चंदा कोच्चर प्रथम भारतीय महिला ज्यांना अमेरिकेत जागतिक कॉर्पोरेट नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला!

चंदा कोच्चर प्रथम भारतीय महिला ज्यांना अमेरिकेत जागतिक कॉर्पोरेट नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला!

Tuesday May 16, 2017,

3 min Read

आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्याधिकारी चंदा कोच्चर यांना जागतिक कॉर्पोरेट नागरीकत्वासाठी वूड्रो विल्सन पुरस्काराने वूड्रो केंद्र वॉशिंग्टन डिसी येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.

आयसीआयसीआयच्या प्रसिध्दीपत्रकानुसार हा पुरस्कार कोच्चर यांना त्यांच्या सामान्यांच्या भल्यासाठी, जे तळागाळात काम करतात त्यांच्यासाठी केलेल्या निश्चयपूर्वक कामगिरीसाठी देण्यात आला आहे. “ यावरून हेच दिसून येते की, आयसीआयसीआय समूहाने किती चांगल्या प्रकारे श्रीमती कोच्चर यांच्या नेतृत्वात काम केले आहे. ज्यात स्थानिक लोकांच्या तसेच जगातील सर्वसाधारण लोकांच्या जीवनात बदल झाला आहे” असे त्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.


image


भारताच्या वतीने हा पुरस्कार स्विकारताना, महिला म्हणून आणि आयसीआयसीआय समूहाच्या प्रमुख म्हणून कोच्चर म्हणाल्या की, “ स्वातंत्र्योत्तर ६० वर्षापासून आमचा ग्रुप भारतात सेवा देत आहे, आम्ही आमच्या व्यवसायापलिकडे जात मागास दुर्गम भागातील शैक्षणिक प्रकल्पात, आरोग्याच्या बाबतीत किंवा कौशल्यविकासात आमचे योगदान देत आहोत. सध्या आम्ही कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मोफत देत आहोत, ते तांत्रिक व्यवसाय, विपणन तसेच कार्यालयीन कामकाज या विषयांतील आहे आणि १,३६००० पेक्षा जास्त लोकांना याचा फायदा मिळाला आहे. ज्यांना चांगला रोजगार मिळाला आहे.”

या पूर्वीचे या पुरस्काराचे मानकरी आहेत त्यात एपीजे अब्दुल कलाम आणि जे नारायण मूर्ती हे भारतीय तर हिलरी क्लिंटन आणि कोंडोलिसा राईस या अमेरिकन नागरीकांचा समावेश होता. कोच्चर यांना ‘सर्वप्रथम भारतीय महिला’ असे या पुरस्काराच्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे. त्या म्हणाल्या की, “ या पुरस्कार्थीच्या मागील याद्यांवर मी नजर टाकली असता, त्यांच्यापैकी मी देखील एक आहे हे पाहून सुखावले. ही खूप वेगळी आणि वैविध्यपूर्ण यादी आहे, त्यातून केवळ उपलब्धींचे अनेक प्रकार लक्षात येत नाहीत तर वूड्रो विल्सन केंद्राच्या अशा लोकांना शोधून त्यांच्या मानवी जीवनातील प्रत्येक अंगाला व्यापून टाकणा-या कामाला प्रशस्ती देण्याच्या मेहनतीचा देखील अंदाज येतो”.

विल्सन केंद्र, (www.wilsoncenter.org), ज्याला अमेरिकन कॉंग्रेसचा पाठिंबा आहे,येथे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांचा अधिकृत पुतळा आहे. हे असे व्यासपीठ आहे जेथे पक्षपात विरहित जागतिक प्रश्नाची दखल घेतली जाते, ज्यात स्वतंत्र शोध किंवा खुली चर्चा ज्यातून सक्रीय संकल्पना साकारल्या जातात आणि समाजाचे हित साधले जाते. विश्वस्तांच्या मंडळात थॉमस निडस हे अध्यक्ष म्हणून विल्सन केंद्राचे काम काज पाहतात. ते म्हणाले की, “ वूड्रो विल्सन पुरस्कार ही खास पर्वणी आहे, त्यांच्यासाठी ज्यांचे कार्य विचारवंत कार्य करण्यासाठी प्रेरक आहे. त्यात सक्रीय नागरीक, किंवा मौखिक प्रचारक अशा समाजातील लोकांना निवडले जाते. चंदा कोच्चर यांची आयसीआयसीआय समूहाला भारतात आघाडीवर नेण्यात महत्वाची भूमिका आहे हे सर्वज्ञात आहे, त्यातून महिलांना त्यांच्या कार्यकक्षा रुंदावण्यास मदत झाली आहे.”

आयसीआयसीआय समुहाने व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रमांवर मोफत प्रशिक्षण देण्यावर २४ प्रकारच्या व्यवसायात देशात भर दिला आहे. नुकतेच समूहाने सतरा राज्यातील शंभर गावांचा कायापालट ‘आयसीआयसीआय डिजीटल गावे’ म्हणून केवळ शंभर दिवसांत करून दाखविला आहे. त्यात ११,३०० नागरिकांना मौखिक प्रशिक्षण देण्यात आले, ज्यात ७५०० महिला होत्या. यामध्ये पत आणि पणनाच्या व्यवस्थांदेखील पूरविण्यात आल्या आहेत जेणे करून या व्यवसायांना गती मिळेल. डिसेंबर २०१७ पर्यंत अशा प्रकारच्या पाचशे गांवाची भर यामध्ये घालण्याचा आयसीआयसीआय बँकेचा प्रयत्न राहिला आहे.