पालकांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बालकलाकार मौसमी मेवावाला बनल्या डिझायनर

0

आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचं याचा विचार मौसमी मेवावालाच्या डोक्यात घोळत होता. आईला एक खास तयार केलेली साडी भेट दिली तर? असा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि पहिल्यांदाच डिझाईनर होण्याची इच्छा त्यांच्या मनात आली. त्यासाठी त्यांनी महागातल्या कापडाचा शोध सुरू केला. त्यानंतर त्यांनी गुलाबी आणि लाल रंगाचं सॅटिनचं अत्यंत तलम असं कापड घेतलं. त्यावर काळं वेल्वेट आणि मोती रंगाची बॉर्डर लावून त्यांनी आईसाठी खूप सुंदर आणि दर्जेदार अशी साडी तयार केली.

२३ वर्षांच्या डिझायनर असलेल्या मौसमी यांना आजही त्या कौतुकाची आठवण आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या मौसमी आता पिंक पीकॉक कोचर या ब्रँडसह डिझायनर म्हणून काम करीत आहेत. ब्रँडच्या वेगळ्या नावाबद्दलही त्या सांगतात. गुलाबी हा त्यांचा आवडता रंग, पिकॉक अर्थात मोर या पक्षाला एक प्रतिष्ठा आहे आणि कृष्णासोबत मोर असतो अशी श्रद्धा असल्यानं त्याला एक धार्मिक महत्त्वही आहे, असं मोसमी सांगतात.

सुरूवातीला फक्त आईसाठी साड्या बनवण्याचा त्यांचा विचार होता. पण त्यानंतर भरभरुन प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी डिझायनर होण्याचा निर्धार केला. मुंबईमधून कॉमर्सची डिग्री घेतलेल्या मोसमी यांना फॅशनची सुरूवातीपासूनच आवड होती. त्यादृष्टीनेच त्यांचा पोशाखही असायचा. के मालिकांमध्ये मौसमी यांनी जास्तीत जास्तवेळा मुलीची भूमिका केलीये. तसंच मालिकेतील मुख्य कलाकाराच्या बालपणाच्या भूमिकेतही त्या दिसल्या. त्याचबरोबर इंडियन नॅशनल थिएटरच्या जलपरीच्या तीनशे प्रयोगांमध्येही त्यांनी काम केलंय.

चित्रीकरणादरम्यान अभ्यास करायचे असं मौसमी सांगतात. हिंदी आणि इतिहास या विषयांचा अभ्यास कठीण वाटायचा असं मौसमी सांगतात. पण आपल्या अभिनय क्षेत्राचा अभ्यासावर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतल्याचंही त्या सांगतात.


'क' नावावरुन सुरू होणाऱ्या प्रत्येक मालिकेत मौसमी यांची भूमिका होती. यात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या क्योकी सास भी कभी बहू थी, कुटुंब, कलश, कभी सौतन कभी सहेली यासारख्या मालिकांच्या मोसमी या अविभाज्य घटक होत्या.

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात न जाण्यापूर्वी त्याचं अधिकृत शिक्षण घेणं आता आवश्यक मानलं जातं. पण असं कोणतही शिक्षण न घेता मौसमी या यशस्वी डिझायनर बनल्या आहेत. प्रत्यक्ष अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही असं मौसमी सांगतात. तसंच आपण कामातूनच खूप काही शिकतो असंही त्यां सांगतात. त्याचबरोबर व्यवस्थापनातील पदवीमुळे खूप स्थिर होण्यास खूप मदत झाल्याचंही मौसमी यांना वाटतं. पण त्याचबरोबर प्रशिक्षणातून तांत्रिक बाबींची माहिती होते हे सुद्धा त्या मान्य करतात.

मौसमी यांना स्टायलिश राहणाऱ्या करीना कपूरचं खूप कौतुक वाटतं. करीना कोणत्याही प्रकारच्या पोशाखात छान आणि उत्साही दिसते असं त्या म्हणतात. बिकनी ते पारंपरिक घागऱ्यापर्यंत प्रत्येक पोशाखाला करीना न्याय देते असं मौसमी यांना वाटतं.

सध्याच्या डिझाईन ट्रेन्ड्सबद्दल सांगताना मौसमी यांना सध्याचे भारतीय-पाश्चिमात्य पद्धतीचे ड्रेस महत्त्वाचे वाटतात आणि हा प्रकार कायम राहणार असल्याचंही मौसमी सांगतात. पाश्चिमात्य पद्धतीच्या पोशाखावर भारतीय भरतकामाला कोणताच पर्याय नसल्याचंही त्या सांगतात. त्यामुळे देशाच्या सर्व भागांमधले कारागीर आपल्याकडे असल्याचं मोसमी सांगतात. डिझायनिंगच्या क्षेत्रात ई कॉमर्सच्या प्रवेशाचं मौसमी स्वागत करतात, पण एखाद्या व्यक्तीसाठी पोशाख शिवताना त्याच्या गरजा समजून घेणं आवश्यक असतं असंही त्या स्पष्ट करतात. अनेक तरुणी त्यांना लग्नात कसा पोशाख हवा याबदद्ल मोसमी यांच्याशी दोन दोन तास चर्चा करतात. पण डिझायनर लेबलच्या कपड्यांची ऑनलाईन खरेदी केली तर तुम्ही या सर्व गोष्टींना मुकतात असं मोसमी यांना वाटतं. वेल्वेट आणि सिल्क हे मौसमी यांचे सगळ्यात आवडते कपड्यांचे प्रकार आहेत. या कापडांची राजेशाही शोभा आणि झळाळी आपल्याला आकर्षित करते असं मौसमी सांगतात.

पिंक पिकॉक कोचरचं वैशिष्ट्य म्हणजे ते सिग्नेचर अर्थात त्या त्या ग्राहकाच्या मागणीनुसारच कपडे तयार करतात. अगदी जरदोशी कामातले विविध प्रकार ते रेशीम कलाकुसर असेल किंवा गोटा वर्क असेल मौसमी यांनी स्वत:ला डिझायनर म्हणून मर्यादित ठेवलेले नाही. याचा फायदा अर्थातच ग्राहकांनाही होतोच. ते त्यांच्या गरजेनुसार आणि हवं ते निवडू शकतात. मौसमी यांना तुम्ही जर विचारलंत की त्यांचा आवडता डिझायनर कोण तर क्षणाचाही विलंब न लावता उत्तर येतं, ‘मी स्वत:’

मौसमी यांना छोट्या पडद्यावर काम करण्याचा खूप अनुभव नाही...पण त्यांना कॅमेरासमोर यायला खूप आवडतं...पण डिझायनिंगसाठी अभिनय सोडणार का असा प्रश्नही त्यांना विचारला जातो.

मला अभिनय क्षेत्रात परतायचं आहे. पण मी परतायच्या आधी एक ते दोन वर्ष निर्णय घेईन. सध्या मात्र मला माझं डिझायनिंगमधलं कौशल्य वाढवण्यासाठी, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी भरपूर मेहनत करायची आहे, असं मौसमी यांचं मत आहे.

लेखक – शाश्वती मुखर्जी

अनुवाद – सचिन जोशी