चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयाचा नागरिकांना मोठा फायदा

महानगरपालिका व नगरपालिकांची विक्रमी 1074 कोटींची कर वसुली-- मनीषा पाटणकर-म्हैसकर

चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयाचा नागरिकांना मोठा फायदा

Monday November 21, 2016,

2 min Read

गेल्या बारा दिवसांत राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांची विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1 हजार 74 कोटी 21 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका 322 कोटी तर पुणे महानगरपालिका 120 कोटी रुपयांची कर वसुली करुन आघाडीवर असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सचिव श्रीमती मनीषा पाटणकर- म्हैसकर यांनी दिली आहे.

8 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपासून एक हजार व पाचशे रुपये मूल्यांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा व थकबाकी भरण्यासाठी नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी या जुन्या चलनातील नोटा स्वीकारण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनास केली. मुख्यमंत्र्यांनी केलेली विनंती व जनतेची अडचण होवू नये यासाठी केंद्र शासनाने चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा नागरीकांकडून स्वीकारण्यास परवानगी दिली होती. नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांची कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशीही सकाळी 8 पासून ते मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेवण्यात आली होती. या संधीचा फायदा घेण्यासाठी राज्यातील नागरीक विविध करांचा भरणा व थकबाकी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.

image


महानगरपालिकानिहाय जमा झालेली रक्कम रुपये

महानगरपालिकेचे नाव 21 नोव्हें पर्यंत जमा रक्कम

बृहन्मुंबई महानगरपालिका 322 कोटी 6 लाख

नवी मुंबई महानगरपालिका 42 कोटी 5 लाख

कल्याण-डोबिंवली महानगरपालिका 52 कोटी 4 लाख

मीरा-भाईंदर महानगरपालिका 41 कोटी 34 लाख

वसई- विरार महानगरपालिका 17 कोटी 45 लाख

उल्हासनगर महानगरपालिका 30 कोटी 89 लाख

पनवेल महानगरपालिका 5 कोटी 65 लाख

भिवंडी-निजामपूर महानगरपालिका 15 कोटी 5 लाख

पुणे महानगरपालिका 119 कोटी 69 लाख

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 34 कोटी 94 लाख

ठाणे महानगरपालिका 38 कोटी

सांगली-कुपवाड महानगरपालिका 14 कोटी 44 लाख

कोल्हापूर महानगरपालिका 9 कोटी 18 लाख

अहमदनगर महानगरपालिका 7 कोटी 58 लाख

नाशिक महानगरपालिका 19 कोटी 16 लाख

धुळे महानगरपालिका 10 कोटी 75 लाख

जळगांव महानगरपालिका 10 कोटी 12 लाख

मालेगांव महानगरपालिका 6 कोटी 4 लाख

सोलापूर महानगरपालिका 21 कोटी 58 लाख

औरंगाबाद महानगरपालिका 59 कोटी 66 लाख

नांदेड-वाघाळा महानगरपालिका 12 कोटी 60 लाख

अकोला महानगरपालिका 4 कोटी 34 लाख

अमरावती महानगरपालिका 12 कोटी 36 लाख

नागपूर महानगरपालिका 20 कोटी 4 लाख

परभणी महानगरपालिका 63 लाख

लातूर महानगरपालिका 5 कोटी 36 लाख

चंद्रपूर महानगरपालिका 4 कोटी 38 लाख

राज्यातील सर्व नगरपालिका

(नगरपालिका प्रशासन संचालनालय) 136 कोटी 84 लाख

एकूण जमा रक्कम रुपये 1074 कोटी 21 लाख

याप्रमाणे व्यवहारातून रद्द झालेल्या जुन्या चलनाचा वापर करुन नागरिकांनी भरलेल्या करामुळे महानगरपालिका व नगरपालिकांची विक्रमी 1 हजार 74 कोटी 21 लाख रुपयांची करवसुली झाली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी जुन्या चलनातील नोटा 24 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याने नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्याकडील करांचा भरणा व थकबाकी जमा करावी, असे आवाहन नगरविकास विभागाच्या सचिव श्रीमती पाटणकर-म्हैसकर यांनी केले आहे.