१४ राज्यानी बंदी घालूनही तंबाखू अजिंक्य कसा राहतो ?

१४ राज्यानी बंदी घालूनही तंबाखू अजिंक्य कसा राहतो ?

Monday June 05, 2017,

2 min Read

जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखू विरोधी दिवसांची संकल्पना राबविली आहे, २०१७मध्ये ३१ मे या दिवशी ‘तंबाखू विकासाला अडसर’ या संकल्पनेनुसार हा दिवस पाळला जात आहे, कारण प्रति दहा माणसांत एकजण तंबाखू सेवनाने दगावतो आहे. तज्ञांनी राजस्थान सरकारला तंबाखू जन्य पदार्थांवर बंदीचा सल्ला दिला आहे, जे देशातील १४ राज्यांनी यापूर्वीच केले आहे. तंबाखूच्या व्यापारावर बंदी घालणे म्हणजे तिच्या वापरावर संपूर्ण बंधने आणणे असे होत नाही.

असे असले तरी राज्यात ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोक तंबाखूचे सेवन करतात, त्यामुळे येथे हे सुरू करण्याची योग्य जागा आहे. पवन सिंघल, जे राज्यातील ‘व्हाइस ऑफ टोबॅको’ चे कर्ताधर्ता आहेत, म्हणाले की, “हे वास्तव आहे की, केवळ राजस्थानात नाही तर अन्य काही राज्यांतही, अगदी तंबाखूवर बंदी असेल तरी येथे एक आवाज उठवला जात आहे ज्यात सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी करणारा कायदा राजस्थानात असावा.


image


या कायद्यानं तंबाखूच्या उत्पादनावर बंदी येत नाही, जर त्यांनी तंबाखूच्या पाकीटांवर आरोग्यविषयी सूचना दिल्या, आणि विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांना ती विकली नाहीत, किंवा शाळा किंवा शैक्षणिक संकूलापासून शंभर मीटरच्या परिसरात विकली नाहीत, त्यांना त्यांची विक्री करता येते. विशाल राव सर्जिकल ओंकोलॉजिस्ट म्हणाले की, “ जे काही सेवन केले जाते ते अन्न म्हटले जाते. अन्नसुरक्षा कायद्याच्या कलम २,३,४ नुसार ज्यावेळी तंबाखू चघळली जाते किंवा मुखात ठेवली जाते किंवा वापरली जाते, तीला अन्न समजले जाते. वेळोवेळी ही व्याख्या हवी तशी वापरण्यासाठी छेडछाड करून तंबाखूची विक्री केली जाते. त्यानी ती वेगळी विकण्यास सुरूवात केली आहे. ”

मात्र कुणाला तंबाखू खाण्यावर बंदी घालता येत नाही. आणि ज्यावेळी नियम आणि कायदा यांचे उल्लंघन होते, सरकारी कायद्यानुसार कारवाई करू शकते. प्रश्न असा आहे की, कुणी कशाप्रकारे माहिती दिली तर ग्राहक ती घेण्याचे थांबवतील. अगदी सरकारने यासाठी प्रयत्न केले की तंबाखू ही अन्न घटकांसोबत मिश्रण करुन विकता येणार नाही लोकांनी त्या पुढे जावून ती खरेदी करून मिश्रण करून खाण्यास सुरुवात केली.

त्यामुळे जरी कायदे केले, जोवर तंबाखू खाणारी माणसे आहेत आणि त्यांची ती न खाण्याची इच्छा होत नाही तंबाखू असेच अनेकांचे बळी घेत राहणार आहे.