'i-infinity.net' ! डिजिटल सायनेज् गुरू ! सर्व सुरू !!

'i-infinity.net'  ! डिजिटल सायनेज् गुरू ! सर्व सुरू !!

Saturday October 31, 2015,

4 min Read

ही गोष्ट म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. 'स्टार्टअप स्पाॅटलाइट' मालिकेची ती ‘मल्लिका’ आहे! डॉट कॉम/ डॉट नेट ( .com/.net ) डॉमेन द्वारे संचलित प्रेरक गोष्टींचे भांडार आमच्यासाठी खुले करणारी ती गोष्ट आहे. 'वेरीसाइन' (Verisign) कडून ही मालिका प्रायोजित आहे आणि या ‘पोस्ट्स’वर एकुणातील संपादकीय नियमन, नियंत्रण असते युवर स्टोरीचे !

'वेरीसाइन' हेच डॉट कॉम आणि डॉट नेट चे पायाभूत ऑपरेटर. अवघ्या जगाला वेरीसाइन ने मोठ्या विश्वासाने ऑनलाइन होण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

आता जाहिरातीची जादू कुठे चालत नाही... आणि असे काय आहे, जे जाहिरातीचे माध्यम ठरू शकत नाही? जाहिरात कुठूनही प्रसारित केली जाऊ शकते. तंत्रज्ञान आले, माहिती तंत्रज्ञान आले आणि मग त्याचा परिणाम जाहिरातींच्या झळकण्यावरही होणारच ना... म्हणून आता जाहिरातीही डिजिटल माध्यमातून जोमाने झळकू लागलेल्या आहेत.

‘ओओएच’ म्हणजेच ‘आउट ऑफ होम’ जाहिराती एकेकाळी स्वरूपाबाबत साध्या फलकापुरत्या मर्यादित होत्या. आता ‘ओओएच’चाही डिजिटलच्या दुनियेत प्रवेश झालेला आहे. भारतातच याचा एक मोठा अजब नमुना आपल्याला मुंबईमध्ये लोकल रेल्वेत बघायला मिळतो. ‘लोकल’मध्येही इथं तुम्हाला डिजिटल सायनेज आढळतील. महानगरांतले चौक तर डिजिटल सायनेज्‌ने कधीच काबिज केलेले आहेत. इतरही बरीच ठिकाणे आपल्या हक्काची करून घेतलेली आहेत.

आपण मुंबईत ‘ओओएच नेटवर्क’ लॉन्च करायचे, असे जेव्हा ‘फॉर्च्यून क्रिएटिव्ह मिडिया’ने (एफसीएम) ठरवले, तेव्हा ते (एफसीएम) कमालीचे बिनधास्त होते. कारण आपल्याला हवा तसा तांत्रिक भागीदार हमखास मिळेल, याची ‘एफसीएम’ला हमखास खात्री होती. डिजिटल सायनेज सॉल्युशन उपलब्ध करून देणे, नियमितपणे सॉल्युशन अपडेट करणे ही कामे तर हा तांत्रिक भागीदार करेलच, त्यासह लोकल रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना रंजक वाटेल, असा मजकूर व अन्य सामुग्रीही तो आपल्याला पुरवेलच पुरवेल, ही खात्री देखील अर्थातच होती.

image


मुंबईतील ‘आय-इन्फिनिटी’ ही कंपनी ‘एफसीएम’च्या या खात्रीच्या मुळाशी होती. ‘एफसीएम’ काय उगाचच बिनधास्त नव्हती. ‘आय-इन्फिनिटी’ ही डिजिटल सायनेज आणि होम ऑटोमेशनच्या क्षेत्रात माहिर असलेली कंपनी मुंबईत आहे आणि ती आपले काम शंभर टक्के बिनचुक आणि बिनतोड करणार आहे, यावर ‘एफसीएम’ला विश्वास होता. ‘आय-इन्फिनिटी’ने ‘एफसीएम’ला खंबीर साथ दिली आणि ‘एफसीएम’च्या खात्रीला कुठेही कात्री लागू दिली नाही. विश्वासही सार्थक ठरवला.

मुंबईतील तब्बल १० लोकल रेल्वेगाड्यांमध्ये ‘आय-इन्फिनिटी’ने ‘ओओएच नेटवर्क’ यशस्वीपणे सुरू केलेच. आता त्याचा पसारा तसेच डोलाराही आणखी वाढवण्याचे चाललेले आहे. (सरकार बदलल्याने त्याला जरा वेळ लागतोय.)

‘आय-इन्फिनिटी’चे आणखीही काही मोठे क्लायंट आहेत. उदाहरणार्थ ‘स्बॅरो’ (अमेरिकेतील पिझ्झा मालिका), ‘वीर ॲडव्हर्टायजिंग’ (मुंबईतील मिडिया कंपनी), ‘अँडेक्स ऑटोमोशन’ इत्यादी.

राकेश गलाव यांनी ‘आय-इन्फिनिटी’ची स्थापना केली. राकेश यांच्या गाठीला आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माहिती तंत्रज्ञान उद्यमक्षेत्रातील १७ वर्षांचा अनुभव आहे. तुर्कस्तान, फिलिपाइन्स, तैवान, कोरिया आणि चीनसारख्या देशांतून या क्षेत्रात त्यांनी काम केलेले आहे.

‘आय-इन्फिनिटी’साठी ‘कोअर टिम’ उभी करणारे पियुष वर्मा आणि सुरेश चौधरीदेखील अनुभवी आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि वित्त या दोन्ही क्षेत्रांतला दोघांचा अनुभव ३० वर्षांहून अधिक आहे. मुंबई हेच ‘आय-इन्फिनिटी’चे मुख्यालय आहे. लखनौ, ॲटलांटा आणि तैपेईमध्येही कार्यालये आहेत.

राकेश गलाव म्हणतात, ‘‘आम्ही ‘ॲम्बेडेड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट’, ‘ॲप्लिकेशन्स’ आणि ‘डाटाबेस’मधले विशेषज्ञ आहोत. लोकल रेल्वेगाड्यांमध्ये डिजिटल सायनेज सुरू करणे खरेतर सोपे नव्हते. आमच्याकडे तंत्रज्ञानातली बाप माणसे असल्यानेच आम्ही हे आव्हान पेलू शकलो व काम फत्ते करू शकलो.’’

‘डिजिटल सायनेज्‌’ म्हणजे नेमके काय असते? ...तर मॉल्स, हॉटेल्स, रुग्णालये, विमानतळ आणि मुख्य चौकासारख्या सार्वजनिक स्वरूपाच्या ठिकाणांवर ‘इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले डिव्हाइस’वरून जाहिराती, माहिती तसेच बातमी दाखवण्याचे एक माध्यम म्हणजे ‘डिजिटल सायनेज्‌’.

जगातले सगळ्यात छोटे आणि स्मार्ट असे सायनेज्‌ जगभरात केवळ आम्हीच विकसित केलेले आहे, असा राकेश यांचा दावा आहे. या इटुकल्या सायनेजला त्यांनी ‘मॅजिक बॉक्स’ हे नाव दिलेले आहे.

राकेश सांगतात, ‘‘आम्ही एरवीही जो पर्याय उपलब्ध करून देतो तो तुलनेत अधिक दर्जेदार आणि हलकाफुलका आहे. स्पर्धक कंपन्यांच्या सोल्युशनपेक्षा अधिक चांगले रिझल्टही आमचेच आहेत.’’

आमच्या वेबसाइटचा पत्ता (ॲड्रेस) i-infinity.net आहे, हे नमूद करून झाल्यावर... आणि आता मी ‘चॉइस ऑफ डोमेन’वर बोलतो आहे, असेही राकेश म्हणतात. ‘चॉइस ऑफ डोमेन’... म्हणजेच ‘डॉमेन’च्या निवडीविषयी ते सांगतात, की .comलाच खरंतर त्यांची पहिली पसंती होती, पण ते इथे उपलब्ध नव्हते म्हणून मग .netच घ्यावे लागले. नेटवर्कवर आधारलेल्या डिजिटल सायनेज सेवाही आम्ही देतो आणि .netया संकल्पनेबरहुकूम व्यवस्थित काम करते.

‘होम ऑटोमेशन’मध्ये तर ‘आय-इन्फिनिटी’ची आता मातब्बरी आहे. ‘आय-इन्फिनिटी’ने XLIT सारखे स्मार्ट डिव्हाइस तयार केलेले आहे.

XLIT डिव्हाइसच्या मदतीने युजर (डिव्हाइस खरेदी करणारा ग्राहक) लाइटसह घरातील अन्य इलेक्ट्राॅनिक्स उपकरणे आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून चालू-बंद करू शकतो.

‘आय-इन्फिनिटी’ आता आपला विशेष भर XLIT डिव्हाइस या उत्पादनावर देणार आहे.

एकुणात ‘आय-इन्फिनिटी’ कंपनी ‘होम ऑटोमोशन’वर लक्ष केंद्रित करणार आहे. भांडवलाची उभारणी त्यासाठी सुरू झालेली आहे. ज्या वेगाने कंपनी पुढेच पुढे चाललेली आहे, त्याला द्रुतगती म्हणता येईल. कंपनी बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण करेलच, त्यासह मती आणि गतीच्या बळावर प्रगतीही गाठेल. किंबहुना पुढेही प्रगतीचा एक स्वतंत्र पथ निर्माण करेल... अगदी आपल्या नावाप्रमाणेच... अनंत काळासाठी...