तुम्हाला जे हवे आहे त्याच्याशी प्रामाणिक रहा, तेच तुम्हाला मार्ग दाखवेल

तुम्हाला जे हवे आहे त्याच्याशी प्रामाणिक रहा, तेच तुम्हाला मार्ग दाखवेल

Wednesday September 07, 2016,

5 min Read


ते २८वर्षीय स्वयंभू छायाचित्रकार आहेत ज्यांनी चार्टर्ड अकाऊटंटची आश्वासक कारकिर्द सोडून आपल्या छंदाला न्याय दिला. समूह संपर्क माध्यमांचा (सोशल मिडीया) पूरेपूर वापर करत, त्यांनी उच्च स्तर गाठला. त्यांचे फेसबूक चाहते सात लाख तर इंस्टाग्राम चाहत्यांची संख्या १२लाख झाली आहे. या प्रवासाबाबत बोलताना हा भटक्या छायाचित्रकार उभा राहिला, जवळ आला आणि उत्साहाने रंगून गेला. "माझ्या वडिलांनी नेहमीच स्वप्न पाहिले की मी नामवंत चार्टर्ड अकाऊटंट व्हावे त्यामुळेच माझ्या नावात त्याचा उल्लेख ऑदित्य (ऑडिट) वेंकटेश असा केला".


image


ऑडी फोटोग्राफी

ऑडी फोटोग्राफी हे फेसबूक पेज सुरू केले त्यावेळी ऑदित्य विद्यार्थीच होते. त्यांच्या अभ्यासक्रमातील घटत जाणा-या त्याच्या रुचीने त्यांना या छंदात खेचून आणले. प्रत्येक क्षणाचे छायांकन करण्याची उर्मी त्यांच्या मनात दाटून येत असत. आणि या छंदासाठी अखेर महाविद्यालयाला रामराम केला. "केवळ शिकणे माझ्यात नव्हते. मी माझे चार्टर्ड अकाऊटंटचे शिक्षण पूर्ण करु शकलो नाही. त्यासाठी मी जे कारण दिले ते असे होते की जेंव्हा मी आर्टिकलशीप करत होतो. माझ्या टीममध्ये मी एकच असा होतो, जो संवाद करू शकत असे, कारण मी माझ्या चमूचा प्रमुख होतो आणि मी चार्टर्ड अकाऊटंटच्या मुलाखती माझ्या संचात काम करावे म्हणून घेत होतो. त्यावेळी मला जाणवले की मी माझे चार्टर्ड अकाऊटंट म्हणून काम संपविले आणि त्यानंतर जर वीस वर्षांच्या व्यक्तीकडून माझी मुलाखत घेतली गेली ज्याला मी काय करतो आहे ते काहीच माहिती नसते. मला वाटले हे असे सुरू राहणे योग्य नाही. तेच माझ्या ड्राॅपआऊटचे कारण ठरले.

image


ते सात वर्षांचे असताना त्यांचा लेन्सशी प्रथम संबंध आला. अनेकदा सराव करून आणि अनुभव घेतल्यानंतर त्यांना ५एमपीचा कॅमेरा भेट म्हणून मिळाला. मला फोटोग्राफीत नेहमीच रुची होती. अगदी मी लहान होतो तेव्हापासून मला त्याचे नेहमीच अप्रूप होते. जेंव्हा मी खूपच लहान होतो आणि कॅमेरा हाती यायचा होता तेंव्हा, माझ्या कुटूंबियाना आणि मित्रांना बसवून त्यांचे स्केच तयार करत असे. त्यांचे पहिले चित्र त्याच्या आई आणि बहिणीचे होते. योगायोगाने त्यांनी त्याचे फेसबूक पेज सुरू केले ते सुध्दा ऑडी फोटोग्राफी याच नावाने. १ ऑक्टोबर २०१० रोजी, ज्याचा विस्तार होत आता ७.५लाख फोटोंचे संकलन झाले आहे. 

image


फोटोग्राफीसोबत प्रवासाच्या छंदाची जोपासना करत आपण सारे धार्मिक स्थळांच्या, प्रदर्शनांच्या, कौटुंबिक सहलीच्या धुसर आठवणीत जगत असतो. ऑदित्य यांना सा-या स्मृती सुक्ष्मपणे आठवतात. पासपोर्टवर शिक्केच शिक्के असलेल्या कुटुंबात लहानाचा मोठा होत असताना, त्यांनी प्रवास करण्यास अगदी लहान वयातच सुरुवात केली. ज्याचे अनुकरण धार्मिकपणे ते आजही करतात. त्यामुळेच दर चार महिन्यांनी ते निसर्गाच्या सानिध्यात जातात आणि येताना मास्टरपिस असलेले फोटोज घेऊन येतात. "प्रवास आणि भुसमतल जी बहुतांश मी चितारली आहेत. मला वाटते आपल्या विकासात त्यांचाही मोठा वाटा असावा जसे आम्ही वाढतो. लहानपणी आम्ही सहकुटूंब प्रवास केला, वेगवेगळ्या जागी. अनेक प्रकारे आम्ही आमच्या यात्रांचे दस्तावेजीकरण केले. त्यातूनच मला प्रवास आणि फोटोग्राफीचे वेड आले असावे."

