“हिंदी इंग्रजी सारखी मादक नाही, परंतू मजबूतीने टिकून राहण्याची शक्ति तिच्यात आहे”

 हिंदी है हम!

0

जस जशी माणसाची भाषा बदलते, तसतशा त्यांच्या इच्छा, गरजा आणि जीवनाकडे पहाणे-विचार करणे- समजण्याचा दृष्टीकोन देखील बदलत जातो. मी देखील कधी बदलू नये म्हणून मी माझ्या भाषेला कधी माझ्यापासून दूर होवू दिले नाही. म्हणतात ना आपली माती आणि आपली भाषा कधी आपल्यातून वेगळी होवू शकत नाही, तर माझ्याबाबतीत देखील काहीसे असेच झाले.

हे खोटे ठरेल, जर मी म्हटले की मला खूप चांगल्या प्रकारे हिंदी लिहिता येते. हिंदी लिहिण्याची सवय तर शाळेच्या दिवसांमध्येच सुटली होती. इंग्रजीत लिहीणे, इंग्रजीत बोलणे, नोकरी इंग्रजीत आणि या सा-यांसोबत या विचारांची सोबत की चांगले इंग्रजी बोलल्याने आणि लिहिल्यानेच सारे काही मिळते. किंबहूना इंग्रजीच जीवनात पुढे जाण्याचे माध्यम बनून गेली. परंतू आता दु:ख होते. जेंव्हा हिंदी लिहायला बसते, तेंव्हा त्या प्रकारे लिहू शकत नाही, जसे लिहावेसे वाटते. हिंदीशी जुळलेल्या असंख्य आठवणी आहेत माझ्याजवळ, ज्यांना मी शब्दबध्द करू इच्छिते. माझी आई माझी सर्वात मोठी प्रेरणा होती आणि तिची हिंदी भाषेसोबत इतकी सलगी होती की ती सलगी माझ्याच्यानेही कधी दूर झाली नाही. मी इंग्रजीमय झाल्यानंतरही स्वप्न हिंदीतच पाहते, विचार हिंदीत करते, आणि स्मितहास्य देखील हिंदीतच करते. त्यामुळे जेंव्हा मला सांगण्यात आले की, मी हिंदीचे संपादकीय लिहावे, तेंव्हा खरे सांगू, मनाला खूप बरे वाटले. परंतू इतक्या वर्षानी पुन्हा अशाप्रकारे हिंदी लिहिणे सोपे नाही. त्यातून मात्रा आणि शब्दांची निवड, ते देखील एक आव्हान आहे, या भाषेसोबत. मग विचार केला की चला जावू द्या, लिहायचे आहे म्हणजे लिहायचे आहे, परंतू असे काय लिहू की आपल्या युवरस्टोरीच्या हिंदी वाचकांशी जुळता यावे. मी असे काही लिहिणार नाही की हिंदीच्या विश्वात खळबळ माजेल. मी काही तरी साधे-सोपेच लिहू इच्छिते, या वचनासोबत की रोज नाही तरी, वेळो-वेळी हिंदीमध्ये काही लिहित जाईन आणि तुम्हाला त्या सोबत सहभागी करून घेईन.

आमची हिंदी आधुनिकतेच्या तंत्रामध्ये कुठेतरी हरवत आहे आणि या आधुनिक काळात हिंदीसाठी जागा कमी होत चालली आहे. विचित्र गोष्ट आहे की आधुनिकता आरडा ओरडा करत आणि गदारोळात सनसनाटी निर्माण करत लक्ष वेधून घेत आहे, त्या सोबत ज्ञानाचा पर्याय असल्याचे दांभिकपण देखील दाखवत आहे. परंतू माझ्या मते अशा आधुनिकतेला सध्या काहीच ओळख नाही आणि काहीच भविष्य नाही. आजची आधुनिकता उद्या शिळी होवून जाते आणि एक नवी आधुनिकता त्यावर स्वार होवून जाते, परंतू आमची हिंदी सा-या आधुनिकतेच्या अडचणी पार करत सहजपणे सा-या रंग-रुपात सजून पुढे निघून जात आहे. हे सारे असूनही जसे की मी काही काळापासून पहात आहे, हिंदी पुन्हा परत येत आहे.माझ्या आजुबाजूच्या लोकांना हिंदी बोलण्याचा अभिमान वाटत आहे आणि हिंदी शिकण्याची त्यांची इच्छा माझा उत्साह वाढवित असते. खरे सांगायचे तर मला खूप सन्मानित झाल्यासारखे वाटते, ज्यावेळी हिंदीत काही लिहिण्याची किंवा बोलण्याची संधी मिळते. हिंदी कविता वाचते, हिंदी कहाण्या वाचते, हिंदी सिनेमा पाहते आणि आपल्या बाजूने जाणा-या प्रत्येक हिंदी गोष्टीतून काहीना काही हिंदी शिकून परत येते.

आम्हा हिंदीवाल्यांना आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. असे का आहे, की आम्ही हिंदीवाले घरात सारेकाही हिंदीत करतो आणि बाहेर येताच इंग्रजीवाले हिरो-हिरोईन होवून जातो. युवर स्टोरी हिंदीच्या माध्यमातून आमचा हा उद्देश आहे की, आम्ही घराघरात पोहोचू. आमच्या आजुबाजूला जे काही इंग्रजीत होत आहे, आम्ही ते सारे हिंदीतही घेवुन यावे. हिंदीच्या कहाण्या, हिंदी मधील किस्से, हिंदी वक्ते, उद्योजक, प्रगती, प्रोत्साहन, मनोवेधक, डॉक्ट्रोलॉजी, वुमनिया, सर्व काही हिंदीत असेल. हे पूर्वीपासून ठरले आहे, आम्ही चूका खूप करू, जोरदारपणे करू, कारण आम्ही हिंदीत पारंगत नाही,अशावेळी आमच्या सा-या आशा आमच्या वाचकांवर येवून थांबतात, की जे आम्ही वाचतो ते इतरांनाही देवू. त्यांनी आमच्या सोबत लिहावे आणि आम्हाला मजबूतीने उभे राहण्यास मदत करावी, कारण तेंव्हाच तर आम्हाला जाणवेल की, 'हिन्दी हैं हम वतन है, हिन्दुस्तां हमारा...'

हिंदी इंग्रजी सारखी मादक नाही परंतू मजबूतीने टिकून राहण्याची शक्ति तर ठेवतेच, त्यामुळे आपण आमच्या चुका बाजूला ठेवून आमचा उत्साह वाढवा आणि आमची प्रिय भाषा हिंदीला युवर स्टोरी हिंदी च्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी द्या.

लेखिका -श्रद्धा शर्मा, संस्थापिका व संपादिका, युवर स्टोरी मीडिया

अनुवाद : नंदिनी वानखडे - पाटील