गो-ग्रीनची हाक देणारी ugaoo.com

गो-ग्रीनची हाक देणारी ugaoo.com

Friday January 08, 2016,

3 min Read

गाव असो वा शहर... घरात छोटी-मोठी रोपं लावून जो तो आपला गार्डनिंगचा शौक पूर्ण करत असतो. गावात जागेची कमतरता नसते. तिथं अंगण हिरवंगार करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. गरज असते ती कल्पकतेची आणि योग्य हिरव्यागार रोपट्यांची. यातूनच मग डोळ्यांना अनोखी मेजवानी देणारी बागच गावाकडे अंगणात किंवा मग घराच्या मागे तयार करता येते. शहरात मात्र जागेची कमतरता. पण अशातच अनेकजण छंद म्हणून गार्डनींग करत असतात. छोट्या इमारतींपासून ते मोठ्या गगनचुंबी इमारतीपर्यंत अनेक छज्जे आपल्याला अशाप्रकारे हिरव्यागार रोपांनी सजलेले दिसतात. खिडक्या, त्यांची तावदाने आणि गॅलरीमधून डोकावणारी ही हिरवीगार रोपटी पाहिली की मन प्रसन्न होतं. चोहोबाजूंनी वाढत जाणारं सिमेन्टच्या जंगलात हिरवी रोपटी आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत असतात.

image


आता उगाऊ डॉटकॉमनं (www.ugaoo.com) आपल्या घरातले छज्जे आणि बागा अधिक हिरवी करण्याचा ध्यास घेतलाय. उगाऊ डॉटकॉम हे गार्डनिंग आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठीचं वन स्टॉप शॉप आहे. म्हणजे शेती आणि खासकरुन गार्डनिंगसाठी लागणारं सर्व साहित्य इथं उपलब्ध होतं, ते ही ऑनलाईन. यात प्रामुख्यानं बी-बियाणे उपलब्ध करुन देणे, गार्डनिंगसाठी लागणारी अवजारे आणि इतर साहित्य उपलब्ध करुन देणे, लावलेल्या झाडांची निगा कशी याची माहिती आणि त्यासंदर्भात लागणारी खतं आणि इतर गोष्टी उपलब्ध करुन देणं, गार्डनिंगवरची पुस्तकं आणि इतर माहिती आणि क्नॉलेज सेन्टरच्या माध्यमातून शेती आणि गार्डनिंग संदर्भातली अद्ययावत माहिती, हवामान आणि इतर आवश्यक असलेली माहीती उपलब्ध करुन देणं हे उगाऊ डॉटकॉमचं मुख्य कार्य आहे.

image


सिध्दांत भालिंगे यांनी उगाऊ डॉटकॉम सुरु केलीय. सिध्दांत लॅन्डस्कॅप आर्टिकेट आहेत. अनेक वर्ष त्यांनी अमेरिकेत अर्बन लॅन्डस्कॅपचं काम केलं. त्यानंतर या क्षेत्रातच भारतात काही करता येईल का याची चाचपणी करण्यासाठी मुंबई गाठली. नामदेव उमाजी एग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही सिध्दांतची वडिलोपार्जित कंपनी गेली १३० वर्षे एग्रो क्षेत्रात काम करत होती. पुणे आणि मुंबईत कंपनीचे आऊटलेटही आहेत. आता हा व्यवसाय पुढे नेण्यावर सिध्दांतने भर दिला आणि त्यातून उगाऊ डॉटकॉमची संकल्पना पुढे आली.

image


मुंबई आणि पुणेसारख्या शहरात टेरेस गार्ड़न आणि विंडो गार्डन दिसतात. पण त्यांची निगा कशी राखावी. कुठली झाडं लावावीत. काही लोक टेरेसवर पालेभाज्या आणि इतर काही झाडं लावतात. जेणेकरुन घरातल्या घरात सेंद्रीय फळे आणि भाज्या मिळतील. पण यासाठी योग्य मार्गदर्शन आणि बी-बियाण्याची माहितीचा अभाव होता. अऩेकजण या माहितीच्या अभावीच आपले छज्जे सजवत होते. यातूनच उगाऊ डॉटकॉमनं संधी ओळखली आणि आता ही सर्व माहिती आणि लागणारे बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी उगाऊ डॉटकॉम सज्ज झालंय.

image


१५ डिसेंबर २०१५ ला उगाऊ डॉटकॉम मुंबईत लॉन्च करण्यात आली. अगदी महिन्याभराच्या कालावधीत त्यांच्या ग्राहकांची संख्या ही ४५० वर जाऊन पोचलेय. सिध्दांत सांगतात ”लोकांना गार्डनिंगबद्दल आकर्षण असतं. अनेकजण याला फक्त शौक मानत नाहीत. तर ते अगदी मन लावून हे काम करत असतात. अश्या लोकांना एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचं काम उगाऊ डॉटकॉमतर्फे करण्यात येत आहे. उगाऊ डॉटकॉम हे फक्त एक वेब पोर्टल नाही तर तर गार्डनिंग आणि फार्मिंगसाठी लागणारं परीपूर्ण सोल्युशन आहे.”

image


बी-बियाणे आणि शेतीविषयक अवजारे आणि माहिती देण्याबरोबरच आता क्नॉलेजसेंटर जास्त अद्यायवत करण्याचा त्यांचा मानस आहे. यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हवामान, त्या-त्या हवामानात पिकणारं पिकं, हवामानाची माहिती, त्यांचा अंदाज, त्यातून शेती आणि गार्डनमधल्या झाडांवर होणारे परिणाम अशी परिपूर्ण फार्मिंग कम्युनिटी सुरु करण्यावर उगाऊ डॉटकॉमचा भर आहे.

शहरात वाढत चाललेल्या मॉल्स आणि मोठमोठाल्या कॉम्प्लेक्समध्ये ही ग्रीनपार्कच्या संकल्पना विकसित होत आहे. यातून ग्रो-ग्रीनची हाक उगाऊ डॉटकॉमनं दिली आहे हे विशेष.

image


सध्या पुणे आणि मुंबईत उगाऊ डॉटकॉमचे आऊटलेट आहेत. पण पुढे देशभरात सुरु करण्याचा सिध्दांत यांचा संकल्प आहे. सध्या भारतातलं गार्डनिंग मार्केट हे 5000 कोटी रुपयांचं आहे. ते दिवसेंदिवस वाढत जातंय. यामुळं उगाऊ डॉटकॉमसारख्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.