थँलेसिमीयाच्या दु:खाला विसरून इतरांच्या जीवनात तिने जागविली आशेची ज्योत!

थँलेसिमीयाच्या दु:खाला विसरून इतरांच्या जीवनात तिने जागविली आशेची ज्योत!

Sunday October 18, 2015,

5 min Read

यशस्वी तेच होतात, ज्यांच्या स्वप्नात बळ असते,

पंखात काही नसते तरी, धैर्यात उभारी असते.

आज आम्ही आपली ओळख करून देत आहोत एका अश्या व्यक्तीशी जिने थँलेसिमीया मेजर सारख्या रोगाला कधीही आपल्या यशाच्या मार्गात अडसर होऊ दिले नाही. या वाघिणीने वास्तविक अर्थाने यश मिळवले आहे. ती एक कांदबरीकार आहे. तिला पुस्तकांचे बेहद प्रेम आहे. याशिवाय ती एक ब्लॉगर देखील आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्या चांगल्या जाणकार आहेत आणि त्याना आपण महिला असल्याचा सार्थ अभिमान आहे.


image


गाझियाबाद येथे राहणा-या ज्योती आरोरा यांनी या जीवघेण्या आजारासमोर गुडघे न टेकता आपली स्वप्ने साकारण्यासाठी याचाच एखाद्या आयुधाप्रमाणे वापर केला. त्यामुळे त्या आज एका अश्या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत जिथे पोहोचणे एखाद्याचे स्वप्न साकारण्यासारखे असते.

एनटिपीसी मधुन अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले वडील आणि आईच्या तीन अपत्यांपैकी एक ज्योतीच्या जन्मानंतर तीनच महिन्यात तिच्या पालकांना तिच्या या जीवघेण्या आजाराची कल्पना आली. त्यांचे वडील सांगतात की, ‘या व्याधीबाबत समजले त्यावेळी मानसिक धक्काच बसला.' परंतू त्यानी खचून न जाण्याचे धैर्य़ दाखवत तिचे सामान्य मुलांसारखेच संगोपन करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी ज्योतीला इतर मुलांसारखे अधिक वेळ शाळेत जाता आले नाही आणि सातव्या वर्गा नंतर त्यांना शाळेला रामराम करावा लागला. त्यानंतरही ज्योतीने हार मानली नाही आणि दूरस्थ माध्यमातून आपले शिक्षण सुरूच ठेवले’.गेल्या काही वर्षापासून त्याना प्रत्येक पंधरा दिवसांनी रक्ताचे शुध्दीकरण करावे लागते. सतत होणा-या या प्रक्रियेमुळे त्यांना शरीरात जमा होणा-या लोहाच्या मात्रेपासून बचाव करण्यासाठी आठवड्यातून चार ते पाच वेळा एक इंजेक्शन रात्रभर आपल्या शरीरात लावून घ्यावे लागते जे खूप यातनामय असते. असे असले तरी या सा-या आव्हानाना ज्योती पुरून उरल्या . त्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर दूरस्थ माध्यमातूनच इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयात पदवीपरिक्षा (एम ए)उत्तीर्ण केली. याशिवाय त्यांनी युरोपातून (यूके) सक्रीय लेखनाबाबतचा अभ्यासक्रमही यशस्वीपणे पूर्ण केला. ज्योती यांनी त्यानंतर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यास सुरूवात केली. या शिवाय काही नियतकालिकांकरीता लेखनही करण्यास सुरूवात केली. त्या सांगतात की, ‘मुलांना काही वेळ शिकवल्यानंतर मी काही वर्षे मु्क्त लेखिका आणि मजकूर विकसनाचे काम केले. त्यावेळी मी लहानग्यांसाठी प्राथमिक स्तरावरील पुस्तके लिहिण्यापासून बॉलीवूड आणि सत्यघटनांवर आधारीत 'नॉनफिक्शन' पुस्तकांचे पुनर्लेखनही केले. याच दरम्यान मी जुन्या इंग्रजी साहित्याच्या संपादनाचेही काम हाती घेतले होते.त्यात मी तीस पेक्षाही जास्त पुस्तकांचे संक्षेपीकरण करण्यात यश मिळवले’.