जीव ओवाळून टाकाव्या अशा त्यांच्या बहुतांश कलाकृती आहेत. त्यांची हिमालयातील, भारताच्या उत्तरेतील कलेक्शन्स अप्रतिम अशी आहेत. त्यांच्या या लाजबाब कलाकृतींचा धांडोळा घेताना सिक्कीम मध्ये त्यांनी साकारलेल्या व्हिडीओजचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. 

image


मुख्य प्रवाहातील व्यवसाय या दिवसांत मागे पडला असला तरी, ऑदित्य यांनी फोटोग्राफी सुरू केली त्यावेळी ते आश्वासक असे करिअर होते. सामाजिक दबावाला सामोरे जात त्यांनी ते स्विकारले जरी त्यात फार काही बँक बॅलन्स राहण्याची शक्यता नव्हती तरी देखील. पण आज त्यांच्या ग्राहकांच्या तपशिलात पाहिले तर व्होडाफोन, सँमसंग, आणि टोयोटा सारखे ब्रॅण्ड त्यांच्या यादीत आहेत. 

"मी नेहमीच कमी किमती लावल्या. पण फुकट कधी काही केले नाही. मला सोशल मिडीयाची आवड आहे. जेंव्हा मी सुरुवात केली मला माहिती होते की मला फोटोग्राफी आवडते पण मला माहिती नव्हते की नंतर त्यांचे काय करायचे किंवा त्यांच्या खाली कोणते शब्द लिहायचे. ज्यावेळी सहज असा मी विचार केला त्यावेळी फेसबूक नव्यानेच सुरू झाले होते. म्हणून मी त्यापासून सुरुवात केली लोकांपर्यंत पोचण्यासाठी. ‘पहा, पहा मी काय करतो आहे’ कालपरत्वे माझ्या कामाने एक सोशल मिडीया ग्रुप तयार झाला आणि त्यांचा मी आभारी आहे.’

फोटोग्राफर्सच्या जीवनातील विसंगती

स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यास त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सुरुवात केली. टेलीकॉलर म्हणून काम करण्यापासून स्वत:चे कर भरण्यापर्यंत आणि कार्यालय घेण्यापर्यंत, ऑदित्य यांना दोन्ही बाजूने चांगले वातावरण मिळत गेले. फोटोग्राफरचे  जीवन सुखाचे नसते. त्यामध्ये जेव्हा कुणी ग्राहक बोलाविल त्यावेळी जिद्द आणि चिकाटीने जाण्याची क्षमता असावी लागते. काही वेळा लग्नाच्या फोटोग्राफीत केवळ अनुभव मिळतो आणि पैसे मिळत नाहीत. सुरुवातीच्या काळातील अशा अडचणींबाबत ऑदित्य सांगतात की, “हे बहुधा सर्वच फोटोग्राफर किंवा कलाकाराच्या बाबतीत घडत असावे, अनेकदा सर्वात मोठी अडचण हीच असते की दोघांच्या आर्थिक फायद्याची संधी मिळणे. आणि काम संपले की वेळेत पैसे मिळवणे देखील.

काम सुरू केले त्यावेळी फोटोग्राफीचे त्यांचे ज्ञान आणि अनुभव दोन्ही कमीच होते. त्यामुळे आधारभूत किंमत कशी ठरवावी ? फोटोग्राफर आपल्या ग्राहकांशी कसे बोलातात? आणि स्थिती कशी हाताळतात ऑदित्य यांना सुरुवातीच्याच काही कामात त्यांचा अनुभव आला. दक्षिण अफ्रिकेत डिस्कव्हरी वाहिनीसोबत काम करताना त्यांंचे सामान चोरीला गेले, त्यात गँगेट्स, कॅमेरा आणि लेन्स यांची किंमत लाखोत होती. ज्यामुळे त्यांना भविष्यातील अनेक कामे रद्द करावी लागली. ग्राहकांचे घेतलेले पैसे परत द्यावे लागले. आणि तात्पुरत्या स्वरुपात गरज भागेल अशा गोष्टी मिळवाव्या लागल्या. त्यात त्यांचे सुमारे वर्ष गेले. काहीतरी मौल्यवान गमावण्यातून सावरण्याचा तो काळ होता. ती त्यांच्या जीवनाची कलाटणीच ठरली. ऑदित्य यांचे हे उदाहरण यथायोग्य आहे की एखाद्याने विपरीत स्थितीशी कसा सामना केला उपलब्ध सूत्रांचा वापर केला, छंदाच्या बळावर जग जिकंले.

तुम्ही तुमच्या कामाबाबत काय करत आहात, तुम्हाला जे हवे आहे त्याच्याशी प्रामाणिक रहा, ते हेच आहे जे तुम्हाला मार्ग देईल, ऑदित्य सांगतात. जसे मी आत्मविश्वासाच्या बळावर माझ्या जीवनाचा प्रवास केला.

लेखिका : श्रुती मोहन

    Share on
    close