गरीबीचं दुष्टचक्र मोडणारी 'मॅजिक बस'

ज्याच्या मनात गोरगरीबांविषयी अपार करूणा आहे, जो दुस-याच्या दु:खाने दु:खी होतो, जो काहीतरी उद्दात्त करण्याच्या हेतूनं प्रेरित होऊन स्वतःला झोकून देतो अशा तरूणाच्य़ा देशसेवेची ही कथा आहे. त्या तरूणाचं नाव आहे, मॅथ्यू स्पॅसी. आपल्या लठ्ठ पगाराच्या नोकरीवर लाथ मारून रस्त्यावर रहाणा-या भटक्या मुलांचं जीवन घडवणारा सच्चा देशभक्त, सच्चा मानवतेचा दूत. याच प्रयत्नातून निर्माण झाली ‘मॅजिक बस ’. प्रगतीच्या आगारात घेऊन जाणारी ही बस, पावलं अडकलेल्या असहाय प्रवाशांना आपल्यात कशी सामावून घेत गेली ...या अद्वितीय प्रवासाची ही कथा आहे. ‘सामाजिक उद्योजक ’ ही संकल्पना राबवून उद्योजकांना प्रेरणा देणारी ही कथा म्हणजे प्रेरक शक्ती आहे.

गरीबीचं दुष्टचक्र मोडणारी 'मॅजिक बस'

Sunday August 23, 2015,

5 min Read


मनुष्याची खरी क्षमता म्हणजे त्याचं मन आणि त्याची विचार करण्याची शक्ती, ज्या शक्तीला योग्य प्रकारे कार्यान्वित केलं गेलं तर ती शक्ती चमत्कार घडवू शकते. अमेरिकेच्या पहिल्या अमेरिकन आफ्रिकी अध्यक्षांनी अतिशय योग्य प्रकारे सांगितले आहे, “ तुमच्याहून मोठ्या असलेल्या गोष्टीकडे जेव्हा तुम्ही तुमच्या गाडीला हिसका देऊन नेता, तेव्हाच तुम्ही तुमची खरी क्षमता ओळखता.” आणि मॅजिक बस जे काही करते ते नेमकं हेच आहे. गरीबीचं चक्र नष्ट करणं, एका वेळेला एकाच मुलाच्या संवर्धनाकडं लक्ष पुरवणं, आणि संपूर्ण जगाचं लक्ष मुलांभोवती केंद्रीत करणं; ह्या मूलभूत स्वरूपाच्या कामाला मॅजिक बसनं वाहून घेतलय.

आयुष्याचा सामना जिंकलेले खेळाडू

आयुष्याचा सामना जिंकलेले खेळाडू


हे सुरू कसं झालं ?


समाज आणि मुलांमध्ये बदल घडवण्याबद्दलची ही कथा आहे. या कथेच्या नावाप्रमाणं हा ‘ मॅजिक ' अर्थात जादूई उपक्रम आहे. भारताच्या राष्ट्रीय रग्बी संघाच्या एका तरूण खेळाडूच्या प्रवासाची, यशाची ही कथा आहे. मॅथ्यू स्पॅसी असं त्या खेळाडूचं नाव आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटसमोर स्ट्रीट चिल्ड्रेन जिथे खेळायची अशा रस्त्याच्या मध्यभागात मॅथू दररोज आपल्या खेळाचा सराव करायचा. मॅथ्यू स्वभावानं दयाळू असल्यानं तो फॅशन स्ट्रीटच्या आसपास असलेल्या रस्त्यावरच्या भटक्या मुलांना आपल्या खेळात सहभागी करून घ्यायचा. काही काळानंतर या मुलांमध्ये काही सकारात्मक, चांगले बदल झालेले मॅथ्यूला आढळून आले.

मॅथ्यूसारखा प्रशिक्षक लाभल्यामुळे रस्त्यावर वाढलेल्या या मुलांमध्ये या खेळाबाबत उत्सुकता निर्माण झाली. आयुष्यात काहीतरी करावं याबाबतची दृष्टी विकसित झाली हे मॅथ्यूच्या लक्षात आलं. या मुलांना या खेळात प्राविण्य मिळावं, शिवाय इतरांबरोबर कसं वागावं याची त्यांना समज यावी, त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडावी असंही त्याला वाटू लागलं. मॅथ्यूच्या लक्षात आलं, की या पद्धतीचा प्रभाव वाढवत नेल्यामुळं या मुलांना त्यांच्या गरीबीच्या चक्रातून बाहेर काढणं शक्य होतंय. याबरोबर वर्तमानातल्या वास्तवाला कसं तोंड द्यावं आणि वाटेत येणा-या अडथळ्यांना दूर करून आपलं कल्याण साधत यश कसं मिळवायचं हे ही मॅथ्यूनं त्यांना शिकवलं.

दहा वर्षांच्या अथक परिश्रमाच्या पाठबळावर मॅथ्यूनं या खेळाच्या प्रकाराला स्पष्टपणे औपचारीक अध्य़ापन शास्त्रामध्ये परावर्तीत केलं. याच विकासाच्या अभ्यासक्रमाला मॅजिक बस स्पोर्ट्स असं म्हणतात. हा एक असा दृष्टीकोन आहे जो अनेकांचं जीवन आणि भाग्य बदलण्याचं काम करत राहणार आहे.


काम करण्याची पद्धत


मॅजिक बस हा उपक्रम १९९९ या वर्षी सुरू झाला आणि आतापर्यंत तो २,५०,००० मुलं, ८००० तरूण आणि भारतातल्या तब्बल १९ राज्यांमध्ये कार्यरत करत आहे.

कॉक्स अँड किंग्ज या मॅथ्यूच्या भारतातल्या कंपनीनं मॅथ्यूच्या या उपक्रमाला पहिली मदत केली. त्यानंतर क्लियरट्रीप या कंपनीनं मदतीचा हात पुढं केला. या मदतीच्या बळावर मग मॅथ्यू आणि त्याच्या टीमनं स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट या दृष्टीनं आपले कार्यक्रम धडाक्यात चालवायला सुरूवात केली. हा दृष्टीकोण विविध वयोगटानुसार आखलेला आणि वैयक्तिकपणे प्रत्येक मुलाची गरज काय आहे हे ओळखून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा असा आहे.

प्रयत्नांची किक, यशाचा गोल

प्रयत्नांची किक, यशाचा गोल


शिक्षण, आरोग्य आणि स्त्री पुरूष समानतेसाठी काम कसं करायचं याचं स्थानिक आणि वस्ती पातळीवरच्या मुलांना प्रशिक्षण देऊन मॅजिक बस मुलांना गरीबीतून वर येण्याचे विविध मार्ग आणि आपल्या आयुष्यावर ताबा कसा मिळवायचा यासाठी सक्षम बनवते.

विविध कार्यक्रम, खेळ आणि त्यांचा दीर्घ कालावधी असे मुलांना अनुकूल असलेल्या चाईल्ड फ्रेंडली कार्यक्रमाचा अंतर्भाव असलेला सर्वसमावेशक अभ्यासक्रमच या मॅजिक बस स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रस्तुत केला जातो. कालबद्ध मध्यांतरात प्रशिक्षक सतत खेळातल्या प्रगतीबाबत अभिप्राय देतो आणि योग्य ते बदल घडवता यावेत म्हणून मुलांची वागणूक कशी आहे याबाबत निरिक्षण करत असतो.

या कार्यक्रमाअंतर्गत जेव्हा मुलांची चांगली वाढ होते, तेव्हा त्यांना आपल्या आवडीच्या पुरक अशा दुस-या कार्यक्रमाशी जोडलं जाण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. हा कार्यक्रम मग त्या तरूणीला किंवा तरूणाला उच्च शिक्षणाची किंवा नोकरीची दारे उघडणा-या मार्गावर नेऊन सोडतो. या अद्वितीय कार्याचा परिणाम म्हणून २,५०,००० तरूणांना चांगलं जगण्याच्या साधनांचे पर्याय उपलब्ध झाले आणि त्यामुळं त्यांना चांगलं शिक्षण आणि उंचावलेले आरोग्य प्राप्त करून घेता आलं.

ही स्वयंसेवी संस्था वेगळी आहे – केवळ एका कार्यावर ही संस्था आपलं लक्ष केंद्रीत करत नाही. वेगऴ्या शब्दात सांगायचं तर या संस्थेला मूळं नाहीत, पण पुष्कळ फांद्या आहेत. विकासासाठी खेळाच्या शक्तीचा वापर करणं हा या संस्थेला लाभलेला एकमेव मार्ग आहे, पण लाभार्थी मात्र पुष्कळ आहेत. गरीब मुलांना केवळ गरीबीतून बाहेर काढणे इतकाच केवळ मॅजिक बस स्पोर्ट्स उपक्रमाचा उद्देश नसून या मुलांचे पालक आणि त्यांच्या कुटुंबियांची मनोवृत्ती आणि दृष्टीकोण बदलणं हा ही महत्त्वाचा उद्देश आहे.

या कारणासाठी संस्थेच्या उभारणीच्या दिवसात देखील संस्थेला वर्ल्डबँक डेव्हलेपमेंट मार्केटप्लेस अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं.


अडथळ्यांवर अशी केली मात


यश ही एक अशी क्षमता आहे जी जराही उत्साह कमी होऊ न देता अपयशांना पार करत करत प्रवास करत राहते. जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या वस्तीत येते आणि हवेत चेंडू उडवते, तेव्हा प्रत्येकजण त्या चेंडूकडं आकर्षिला जातो. खेळामुळं एकमेकांचं अनोळखीपण कुठल्याकुठ निघून गेलेलं असतं. हीच खेळाची ताकद आणि आकर्षण आहे.

असं असलं तरी, मुलींकडं बघण्याचा दृष्टीकोण हा प्रगतीच्या मार्गातला अडथळा ठरतो. कोणत्याही राज्यात जा, किंवा कोणत्याही प्रदेशात जा, मुलींकडं पारंपारिक दृष्टीनं बघण्याचा विषम दृष्टीकोण हा अडथळा कायम असतो. घरकामांच्या जबाबदारीतून मुक्त होऊन मुलींनी बाहेरच्या जगात वावरणं याबाबतचा समाजाचा दृष्टीकोण हा ही एक अडथळा आहे. या अडथळ्यांचा कार्यावर प्रचंड मोठा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी मॅजिक बस आपला कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी साधनं आणि कल्पकता यांचा वापर करते. यात गटागटामध्ये पालकांशी चर्चा करणे, घरोघरी जाऊन प्रचार करणे आणि मुलांच्या विकासाला मारक ठरतात असे नियम तोडण्यासाठी वस्ती वस्तीत सामने आयोजित करणे आणि मुलांच्या बालहक्कांबाबत जागरूक असलेला समाज तयार करणे अशा प्रयत्नांचा समावेश आहे.

केल्याने होत आहे, आधी केलेचि पाहिजे!

केल्याने होत आहे, आधी केलेचि पाहिजे!


अशा प्रयत्नांमुळे खूप चांगला फरक पडतो. जसं आता या मॅजिकल संस्थेच्या म्होरक्यानं चांगल्या कामाचं उदाहरण निर्माण केल्यामुळे उर्वरित संस्था निश्चितच समान इच्छाशक्ती असलेले नेते तयार करतील. हा डॉमिनो इफेक्ट आहे ( २८ सोंगट्यांचा खेळ ). श्री मॅथ्यू स्पॅसी यांनी आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि ते सामाजिक उद्योजक बनले. अनेकांचे जीवन बदलता यावे म्हणून संस्थेच्या स्वयंसेवकांनी आपली शिस्तबद्ध जीवनशैली बदलवून घेतली. ते म्हणतात, “ नव्यानं आशादायी विचार करता यावा म्हणून मी माझा जुना समज सोडून दिला, जेणे करून मला निदान मॅजिक बस करत असलेल्या हजाराव्या हिश्शाइतकं तरी काही करता येईल आणि यातून मी माझ्या मातृभूमीमध्ये, म्हणजेच माझ्या घरामध्ये – जो ह्रदय एक असलेल्या अनेकांचा देश आहे त्या माझ्या भारत देशात मी चांगले बदल घडवू शकेन.” 


लेखका विषयी थोडे


निधी सिंग या एनटीयू, सिंगापूर इथे कॉम्प्यूटर इंजिनियरींगच्या विद्यार्थी आहेत. शिवाय त्या yourstory.com च्या जागतिक लेखिका आहेत. कार चालवणे, सत्यघटनांवर आधारीत कादंब-या वाचणे, आणि संगीत हे त्यांचे छंद आहेत. एक दिवस त्या या जगात स्वत:चं स्थान निर्माण करतील अशी आशा त्यांना आहे. जेव्हा त्यांचे हाथ काही समाजोपयोगी कार्य करण्यासाठी व्यस्त नसतात, तेव्हा त्या तुम्हाला लिखाण करताना , प्रवास करताना, नाहीतर चॉकलेट आणि चीजवर ताव मारताना सापडतील.