भेटा ‘मिस इंडिया’ला ज्यांनी आयएससीच्या बारावीच्या वर्गात ९७.२५ टक्के गुण मिळवले आहेत!

भेटा ‘मिस इंडिया’ला ज्यांनी आयएससीच्या बारावीच्या वर्गात ९७.२५ टक्के गुण मिळवले आहेत!

Monday June 05, 2017,

2 min Read

लखनौची कन्या पंखुडी गिडवानी, जी दुस-या क्रमांकाची सौंदर्यवती म्हणून फेमिना मिसइंडियामध्ये चमकली होती तिने ९७.२५ टक्के गुण २०१७च्या आयसीएस बारावीच्या परिक्षेत मिळवले आहे. मागील सप्ताहात हे निकाल जाहीर झाले, त्यात या १९ वर्षाची सौंदर्यवती स्पर्धेतील यशानंतर पुन्हा एकदा प्रकाशमान झाली आहे, पंखुडीने मिस ग्रॅण्ड इंटरनॅशनल २०१६ मध्ये भारताचे प्रतिनीधित्व केले होते आणि २५ व्या क्रमांकावर ८० देशाच्या स्पर्धकांतून तिची निवड झाली होती. तिने या स्पर्धेनंतर ‘आयएनआयएफडी मिस टॅलेंटेड’ ही स्पर्धा देखील जिंकली होती.


image


'ला मार्टीनीरी गर्ल्स हायस्कूल' लखनौची विद्यार्थीनी पंखूडी हिला २०१६मध्ये मंडळाची परिक्षा देता आली नाही, कारण तिला अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायचा होता. या युवतीने तिचा आनंद सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

“ माझे मित्र आणि हितचिंतक यांना सांगू इच्छिते की, माझी मडळाची परिक्षा देण्याचे राहून गेले कारण मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर मला मिस ग्रॅण्ड इंटरनॅ शनलसाठी तयारी करायची होती, त्यात मी ८० स्पर्धकातून २५वी आले, हेअभ्यास वर्षभर उशीरा करण्याची तडजोड स्विकारल्याने झाले, माझे सर्वस्व मी पणाला लावले आणि ९७.२५ टक्के हा निकाल हाती आला आहे”

पंखुडी पुढे सांगते,

“ त्यामुळे जे कुणी लोक समजत असतील की काही गोष्टी त्यांना करणे शक्य नाही, ज्या शैक्षणिक असोत किंवा तुम्ही ज्यावर प्रेम करता अशी स्वप्ने असतील, तुम्ही ती सारी पूर्ण करू शकता केवळ तशी प्रबळ इच्छा ठेवा, मेहनत आणि ख-या अर्थाने त्यासाठी समर्पित भावना असू दे”

याबाबत माध्यमांशी बोलताना ला मार्टीनीरी गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या आश्रीता दास म्हणाल्या की, “ मला बरे वाटले की स्पर्धा झाल्यांनतर पंखुडी परत आली आणि परिक्षा दिली, तिने तिचे माध्यमिक शिक्षण उत्तम गुण मिळवून पूर्ण केले आहे. यातून तिच्या मॉडेलिंगच्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे”

या तरूण मॉडेलला जी नुकतीच अनेक शोज मध्ये दाखल झाली आहे, किंवा टिव्ही कॅम्पेनमध्ये सहभागी होत आहे, तिचे या क्षेत्रात येण्यापूर्वी शिक्षण पूर्ण झाले आहे. असे याबाबत च्या वृत्तात म्हटले आहे. पंखुडी हिचे वडील दिपक यांनी देखील माध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त केला आहे.

“ हे फारच हर्षोल्हासाचे आहे, अष्टोप्रहर शुभेच्छा येत राहिल्या आहेत, माझ्या कन्येसाठी हा थरार असलेला अनुभव आहे. तिच्यासाठी हे देखील महत्वाचे आहे की शिक्षण आणि मॉडलिंगची कारकिर्द यात तिने ताळमेळ घातला आहे. तिने इतिहासात ९९ गुण मिळवले आहेत, आणि परफॉर्मिंग आर्टस शाखेत किंवा बॅॅचलर्स इन मास मिडिया मध्ये जाण्याचा संकल्प केला आहे.”