विश्व आरोग्य संगठनच्या माॅरीशस येथील जागतिक बैठकीसाठी ललित गांधी यांची निवड

विश्व आरोग्य संगठनच्या माॅरीशस येथील जागतिक बैठकीसाठी ललित गांधी यांची निवड

Wednesday October 19, 2016,

1 min Read

“ विश्व स्वास्थ संगठन” (WHO) च्या वतीने असांक्रमक रोगांसाठी म्हणजेच कॅन्सर, हृदयरोग व मधुमेह या रोगांवर नियंत्रणासाठी २०३० पर्यंतचे जागतिक धोरण ठरविण्यासाठी, १९ ते २१ ऑक्टोबर या कालवधीत माॅरीशस येथे जागतिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील १९२ देश सदस्य असलेल्या “विश्व स्वास्थ संगठन” तर्फे जागतिक आरोग्य विषयक धोरणात्मक निर्णय व दिशानिर्देश देण्यात येत असतात.

image


जागतिक स्तरावर कॅन्सर, हृदयरोग व मधुमेह रुग्णांची वाढत असलेली संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची चर्चा करणे, सदस्य देशांमध्ये हे धोरण प्रभावीपणे लागू करणे व यासाठी अशासकीय सामाजिक संस्थांची भूमिका ठरवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.

ग्लोबल मारवाडी चॅरिटेबल फांऊडेशन (GMCF) या संस्थेतर्फे “ मिशन कॅन्सर कंट्रोल-इंडीया या प्रकल्पाच्या यशस्वी संचलनामुळे, संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांची या बैठकीसाठी भारतातर्फे निवड करण्यात आली आहे.

समाजाच्या सेवेसाठी राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली याचा विशेष आनंद असल्याचे सांगून, ललित गांधी यांनी या बैठकीचा भारतासाठी अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले.