इनवेस्ट कर्नाटक आणि स्टार्टअपने सामाजिक बदल घडतो – रतन टाटा, कृष गोपालकृष्णन आणि कुमार मंगलम बिर्ला!

0

इनवेस्ट कर्नाटक सुरु होण्याच्या काही मिनिटांपूर्वी टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, आम्हाला धोरणाच्या बाहेर जाऊन स्टार्टअप आणि उद्योगांची मदत करायची आहे. त्यांनी सांगितले की, धोरणाबाबत घोषणा करायचे सोडून त्याची मर्यादा निश्चित केली पाहिजे.

दोन दिवसाच्या या कार्यक्रमात कर्नाटक सरकारचे लक्ष्य एक लाख कोटी रुपये जमविण्याचे आहे. ज्यात स्टार्टअप आकर्षणाचे मुख्य केंद्र तर आहेच, सोबतच त्यात दुस-या क्षेत्रातील प्रतिनिधी ज्यात अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण, जैव तंत्रज्ञान आणि उत्पादना संबंधित क्षेत्रातील लोक सामील झाले आहेत.

रतन टाटा यांचे म्हणणे आहे की, देशात ‘स्टार्टअप’ शब्द जेव्हा प्रसिद्ध झाला होता, त्यापूर्वी राज्यात अनेक लहान कंपन्या काम करत होत्या. त्यांनी जवळपास २५स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, कर्नाटकला आपले लक्ष आरोग्य आणि सामाजिक प्रभाव टाकणा-या कंपन्यांकडे वळविले पाहिजे. रतन टाटा यांनी सांगितले की, “बंगळुरू आणि त्याच्या जवळील सर्व सेवा देण्याचा काहीच फायदा नाही.”

नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी त्यांच्या या गोष्टीवर सहमती दर्शविताना सांगितले की, “विकास हा काही शहरांपर्यंतच सीमित राहता कामा नये. त्यांनी सांगितले की, “रतन टाटा यांनी आन्त्रोप्रिन्योरचे एक प्रमाण निश्चित केले आहे, मी विचार करतो की कर्नाटकात गुंतवणूक आणि स्टार्टअप भारतात एकमेकांसाठी पूरक असेल.”

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील(आयटी) दिग्गज आणि इंफोसिसचे माजी कार्यकारी अधिकारी क्रिस गोपालकृष्णन यांचे म्हणणे आहे की, प्रतिभेच्या बळावर राज्यात गुंतवणूक होत आहे, इतकेच नव्हे तर त्यांचे म्हणणे होते की, “मी आतापर्यंत ज्या आंतरराष्ट्रीय नेत्यांना भेटलो आहे, त्यांना कर्नाटकात येण्यास सांगितले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, येथे स्टार्टअप आणि आयटी सोडून देखील लोकांकडे अनेक संधी आहेत.

आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, त्यांचे लक्ष कर्नाटकात किरकोळ, उत्पादन, सिमेंट सोबतच स्टार्टअपवर देखील आहे.

“त्यांनी सांगितले की, आम्ही ५० वर्षापासून राज्यासोबत सहयोग करत आहोत. कर्नाटकात अधिक गुंतवणूक करण्यासाठी आमचे सध्या अनेक लोकांशी याबाबत बोलणे सुरु आहे, त्यामुळे यासंदर्भात सध्या काहीही बोलणे घाईचे ठरेल.”

बिर्ला यांनी सांगितले की, ते राज्यात खूपच जवळून डिजिटल क्षेत्राशी निगडीत स्टार्टअपला बघत आहेत, त्यांनी सांगितले की, “ आम्ही बंगळुरुत ई- कॉमर्स आणि डिजिटल कंपनीत गुंतवणूक केली आहे. आम्ही आशा करतो की, राज्यात स्टार्टअप आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक विकास करेल. राज्यात गुंतवणुकीबाबत बिर्ला यांनी सांगितले की, कर्नाटक योग्य दिशेने पुढे वाटचाल करत आहे. कर्नाटकचे लक्ष संपूर्ण राज्याच्या विकासावर आहे, केवळ निवडक शहरांवरच नाही. वर्तमानातील सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाबाबत त्यांनी सांगितले की, “मला याबाबत आशा आहे की, भारतात उत्पादन क्षेत्रातील विकास उज्ज्वल आहे. मला माहित आहे की, उत्पादन क्षेत्रात लक्ष केंद्रित करून भारताचा जलदगतीने विकास केला जाऊ शकतो.”

या गोष्टी बैठकीच्या ठिकाणी धोरण बनविणा-या लोकांना लक्षात येत होती.

मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचे यावर्षी हे स्पष्ट दिशानिर्देश आहेत की, कर्नाटकात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी. त्यांनी सांगितले की, राज्यात विकासाची शक्यता कायम आहे. आम्ही आशा करतो की, ‘इनवेस्ट कर्नाटक’मुळे यावर्षी बंगळूरुचाच नव्हे तर, राज्यातील मोठ्या क्षेत्रांचा विकास होईल.”

राज्याचे मंत्री आर वी देशपांडे यांनी उत्साहित होऊन सांगितले की, “कर्नाटक भारताची एक पुढे वाटचाल करणारी अर्थव्यवस्था आहे आणि हे जगात स्टार्टअप आणि बदलाचे केंद्र देखील आहे.” राज्य काही तांत्रिक सेवांमध्ये दुस-या राज्याच्या तुलनेत अधिक मजबूत आहे. कर्नाटकची एकूण लोकसंख्या ३.८ कोटी आहे, त्यापैकी १.३ कोटी लोक आयटी सेक्टर मध्ये काम करत आहेत. येथील विकासामुळे जवळपास २ कोटी लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळाला आहे. येथे जवळपास ५० लाख कामगार आहेत.

वित्त मंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, “या प्रतिस्पर्धात्मक संघवादाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होईल. पारदर्शकतेबाबत ज्या राज्याचा आलेख चांगला असेल, विजय त्यांचाच होईल”.

बंगळूरू मागील तीन वर्षापासून पाण्याची समस्या, विजेची समस्या आणि वाहतुकीच्या समस्येने त्रस्त राहिलेला आहे. त्याव्यतिरिक्त प्रत्येक दिवशी शहरात तीन नवे स्टार्टअप सुरु होत आहेत. एकट्या कर्नाटकचे टियर दोन शहरात पाचशे स्टार्टअपवर काम करत आहेत. राज्य सरकारला आवश्यकता आहे की, त्यांनी गुंतवणूकीबाबत दुस-या शहरांवर देखील लक्ष द्यावे, त्यासाठी महाविद्यालयासोबत सामंजस्य करार केला जाऊ शकतो. अशातच बंगळूरू सोबत दुस-या शहरात देखील विकास होईल, तेव्हा राज्याचा विकासदर एकसमान राहील.


अनुवाद: किशोर आपटे.