मालकाकडून दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना कार आणि प्लॅट गिफ्ट

0

सुरत मधील धनाढ्य हिरे व्यापारी सावजी ढोलकीया आपल्या कर्मचा-यांना दिवाळीच्या अजब अनोख्या भेट देण्यासाठी प्रसिध्द आहेत. हरे कृष्ण एक्स्पोर्टचे ते मालक असलेली त्यांची कंपनी जी हिरे आणि कापडाचा व्यवसाय करते, यंदा या कंपनीने सा-यांचे अंदाज खोटे ठरवत कर्मचा-यांना दिवाळी भेट म्हणून चारशे सदनिका आणि १२६० कार वाटल्या.

“यंदा आम्ही १७१६ कर्मचा-यांची निवड सर्वोत्तम कर्मचारी म्हणून केली. आम्ही ज्यांची आधीच कार आहे त्यांच्यासाठी घरे देत आहोत, आणि ज्यांना चारचाकी नाहीत त्यांना त्या देत आहोत”. सावजी यांनी सांगितले. कंपनी यंदा आपल्या स्थापनेचे पन्नासावे वर्ष साजरे करत आहे. दिवाळीचा बोनस म्हणून ५१ कोटी रुपये खर्च करत सावजी यांच्या कंपनीने घराच्या आणि कारच्या पाच वर्षांच्या कर्जाच्या हप्त्यांची पाच हजार कोटी रुपयांची जबाबदारी स्विकारली आहे.

हरे कृष्णमध्ये ५,५०० कर्मचारी काम करतात,आणि कंपनीची वार्षिक उलाढाल सहा हजार कोटींची आहे. मागील वर्षी कंपनीने भेट म्हणून ४९१ कार आणि दोनशे घरे कर्मचा-यांना दिवाळीची भेट म्हणून दिली होती. मागील वर्षी सावजी यांनी सांगितले होते की, “ आम्ही हि-यांना पॉलिश करणा-यांना कर्मचारी समजत नाही तर आमच्या कुटूंबाचा सदस्य मानतो कारण ते त्याच भागातून आले आहेत ज्यातून आम्ही आलो आहोत. आम्ही या भेट वस्तू त्यांना कंपनीत केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच देत असतो”.