कानपूर जवळच्या गावात हिंदू आणि मुस्लिम जोडप्यांचे सामूहिक विवाह संपन्न

कानपूर जवळच्या गावात हिंदू आणि मुस्लिम जोडप्यांचे सामूहिक विवाह संपन्न

Monday March 13, 2017,

2 min Read

भारतात आजही धार्मिक तेढ मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, वेगळे धर्म असलेल्या लोकांना भारतात सहजीवनात सौहार्दाने आणि एकोप्याने कसे राहता येईल? जरी आम्ही धर्मनिरपेक्ष देशात राहात असलो तरी येथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्यांच्यात अजूनही खूप वेळा तणाव आणि गैरसमज आहेत जे वेऴोवेळी आपल्याला पहायला मिळतात. अशावेळी आपण असेही उदाहरण पाहू शकतो ज्यातून हेच शिकायला मिळते की आपण सारे मानव आहोत आणि यातूनच एक समंजसपणाची भावना तयार होते. 

फार वर्षापूर्वी कशाला, उत्तरप्रदेशातील रावतपूर या गावात नेहमीच तणावाचे वातावरण असायचे. मात्र एका सुंदर अशा क्षणाला एका भव्य दिव्य आणि सामुदायिक विवाह सोहळ्यातून हिंदू आणि मुस्लिम जोडप्यांचे विवाह कानपूर जवळच्या या गावात संपन्न झाले.


Image Source: Hindustan Times

Image Source: Hindustan Times


अशा प्रकारच्या आगळ्यावेगळ्या आयोजनाची संकल्पना मोहमद शकील यांनी मांडली.ज्यात हिंदू आणि मुस्लिम जोडप्यांचे विवाह लावण्याचा संकल्प होता. आश्चर्य म्हणजे गावच्या लोकांनी त्याला उचलून धरले आणि दहा जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्याची लगबग सुरू झाली. इतकेच नाहीतर हे आठ हजार गावकरी केवळ या लग्नात व-हाडी म्हणुन सहभागी झाले नाहीत तर यजमान म्हणून मिरवूनही घेतले. या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल बोलताना मोहमद ज्यांनी ही संकल्पना मांडली होती, ते म्हणाले की, “ मला वाटले नाही की लोक इतका सकारात्मक प्रतिसाद देतील. प्रत्येकाने याला समर्थन दिले. लोकांनीच सोहळयाची तयारी केली. आणि लग्नाच्या दिवशी बाजारपेठ बंद होती, जेणेकरून सा-यांना या लग्नात हजर राहता यावे. हे सारेच ह्रदयस्पर्शी होते.”

छोटे बाबू, नवरदेवांपैकी एक, त्यांनी सुध्दा याच सोहळ्यात पिवळे व्हायचे ठरवून टाकले, ते म्हणाले की, “हिच वेळ आहे सा-यांना दाखवून देण्याची की आम्ही सारे एक आहोत. ”

वैदीक ऋचांचे आणि कुराणाच्या आयतांचे पठण एकाच वेळी झाले. दोघेही हिंदू भटजी आणि मुस्लिम पेशइमाम यांनी विवाहसोहळ्याचे विधी पार पाडले. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वधू-वरांना शुभेच्छा देण्यात आल्या, त्यात दोन्ही समुदायांचे लोक सहभागी झाले. आणि पाहूण्यांनी जोडप्यांवर पूष्प पाकळ्यांचा वर्षाव केला. प्रेम आणि सौहार्दपूर्ण वातावरणात दोन्ही समुदायांच्या लोकांनी अद्भूत अशा यादगार सोहळ्यात सहभागी होवून जन्मांतरी लक्षात राहावे असे क्षण अनुभवले !