सीमा सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला क्षेत्रीय अधिकारी ला भेटा; ज्यांची नियुक्ती ५१ वर्षांनी झाली आहे!

सीमा सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला क्षेत्रीय अधिकारी ला भेटा; ज्यांची नियुक्ती ५१ वर्षांनी झाली आहे!

Monday April 10, 2017,

2 min Read

५१ वर्षांनी प्रथमच, सीमा सुरक्षा दलाने ऐतिहासीक निर्णय घेतला आहे, आणि पहिल्या महिला क्षेत्रीय अधिका-यांची नियुक्ती केली आहे. तनुश्री परिख या २५ वर्षीय बिकानेर राजस्थान येथील बीएसएफ मध्ये प्रथमच अधिकारी दर्जाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. २०१४ मध्ये यूपीएससी ने घेतलेल्या अखिल भारतीय स्पर्धा परिक्षेतून त्यांची निवड झाली आहे. त्यांना ५२ आठवड्याचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले, गुप्त माहिती गोळा करणे, आणि प्रत्यक्ष सीमेवर लढणे जसे इतर जवानांना देण्यात येते.


image


तनुश्री यांना मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील टेकनूर येथील बीएसएफ अकादमी मध्ये दीक्षांत समारंभात नुकतीच पदवी बहाल करण्यात आली. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांच्या खांदयावर बिल्ला लावून त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना राजनाथसिंग म्हणाले की, “ मला आनंद आहे की सीमा सुरक्षा दलाला पहिल्या महिला क्षेत्रीय अधिकारी मिळाल्या आहेत, आणि मला अपेक्षा आहे की अशाच प्रकारे अनेक महिला-मुली देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आता पुढाकार घेतील.

तनुश्री यांनी अभिमान पूर्वक ६७अधिका-यांच्या पास आऊट परेडचे नेतृत्व केले. या ६७ पैकी ५१ जण थेट प्रवेश घेतलेले अधिकारी आहेत. या शिवाय इतर पदोन्नत झालेले अधिकारी आहेत. तनुश्री यांची नियुक्ती भारत-पाक सिमेवर पंजाब मध्ये केली जात आहे, तेथे त्यांना सहायक कमांडंट म्हणून काम करायचे आहे. १९६५ मध्ये सीमा सुरक्षा दल बीएसएफ ची स्थापना झाली. आणि त्यांचे प्रमुख काम देशाच्या भारत आणि पाक तसेच बांग्लादेश दरम्यान असलेल्या सीमेची सुरक्षा करणे हे आहे. बीएसएफ च्या सेवेत २.५लाख सैनिक आहेत, जे देशाच्या सीमांवर काम करतात. भारतीय लष्कराशिवाय, बीएसएफ हे दल जमीनीवर, पाण्यात आणि हवेतही काम करते. याबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की, “ बीएसएफ हे केवळ संरक्षणाची पहिली रेषा नसून पहिली भिंत आहेत.”

भारतातील सर्वात आदर मिळवणा-या दलांमध्ये या पूर्वी केवळ पुरूषांची मक्तेदारी होती, आता त्यात महिलांचा समावेश झाल्याने या क्षेत्रातही महिलांसाठी नव्य संधीची दालने खुली झाली आहेत.

(थिंक चेंज इंडिया)

    Share on
    close