जेंव्हा पंडितजीनी हे सर जॉन विल्सन या ब्रिटिश व्यक्तीला हे संगितले त्यावेळीच त्यांना या लाईफलाईनची संकल्पना सुचली. अखेर इम्पॅक्ट इंडियाच्या स्वयंसेवकांनी हे आव्हान स्विकारले आणि १९९१मध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली.

या जीवनवाहिनीने दिलेल्या सेवांची यादी मोठी आहे. 

त्यात पोलिओ आणि हाडांशी संबंधित रोगांच्या उपचारांची व्यवस्था केली जाते.

त्यात डोळ्याच्या निगा-उपचार आणि शस्त्रक्रया केल्या जातात.

बहिरेपणावर प्रभावी उपाय योजना आणि उपचार केले जातात.

गालफाडी, किंवा ओठ फाटण्यावरील शस्त्रक्रिया केल्या जातात.

अनेक प्रकारच्या रोगांच्या चिकित्सा तज्ज्ञामार्फत केल्या जातात.

कुपोषण किंवा अनेक प्रकारच्या जीवनसत्वाअभावी होणा-या रोगांवर ईलाज केले जातात.

स्थानिक स्वयंसेवकांना अशाप्रकारच्या आरोग्याच्या प्रकल्पात सहभागी करून रोजगार दिले जातात.

स्वयंसेवक परिचारक, परिचारिका डॉक्टर्स आणि सेवाभावी संस्थाना अनेक प्रकारच्या रोगांच्या उपचारा बाबतच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण दिले जातात.