अर्बन क्लॅपच्या स्टार्टअपसोबत रतन टाटा सहभागी!

0

व्यावसाईक सेवाक्षेत्रातील संस्था ‘अर्बन प्लेस’ ने गुरुवारी घोषित केले की, रतन एन टाटा ‘टाटासन्स’चे अध्यक्ष सर्वेसर्वा यांनी व्यक्तिगतरित्या त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. नोव्हेंबर महिन्यात ‘अर्बन प्लेस’ने पंचविस दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे. बेसमेर व्हेंचर कॅपिटलच्या निधी उभारण्यासाठीच्या ब मालिकेत ही गुंतवणूक करण्यात आली आहे. सध्याचे गुंतवणूकदार एसआयएफ पार्टनर आणि ऍक्सेल पार्टनर यांनी देखील त्यात सहभाग घेतला होता.

अर्बंन क्लॅपचे संस्थापक रतन टाटांसोबत

ही कंपनी सन२०१४ मध्ये अभिराज भाल, वरूण खेतान आणि राघव चंद्रा यांनी स्थापन केली आणि अलिकडेच दहा दशलक्ष डॉलर्सच्या 'अ' फेरीतील भांडवल उभारणी एसऄआयएफ आणि ऍक्सेल पार्टनर यांनी जून महिन्यात केली. त्यांची गणती स्नॅपडिलचे संस्थापक कुणाल भाल आणि रोहित बन्सल यांच्याशी होते जे त्यांचे या आधीचे गुंतवणूकदार होते. रतन टाटा देखील स्नॅपडिलचे गुंतवणूकदार आहेत. अर्बन क्लॅप रतन टाटा यांच्या पाठिंब्याकडे बाजारातील एक सुवर्णसंधी (भारतीय बाजारात अंदाजे ५०दशलक्ष डॉलर्स) म्हणून आणि त्यांच्या चमूच्या क्षमतेची चाचणी म्हणून पाहते, ज्यांचे उद्दिष्ट “ सेवाक्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि सुक्ष्म उद्योजकांची नवी पिढी तयार करणे हे आहे.” रतन टाटा हे चोखंदळ गुंतवणूकदार आहेत आणि गेल्या वीस महिन्यात त्यांनी दहा भारतीय स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. अगदी अलिकडे टाटा ट्रस्टने खान अकादमीसोबत बहुदशलक्ष डॉलर्सची भागीदारी केली आहे, ज्यातून भारतीयांना मुक्त आणि सहजसाध्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यांची नोव्हेंबर महिन्यातील आणखी एक गुंतवणूक म्हणजे चेन्नईस्थित एक मोठा डाटा स्टार्टअप होय. क्रावोन डाटा आणि जागतिक टेलिकॉम वाहक सबसे टेक्नोलॉजीज् सध्या सहा शहरात कार्यरत आहे- एनसीआर, बंगळूरू,मुंबई,चेन्नई,पुणे, आणि हैद्राबाद- अर्बन क्लँप हे बाजारस्थळ आहे जेथून ८० प्रकारच्या व्यावसायिकांच्या सेवा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. जसे की प्लंबर, इलेक्ट्रिशियन,ब्यूटिशियन आणि योग शिक्षक. सध्या ते दावा करतात की त्यांच्याजवळ पंचविस हजार व्यावसायिकांचे नेटवर्क आहे. 

स्थानिक ऑनलाइन सेवेत जोमाने वाढ होत आहे. डोअर मिंट, लोकलओये, झिंबर, टास्कबॉब, हाऊसजॉय, अर्बनप्रो, टाईमसेवर्ज मि.राईट,आणि द मेक ओवर्ज इत्यादी काही स्टार्टअप आहेत, जे या क्षेत्रात आहेत. अर्बनक्लँप प्रमाणेच अनेकांनी यावर्षी सहभागिता करारातून भांडवल उभारले आहे. लोकल ओये'ने टायगर ग्लोबल आणि लाइटस्पिड व्हेंचर पार्टनर यांच्यासह एप्रिल महिन्यात उभारले आहेत पाच दशलक्ष डॉलर्स, तर अलिकडेच झिपरला विलीन करून घेणा-या टास्कबॉबने ओर्सिस मेफिल्ड आणि इतरांच्या मदतीने १.२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळवण्यात यश मिळवले आहे. हाऊसजॉयने मँट्रिक्स पार्टनर्स यांच्या मार्फत जून महिन्यातच चार दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळवली आहे.

(सूचना: रतन टाटा हे योर स्टोरीचे एक गुंतवणूकदार आहेत.)

लेखक: हरिश मल्या

अनुवाद : किशोर आपटे.