कोईमतूरच्या या बसवाहकाला भेटा ज्याने लागवड केले तीन लाख वृक्ष!

0

४९ वर्षांचे योगनाथन हे कोईमतूरमध्ये बसवाहक आहेत, पण आज त्यांची ओळख सर्वत्र फारच वेगळ्या कामासाठी होत आहे. मागील तीस वर्षांपासून त्यांनी तीन लाख झाडे तामिळनाडूच्या ३२ जिल्ह्यात लावली आहेत. ८०च्या दशकात योगनाथन यांनी सातत्याने निलगिरीमध्ये होणा-या वृक्षतोडीबाबत जागृती सुरु केली आणि त्यावेळेपासून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. “ माझ्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी सोमवारी मी शैक्षणिक संस्थामध्ये जाऊन वृक्षारोपण करतो” योगनाथन म्हणाले.

या कामासाठी योगनाथन यांनी तीन हजारपेक्षा जास्त शाळांना भेटी दिल्या आहेत. त्यात त्यांनी वृक्षारोपण कार्यक्रम आणि पर्यावरण विषयक जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. त्यांनी ही काळजी घेतलीआहे की लावलेल्या प्रत्येक रोपट्याला शाळेतील मुलांची नावे दिली आहेत त्यामुळे त्या वृक्षांच्या संगोपनाची हमी मिळाली आहे” त्यांनी सांगितले.

“जेंव्हा मी मुलांना रोप लावायला सांगतो, मी त्यांचेच नाव त्याला देतो. समजा रामूने पुंगाईचे(भारतीय बीच) रोप लावले, मी त्याला रामूपुंगाईअसे नाव देतो.आणि ती मुले त्या झाडाची नातेवाईकासारखी काळजी घेतात आणि पाणी घालतात.”

कामावर नेहमी खाडे होत असल्याने योगनाथन यांची बसवाहक म्हणून सतरा वर्षात ४०वेळा बदली झाली आहे. त्यासाठी ते सांगतात की मी खाजगी कारणासाठी कधीच सुटी घेत नाही.

मागील काही वर्षांत त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत, त्यांच्या वरिष्ठांनी त्यामुळे त्यांना नेहमी सहानुभूती दिली आहे. योगनाथन यांनी मिळवलेल्या पुरस्कार आणि सन्मानामध्ये प्रामुख्याने ‘इको वॉरीअर अॅवार्ड’चा उल्लेख करावा लागेल, जो राज्याच्या पर्यावरण विभागाने दिले आहे. सिएनएन- आयबीएन रीअल हिरोऍवार्ड आणि पेरियार अॅवार्ड देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया