या हैद्राबादी रिक्षावाल्याच्या निरपेक्ष वर्तणूकीने जगातील मानवतेचा विश्वास दुणावला आहे!

या हैद्राबादी रिक्षावाल्याच्या निरपेक्ष वर्तणूकीने जगातील मानवतेचा विश्वास दुणावला आहे!

Friday April 21, 2017,

2 min Read

दररोज आपल्याला समूह संपर्क माध्यमातून अनेक प्रकारच्या नकारात्मक बातम्या पहायला मिळतात, आणि आपण मानवता, दयाळूपणा, आणि जागतिक स्थैर्य आणि शांती याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त होतो. असे असले तरी इथे अशा देखील घटना आहेत ज्यातून तुमचा माणूसकीवरचा विश्वास दृढ होवू शकेल. याचे जीवंत उदाहरणच द्यायचे झाले तर नुकतेच एक ऑटो-रिक्षा चालक बाबा आणि वारिजाश्री वेणूगोपाल बेंगळूरूच्या गायिका आणि बासरीवादक यांच्या बाबतीत हैद्राबाद येथे घडलेल्या या घटनेबाबत सांगता येईल. वारिजाश्री या प्रसिध्द बासरीवादक एच एस वेणूगोपाल यांच्या कन्या देखील आहेत.


image


वारिजाश्री, हैद्राबाद येथे व्हिसा मुलाखतीसाठी गेल्या होत्या,त्यांच्याजवळ पैसे कमी होते. त्यांना व्हिसा शुल्कासाठी पाच हजार रूपयांची गरज होती आणि त्यांच्या जवळ केवळ दोन हजार रूपयेच होते. ऑटो रिक्षा चालक बाबा ज्यांनी त्यांना या एटीएम मधून त्या एटीएम पर्यंत फिरवले स्वत:हून निरपेक्षपणे बाकीचे पैसे त्यांना देण्यास तयार झाले, जे त्यांनी बचत करून ठेवले होते. या बोलीवर की ज्यावेळी त्यांचे काम करून त्या हॉटेलवर परत जातील तेंव्हा ते परत करतील.

वारिजाश्री यांनी फेसबूकवर पोस्ट केले आहे की, त्याना या कृतीबाबत दयाळूपणाबाबत आणि उदार मानवतेबाबत काय वाटले. त्यांनी म्हटले आहे की, “ हे बाबा आहेत,ऑटो चालक हैद्राबाद येथील. बाबा यांनी त्या दिवशी माझा दिवस वाचविला. मी येथे व्हिसा मुलाखतीसाठी आले होते, आणि माझ्या जवळ दोन हजार रूपये कमी होते. मला व्हिसा शुल्कासाठी पाच हजारांची गरज होती आणि माझ्याजवळ केवळ दोन हजारांच्या आसपास पैसे होते. आम्ही किमान १० ते १५ एटीएम मध्ये फिरलो, मात्र काहीच हाती लागले नाही. हैद्राबाद येथील सा-या एटीएमचा काहीतरी मोठा घोळ झाला होता, मी काही दुकानदारांना जे एटीएमच्या बाजूलाच होते विनंती करून पाहिली. की त्यांनी माझे कार्ड स्वाइप करून मला पैसे काढून द्यावे. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. बाबा यांनी माझी हतबलता पाहिली, आणि स्वत:च्या बचतीमधून मला तीन हजार रूपये देण्याची तयारी दर्शवली. आणि म्हणाले की, “ मॅडम आप इसको यूज करलो और हॉटेल के पास वापस कर दो कोई बात नही” ( मँडम आपण हे आता वापरा आणि हॉटेलवर गेल्यावर मला परत करा, काही हरकत नाही. ) मला आश्चर्यच वाटले, त्यांच्या दयाळूपणाचे आणि या अनोळखी माणसा बद्दल ज्याला मी पूर्वी कधीच भेटले नव्हते मला आदर वाटला. त्यांनी निरपेक्षपणे अनोळखी व्यक्तीला मदत केली होती. मी ते स्विकारले. होय, परमेश्वर कधीतरी अशाच अनोळखी आणि अकस्मात पध्दतीने तुम्हाला भेटतो, हा जीवनाचा धडा मी शिकले आहे! मला तुमच्यात एक सन्मानजनक मित्र पहायला मिऴालाय बाबा, धन्यवाद मला माणूसकीची आठवण करून दिल्याबद्दल जी सर्वात मोठा धर्म आहे.