दुस-यांच्या सुविधेसाठी स्वत:चे घर विकून बनविले रुग्णालय, दुकान चालवून उदर निर्वाह करणारे हनुमान सहाय! 

0

वेळ, समाज आणि इतिहास त्या लोकांची आठवण ठेवत नाही, ज्यांच्याकडे सर्वकाही असते पण योगदान देशासाठी नसते. त्याशिवाय इतिहास त्यांना आठवणीत ठेवतो, ज्यांच्याकडे सर्वकाही असते परंतु ते देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात. अशा लोकांना स्वतःची काळजी नसते. त्यांच्यासमोर केवळ लक्ष्यच असते, ते म्हणजे दुस-यांच्या चेह-यावर हास्य फुलवण्याचे. आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी आपल्या करामतीने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांचे नाव हनुमान सहाय आहे. जयपूर पासून जवळपास ७०किमी अंतरावर शाहपूर शहराजवळील गाव लुहाकनामध्ये ते एक सामान्य किराणा दुकानदार आहे. मात्र, सहाय यांनी जे काम केले ते खरच असाधारण आहे.

ही पाच वर्ष जुनी गोष्ट आहे, जेव्हा बिहारच्या पटनामध्ये दुकान चालविणारे हनुमान सहाय आपल्या आजारी वडिलांना बघण्यासाठी आपल्या गावी आले होते. शेजारील घरातील महिला प्रसूतीच्या त्रासाने ग्रासली होती आणि लांब-लांब पर्यंत कुठलेही रुग्णालय नव्हते. सोबतच ते देखील रुग्णालयात पोहोचविण्यासाठी गेले होते आणि महिला संपूर्ण रस्त्याभर ओरडत होती. तेव्हा वडिलांनी देखील सांगितले की, गावात एक रुग्णालय असते, तर चांगले झाले असते. तेव्हा हनुमान सहाय यांनी निश्चय केला की, गावात आई-वडिलांच्या नावावर एक रुग्णालय उभारायचे. फक्त हेच की, हे रुग्णालय खासगी नसून सरकारी रुग्णालय असले पाहिजे. ज्यात मोफत उपचार होऊ शकेल. ‘युवर स्टोरी’ला हनुमान सहाय यांनी सांगितले की, “माझे वडिलोत्पार्जित घर होते, जे मी विकले. जयपूरमध्ये एक दुकान देखील होते, ते विकले आणि त्यानंतर जमीन विकत घेऊन गावात रुग्णालय बनविले. त्यामुळे जयपूरमध्ये देखील खूप फे-या मारल्या. मदतीसाठी अनेकदा मी त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जनता दरबारमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या सांगण्यावरून चिकित्सक विभागाने देखील मदत केली. 

काम तर चांगले होते, परंतु त्यासाठी पैसे कुठून येतील. एका सामान्य व्यक्तीसाठी रुग्णालयाचा हा प्रवास सोपा नव्हता. सहाय यांच्या डोक्यात एक कल्पना आली. कल्पनेला सत्यात उतरविताना त्यांनी, शाहपूर शहरात दिल्ली-जयपूर हायवेवर एक हजार क्षेत्रात बनलेल्या वडिलोत्पार्जित घराला ७०लाख रुपयात विकले आणि अन्य आपले पैसे जोडून आपल्या गावात जवळपास एक कोटींच्या भांडवलातून रुग्णालय उघडले. रुग्णालयात २७खोल्या आहेत. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफसाठी राहण्यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. पाण्याची आणि विजेची व्यवस्था आहे. रुग्णालय बनून तयार झाले आहे, परंतु त्यात उपचारासाठी डॉक्टर कुठून येणार. हनुमान सहाय यांच्या नि:स्वार्थ मेहनतीला पाहून, गावातले देखील त्यांच्यासोबत सामील होऊ लागले. गावातल्या लोकांनी सरकारवर दबाव बनविला. सहा महिन्यांपासून सलग चिकित्सा विभागाच्या फे-या मारण्याचा परिणाम हा झाला की, राज्य सरकारकडून डॉक्टर आणि महिला डॉक्टरच्या नियुक्तीचे आश्वासन मिळाले आहे. चिकित्सा विभागाने सांगितले की, लवकरच मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे उद्घाटन करू शकतात. गावातले हनुमान सहाय यांच्या या समाजसेवी कामाने खूप खुश आहे. गावातले सरपंच दरियावड सिंह सांगतात की, “हनुमान यांनी जे अभियान सुरु केले आहे, त्यामुळे गावातले लोक खूप खुश आहेत. आम्ही देखील डॉक्टरांची व्यवस्था लावण्यासाठी त्यांच्यासोबत जयपूरला जाऊन जागोजागी भेटण्यात त्यांची पूर्ण साथ दिली. गावात रुग्णालय आहे, याहून चांगली बाब अजून काय असू शकते.”

हे रुग्णालय उघडल्याने जवळपासच्या गावाजवळील २५ हजार लोकांना त्याचा फायदा होईल आणि विशेषकरून महिलांना याचा फायदा होईल. लोकांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात पाणी आल्यावर गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. अशातच शहरात जाणे देखील कठीण होते. गावातल्या शाळेत शिकविणारे शिक्षक भगवत सिंह शेखावत हनुमान सहाय यांच्या या कार्याला सर्वात मोठी समाजसेवा मानतात.

“आजकाल कोण करतं समाजासाठी त्यांनी आपले सर्वकाही अर्पण आपल्या गावासाठी अर्पण केले. आम्ही त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही.” रोज स्कूटरने येतात, आपल्या दुकानातून आणि बसून रुग्णालय बनवितात...

असे म्हणतात की, मोठे काम तोच करतो, ज्याचे विचार मोठे असतात. असे असूनही काही लोक मोठे विचार तर करतात, परंतु त्याला करण्यासाठी ते योग्य दिशेने पाउल टाकत नाहीत. अशावेळी हनुमान सहाय अशाच अनेक लोकांसाठी प्रेरणास्रोत आहेत, ज्यांनी केवळ मोठे स्वप्नच पाहिले नाही तर, त्याला लक्ष्यापर्यंत पोहोचविले. ‘युवर स्टोरी’कडून हनुमान सहाय यांच्या जिद्दीला सलाम!

आणखी अशाच काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

वयाच्या ९१व्यावर्षी सुध्दा, स्वत: रुग्णाईत असताना ६४वर्षापासून डॉक्टर भक्ति यादव करत आहेत विनामुल्य सेवा-उपचार!

ऐशोआरामाच्या जीवनाचा त्याग करत समाजसेवा करणारे अर्थतज्ज्ञ

समाजाचा विरोध पत्करुन, अविनाश नकट यांनी पत्नीच्या तेराव्यात पैसे खर्च न करता, गावातील शाळेसाठी दिले दीड लाख रुपये ! 

लेखक : निरज सिंह
अनुवाद : किशोर आपटे