image


ज्योती यांना प्रारंभापासूनच पुस्तकांचे प्रेम होते त्यांना पुस्तके वाचायची खूपच आवड होती. त्यांचे स्वप्न होते की एक दिवस त्यांचे स्वत:चे देखील पुस्तक असेल आणि लोकांना ते वाचून आनंद मिळेल. काही काळ मुलांना शिकवण्याचे काम केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील एका रोजगार नियुक्ती देणा-या कंपनीसोबत काम करण्यास सुरूवात केली. असे असले तरीही थँलेसेमिया सोबत त्यांचा लढा सुरूच होता. परंतू त्यांनी त्यांच्यातील लेखिकेला जिवंत ठेवले. त्यामुळेच सन २०११ च्या प्रारंभी त्यांची पहिली इंग्रजी कादंबरी ‘ड्रिम सेक’ वाचकांच्या भेटीला आणण्यात यश मिळवलेच. त्यांची ही कांदबरी शारिरीक अपंगत्वाशी झुंज देणा-या लोकांच्या जीवनातील असुरक्षेच्या भावना आणि कटू अनुभवांवर आधारीत आहे.

त्यानंतर काही वर्षानी दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाने त्याना मनातून हादरवून टाकले आणि त्यांना दुसरी कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली.ज्योती सांगतात की, ‘मी दिल्ली बलात्कार प्रकरणाबाबत ऐकल्यानंतर मनातून हेलावले होते आणि मी दिल्लीत होणा-या निदर्शनांत सहभागी होऊ इच्छित होते.परंतु माझ्या प्रकृतीच्या कारणांमुळे माझ्यासाठी ते शक्य नव्हते. त्यामुळे मी बलात्कार पिडितेच्या दुर्दशा आणि तिच्या जीवनात येणा-या चढावउतार यावर आधारीत दुसरी कादंबरी ‘लेमन गर्ल’ लिहिली आणि स्वत:च प्रकाशित केली’. त्यांच्या या दोनही कादंब-याना वाचक आणि समिक्षकांनी गौरविले आहे. लेमन गर्ल बाबत सांगताना ज्योती म्हणतात, या कादंबरीची नायिका अत्याचार झाल्यानंतर आपली मूळ ओळखच हरवून बसते. असे असले तरी या धक्क्यातून तिला सावरण्यासाठी तिचा एक पुरूषमित्र तिला पूर्णत: सहकार्य करतो, परंतू तरीही तिला तिच्याशी झालेल्या या प्रसंगातून सावरता येत नाही.या कादंबरीतून आपण हेच पाहू शकतो कश्याप्रकारे लैंगिक अत्याचारग्रस्त महिला देखिल पुन्हा सन्मानाचे जीवन जगू शकते. त्याबद्दलचा अधिक तपशील देताना ज्योती सांगतात की, ‘यातील सारी पात्रे माझ्या मनातून मी साकारली आहेत. आणि मनोवैज्ञानिकतेच्या माझ्या अभ्यासातून त्यांना वास्तवात साकारण्यास मला खूपच मदत झाली’.


खरेतर पुस्तकांचे वाचन आणि लेखन त्यांच्या जीवनातील पहिली सर्वात प्रिय बाब आहे.परंतू त्या तंत्रज्ञान आणि उद्योजकतेबाबत देखिल तेवढ्याच तन्मयतेने बोलतात. त्यांचा ‘टेक्नोट्रिटस् डॉट कॉम’ या नावाचा ब्लॉग आहे. त्यामध्ये त्या वेगवेगळ्या मोबाइल फोन्स आणि तंत्रज्ञानातील विविध गोष्टींवर समिक्षा देतात. त्या अनेक संकेतस्थळांची समीक्षक म्हणूनही काम पाहतात. या गतकाळातील वर्षांमध्ये त्यांनी स्वत:ला मानसिकदृष्ट्या इतके मजबूत बनविले आहे की समोर येणारी आव्हाने त्यांना आता अगदीच किरकोळ वाटू लागली आहेत.

