बिल गेटस, जेफ बेकॉझ, जँक मा, मुकेश अंबानी यांची वातावरण बदलाविरुध्द लढण्यासाठी हातमिळवणी!

0

बिल गेटस, जेफ बेकॉझ, जँक मा, आणि मुकेश अंबानी ही गुंतवणूकदारांची जगातील सर्वात उच्च श्रेणीतील चमू आहे, या सा-यांनी एका कराराद्वारे  एकत्रित  येण्याचे आणि उर्जाउत्सर्जन निधी उभारण्याचे ठरविले आहे. एक दशलक्ष डॉलर्सचा हा निधी गुंतवून जागतिक हवामान बदलाच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी स्वच्छ उर्जा क्षेत्रात काम केले जाणार आहे.

वीस वर्षांच्या कालावधीसाठी हा निधी असेल,आणि उर्जाउत्सर्जन क्षेत्रातील ते एक अभिनव पाऊल असेल. हा जगातील २०अब्जाधिशांच्या कुटूंबाचा गट आहे ज्याने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विरोधी आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी गेल्या वर्षी पँरिस येथे हे पाऊल उचलले आहे. जागतिक हवामान बदलाविरोधात हा सामुहिक लढा असेल, आणि तापमानवाढी विरोधात अभिनव पध्दतीने लढला जाणार आहे. “असे काही ज्यातून स्वस्त, स्वच्छ, परवडणारी ऊर्जा मिळेल यासाठी आपण सारे खुल्या मनाने एकत्र येवून काम करू” बीईव्ही निधी चे अध्यक्ष यांनी सांगितले.

या आघाडीला आधीच अभिनव मोहिम असे संबोधन देण्यात आले आहे, ज्याद्वारे २० देश आणि युरोप यांनी शपथ घेतलीआहे की, येत्या पाच वर्षात त्यांचे स्वच्छ उर्जा क्षेत्रातील योगदान ते दुपटीने वाढवतील. ग्रीन हाऊस ऊत्सर्जनाचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या या प्रयत्नात, गेटस यांनी पाच आव्हाने असल्याचे मत नोंदविले आहे. त्यामध्ये वीज, बांधकाम, उत्पादन, वाहतूक आणि अन्न या क्षेत्रांचा समावेश होतो.

भविष्यात वातावरण बदलाचा फार मोठा धोका संभवतो. जुलै२०१६हा सर्वात उष्ण महिना होता ज्याची नोंद १८८०नंतर प्रथमच झाली आहे. त्यावेळीपासून याची नोंद ठेवण्यास सुरुवात झाली होती. १४ आणि १५ ही दोन वर्ष देखील २हजार सालानंतरची सर्वात उष्णतेची वर्ष म्हणून नोंद झाली आहे. वातावरण बदलावरील चर्चा ही प्रामुख्याने कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत होते, वाढते तापमान, आणि वाढणारी समुद्राची पातळी हे देखील या विषयात अंतर्भूत होतात. या प्रश्नाकडे महायुध्द, भुकंप किंवा त्सुनामीच्या संकटाप्रमाणे पाहिले जात आहे.