योग्य स्टार्टअप तेच आहे, जे यशाचा पाठलाग सोडत नाही, दोनदा अपयश आल्यानंतरही ‘अंशुल’ ने दाखवली हिम्मत!

योग्य स्टार्टअप तेच आहे, जे यशाचा पाठलाग सोडत नाही, दोनदा अपयश आल्यानंतरही ‘अंशुल’ ने दाखवली हिम्मत!

Monday February 08, 2016,

6 min Read

भारतात जर तुम्ही एखाद्या गोष्टीत अपयशी झालात, तर लोकांमध्ये न्यूनगंडाची भावना वाढते आणि जर एखादी महिला अपयशी झाली तर, परिस्थिती त्याहून अधिक वाईट असते. अंशुल खंडेलवाल या देखील यशाची चव चाखण्यापूर्वी दोनदा अपयशी झाल्या आहेत. ‘अपसाइड९’ हे अंशुल यांच्या स्टार्टअपचे नाव आहे. हे ऍप विकासासाठी स्टूडियो मॉडेल आहे. ‘अपसाइड९’ बाबत सांगण्यापूर्वी अंशुल यांनी सांगितले की, एक शक्तिशाली उद्योजक बनण्यापूर्वी त्यांनी आपल्या जीवनात चढ-उतार देखील पाहिले आहेत आणि त्या परिस्थितीत देखील त्यांनी शिकण्याचा प्रयत्न केला आहे.

image


२००६मध्ये अभियंता या अभ्यासक्रमात पदवी घेतल्यानंतर त्या बंगळुरुला आल्या आणि तेथे त्यांनी एका मोठ्या आयटी सर्विस कंपनीत काम करणे सुरु केले. मात्र, उद्योगाबाबत असलेली त्यांची आवड कधीच संपली नाही. जेव्हा त्या नोकरी करत होत्या, तेव्हा त्यांच्या मित्राने त्यांना सांगितले की, त्या गणिताचे अभ्यासवर्ग घेण्याचा का विचार करत नाहीत आणि त्यासाठी त्या इंटरनेटची मदत देखील घेऊ शकतात. वर्ष २००९मध्ये ‘‘अपसाइड९’ची स्थापना करणा-या अंशुल यांचे म्हणणे आहे की, “मी गणितात खूप हुशार होते, त्यामुळे मी आपल्या मित्रांसोबत मिळून अभ्यासवर्गाची सुरुवात केली. त्यासाठी अंशुल यांनी ‘एनसीईआरटी’च्या गणिताची पुस्तके जमविण्यास सुरुवात केली, ज्यानंतर त्यांनी आपल्या संकेतस्थळाच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरु केले. त्यांनी सर्वप्रथम आठव्या वर्गापासून ते दहावीच्या वर्गापर्यंत शिकविण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांच्या समोर जे प्रश्न यायचे त्या त्यांचे उत्तर देण्याचे काम करायच्या. त्याव्यतिरिक्त त्या एक धडा शिकविण्याचे काम देखील करायच्या. त्यासाठी त्यांनी प्रत्येक धड्यासाठी अडीचशे रुपयाचे शुल्क ठेवले होते. त्यांनी गणिताच्या वेगवगेळ्या उदाहरणासाठी एक ऑडियो फाईल देखील बनविली, ज्याला कुठल्याही एमपी३ प्लेयरवर डाउनलोड करून एेकले जाऊ शकत होते. अंशुल यांनी आपल्या या कामाची सुरुवात बंगळूरूच्या चार शाळांसोबत मिळून केली आणि आपल्या या कल्पनांचा हळूहळू विस्तार केला. अंशुल यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी गणिताचे सर्व धडे आपल्या आवाजात रेकॉर्ड केले, जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला कुठली समस्या आली तर, तो त्या ऐकून सोडवू शकेल. असे असूनही त्यांच्या समोर आव्हाने होती.

अंशुल यांचे म्हणणे आहे की, “आम्ही दिवसा काम करत होतो आणि संध्याकाळी पाच नंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होतो.” या प्रकारे दोन वर्षापर्यंत त्या आपल्या कामासोबतच स्टार्टअप चालवत होत्या. मात्र तेव्हा त्यांना दोन गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली ही की, जर बिजनेस मॉडेलने काम करणे सुरु केले तर, नोकरी त्वरित सोडली पाहिजे आणि आपले पूर्ण लक्ष आपल्या स्टार्टअपवर केंद्रित केले पाहिजे आणि दुसरी म्हणजे, कुठल्याही कामाला शिखरापर्यंत पोहोचविण्यासाठी मजबूत गट असला पाहिजे. अंशुल यांनी सांगितले की, “माझ्या जोडीदाराने मध्येच माझी साथ सोडली होती. त्यामुळे मी एकटी त्याला सांभाळू शकली नव्हती. या कारणामुळे वर्ष २००९मध्ये हे काम बंद करावे लागले.” अंशुल यांनी या उद्योगाला उभारण्यासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च केले होते, त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान अधिक झाले नसले तरी, या कामात त्यांचा वेळ आणि ताकद दोन्ही खर्च झाले. याप्रकारे त्यांनी आपल्या कल्पनेव्दारे पुढे वाटचाल करण्याची संधी गमावली.

असे असूनही अंशुल यांनी हार मानली नाही आणि आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवले. त्या २०१३पर्यंत आयटी क्षेत्रात सामील होत्या. तेव्हा त्यांनी खाद्यपदार्थांशी संबंधित उद्योग सुरु केला. त्यामार्फत त्या व्यावसायिक लोकांसाठी जेवण पाठवायच्या, जे रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचायचे. जवळपास दोन महिन्यापर्यंत काम केल्यानंतर त्यांना वाटायला लागले की, या कामात खर्च खूप अधिक येत आहे आणि आपल्या कल्पनेला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी खूप पैशांची गरज आहे. तेव्हा त्यांनी पाहिले की, सहा महिन्यांच्या बचतीचा पैसा यात खर्च झाला. अंशुल यांना जाणीव झाली की, प्रत्येक कल्पनेला शिखरापर्यंत पोहोचवले जाऊ शकत नाही, तर काही कल्पनांना घडविण्यासाठी आणि व्यवसायातील क्लिष्टतेला दूर करण्यासाठी खूप पैशांची गरज असते. त्याव्यतिरिक्त नियमित ग्राहकांचे असणे देखील खूप गरजेचे असते. एका अनुमानानुसार व्यवसाय तेव्हाच यशस्वी होऊ शकतो, जेव्हा एखादा ग्राहक महिन्यात कमीत कमी पाच वेळा जेवण मागवतो.

या अपयशानंतर अंशुल यांनी राजस्थानचा प्रवास केला आणि आत्मनिरीक्षण केले. या दरम्यान त्यांना जाणीव झाली की, त्यांनी आपल्या आयुष्याचे ८वर्ष आयटी क्षेत्रात काम केले. त्यामुळे या दिशेने वाटचाल करण्यासाठी अजून एक पाउल का वाढवू नये. प्रबळ इच्छा तर होतीच, शिवाय उत्साह देखील होता. अंशुल यांनी जुन्या चुकांमधून शिकत आणि पुढील रणनीती तयार करून पूर्णपणे उद्योजिका बनण्याचा निर्णय घेतला. आणि नंतर ‘अपसाइड९’ ची स्थापना केली, जो एक ऍप स्टूडियो आहे.

अपयशात देखील शिकवण घेणे हे देखील आपल्या कौशल्यात सुधारणा करण्यासारखेच आहे. जो जितक्या लवकर स्वतःमध्ये सुधारणा आणतो, तो तितक्याच जलदगतीने पुढे वाढतो. या प्रकारे वर्ष २०१४पर्यंत ही गोष्ट स्पष्ट झाली होती की, संपूर्ण जगाला ऍप पाहिजे आणि त्यासाठी असे अभियंते पाहिजे, जे त्यांच्यासाठी असे ऍप बनवतील. अंशुल यांनी जयपूरमध्ये एक दुकान उघडले आणि एंडरॉइड आणि आयओएसमध्ये सामील अभियंत्यांना एकत्र जोडले, जे जगभरातील ग्राहकांना सेवा देण्याचे काम करायला लागले. याप्रकारे ‘अपसाइड९’ ग्राहकांच्या विनंतीमुळे केवळ भारतातच नव्हे तर, अमेरिकेत राहणा-या लोकांसाठी देखील ऍप बनविण्याचे काम करायला लागले. अंशुल यांनी आपल्या या व्यवसायात १५लाख रुपयांची गुंतवणूक केली. ज्यामुळे त्यांना उत्पन्नदेखील मिळायला लागले आणि काळासोबतच ते आपल्या ग्राहकांकडून ऍप तयार करण्यापूर्वी शुल्क देखील घ्यायला लागल्या. हळूहळू कामाचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांनी आपल्या गटासोबत खूप विचारमंथन केले, जेणेकरून भारतीय ग्राहकांपर्यंत आपला अनुभव आणि सेवा पोहोचविल्या जाऊ शकतील. अंशुल यांच्या गटाने पहिला ऍप ‘केरोसेल’ नावाने बनविला. हे एक असे माध्यम आहे, जेथे कुठलीही व्यक्ती वापर करण्यात आलेल्या कुठल्याही सामानाला विकू शकते.

स्पर्धा

देशात वापरण्यात आलेली कार आणि इलेक्ट्रोनिक वस्तूंचा बाजार आहे. त्याच्या तुलनेत इतर किरकोळ क्षेत्रात इतकी गती नाही. अंशुल यांचे म्हणणे आहे की, “केरोसेल यांचे लक्ष लहान वस्तूंवर असेल, जसे पुस्तके किंवा इतर वस्तू. त्यांचे म्हणणे आहे की, बाजाराचे लक्ष इकडे वळले नाही आणि येणा-या काळात ते वाढण्याची खूप शक्यता आहे. टेक्नोपॅक नुसार, एकट्या देशात फँशनच्या सामानाचा बाजार जवळपास ३.४अब्ज डॉलर इतका आहे. ग्रीन डस्ट देशाची अशी मोठी कंपनी आहे, जी वापरलेले इलेक्ट्रोनिक सामान विकते. कंपनीने नुकतेच ४०दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूकदार येत आहेत आणि जर त्यांचे हे ‘बिजनेस मॉडेल’ यशस्वी ठरले तर, ‘अपसाइड९’ देखील गुंतवणूक प्राप्त करू शकतात. ‘अपसाइड९’ आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी देतात, त्यासाठी त्यांनी त्यांच्या विभिन्न संस्थेसोबत समझोता केला आहे, जे त्यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवतात. ‘करोसेल’ एक असे मंच आहे, जेथे ग्राहक विक्रीदारासोबतच मोलभाव करू शकतात. त्यासाठी ऍप मध्ये चँटिंगची व्यवस्था आहे. हे ऍप आयओएस सोबत एंडरॉइडमध्ये देखील समाविष्ट आहे. ‘अलीबाबा’ जी अब्ज डॉलरची चीनची कंपनी आहे, जेथे सामान विकणारे ग्राहकांकडे सरळ संपर्क साधू शकतात. ‘वजीर ऍडवाइजर’चे संस्थापक हरमिंदर सहानी यांचे म्हणणे आहे की, ‘या प्रकारचा व्यवसाय न केवळ ग्राहकांना आपल्या सेवा देण्यासाठी मदतीचा असतो, तर यामुळे गुणवत्ता देखील कायम राहते.”

अंशुल यांच्यासमोर मुख्य आव्हान आपल्या व्यवसायाला वाढविण्याचे आहे. असे असूनही ऍप सेवेमार्फत त्यांचे उत्पन्न वाढत आहे, तरी देखील ‘अपसाइड९’ च्या ऍपला विपणनाची गरज आहे. केरोसेल ऍपला गरज आहे, काहीतरी असे करण्याची ज्यामुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढेल आणि ते त्यांच्या उत्पादनाला विकत घेतील. कंपनीच्या प्रसिद्धीला तेव्हा धक्का लागतो, जेव्हा एखादे सामान चुकीच्या पद्धतीने वितरीत होते, किंवा तुटते. ‘आरीन कँपीटल’चे एमडी मोहनदास पै यांचे म्हणणे आहे की, “या प्रकारच्या व्यवसायात अनेक शक्यता आहेत, हा खूपच धोकादायक व्यवसाय आहे. मात्र, हे निर्भर करते व्यवसायाच्या क्षमतेवर, की ते कशाप्रकारे बाजारात आपली जागा बनवितात.” अंशुल यांनी आपल्या मागील स्टार्टअपपासून शिकले आहे की, उद्योगात शिकण्याची भूक शांत होता कामा नये. त्यात धोका पत्करण्याची भूख असली पाहिजे, नाहीतर त्या व्यवसायी नसत्या. ‘केरोसेल’ला दिल्ली आणि जयपूर व्यतिरिक्त दुस-या शहरांमध्ये देखील परीक्षण करण्याची गरज आहे आणि चार शहरात त्याने आपली पकड मजबूत केली तर, कंपनीला गुंतवणूक सहजरीत्या प्राप्त होईल.

युवरस्टोरी वरील यशोगाथा, प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.

वरीलप्रमाणे आणखी काही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

अपयशाचे विष पचवतच इंदूरच्या ‘विटीफिड’ला आले अमृताचे दिवस!

१००९ वेळेस नकार पचवल्यानंतर त्यांनी जगाला दिलं 'केएफसी' चिकन

स्मार्ट उपकरणांच्या बाजारपेठेत मोठा बदल घडविण्याचे ऍटमबर्ग टेक्नॉलॉजीचे लक्ष्य

लेखक : विशाल कृष्ण

अनुवाद: किशोर आपटे.