image


सन २०११ मध्ये ज्योती यांना त्यांच्या ब्लॉगवर लिहिलेल्या समिक्षेबाबत ‘सँमसंग मोबाइलर ऑफ द इयर’ म्हणून निवडण्यात आले. या पुरस्कारासाठी त्यांना देशभरातील निवडक वीस ब्लॉगर्स मधून निवडण्यात आले. या स्पर्धेत भाग घेणा-या त्या एकमेव महिला स्पर्धक होत्या. याशिवाय त्या एकमेव स्पर्धक होत्या ज्यांनी विज्ञानाचा अभ्यास न करताही साहित्यात पदवी प्राप्त केली होती. त्या सांगतात की, ‘याशिवाय मला माझ्या रोजगार नियुक्ती कंपनी कडूनही सन २०१४ च्या उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यासोबतच अलिकडेच दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित यांच्या हस्ते माझा सन्मान करून पुरस्कार देण्यात आला आहे.’


image


कधीही हार न मानता हिमतीने आणि धैर्याने पुढे जात राहणे हीच त्यांच्याकडील सर्वात मोठी जमेची बाजू आहे. अलिकडेच त्यांना जागतिक थँलेसेमिया दिना निमित्त वक्त्या म्हणून एका कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. योगायोगाने याच दिवशी त्यांचा वाढदिवसही असतो. ज्योती यांनी या संधीचा उपयोग या आजाराबाबत जनजागरण करण्यासाठी आणि या रोगाबाबत असलेल्या भ्रामक समजांना दूर करण्यासाठी केला. सध्या त्या आपल्या लेखणीशिवाय विविध माध्यमातून थँलेसेमिया बाबत जागरूकता वाढवण्याचे काम करत आहेत. या शिवाय ज्योती यांनी सन २०१२ मध्ये ‘थँलेसेमिक्स इंडिया एचिवर्स ट्रॉफी’ देखिल पटकावली आहे.


image


ज्योती यांची व्याधी आणि धैर्य़ाने त्यांनी तिच्याशी दिलेल्या लढ्याबाबत सांगताना त्यांचे वडील ओमप्रकाश आरोरा सांगतात की, ‘त्यांच्या वाढत्या वयामुळे त्यांच्यावर आता कोणताही उपचार करणे शक्य नाही.अगदी या आजारावरील एकमेव इलाज असलेल्या 'बोन मेरो ट्रांसप्लांट' चा पर्यायदेखिल अनेक अडचणी समोर आल्याने डॉक्टरांनी नाकारला आहे. त्या केवळ आपल्या दृढ इच्छाशक्तीच्या बळावर इतक्या वर्षापासून पुढे जाण्याची यशस्वी धडपड करत राहिल्या आहेत. हीच त्यांची प्रेरणा राहिली आहे.’

ते पुढे सांगतात की, ‘आई-वडील म्हणून आमच्यासाठी मुलीचे या रोगासाठीचे वेदनादायक इलाज पाहणे देखिल वेदनादायक आहे. तिला आठवड्यातून किमान पाचवेळा बारा तासांकरिता शरीरात इंजेक्शन टोचून घ्यावे लागते जेणेकरून शरीरात झपाट्याने वाढणा-या लोहाची मात्रा नियंत्रणात ठेवता यावी. या सा-या त्रासांना शरण न जाता तिने आपली सारी शक्ती आणि लक्ष शिकण्या-शिकवण्यावर केंद्रित करण्याचे प्रथम ठरवले आणि आता कादंबरी लेखन ब्लॉगिंग करून या स्थितीवरही मात केली आहे’. आपण ज्योती यांना त्यांच्या संकेतस्थळ ज्योती अरोरा डॉट कॉमवर संपर्क करु शकता.

image


    Share on
    close