स्त्रीवादाचा पुरस्कार करणारे काही 'रिअल हिरो'

0

जेव्हा आपण लिंग समजाविषयी बोलतो तेव्हा सर्वसामान्य भारतीय पुरुष हे स्त्रियांविषयी द्वेष बाळगणारे, आक्रमक आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवणारे आढळून येतात. ही धारणा दुर्दैवाने दुर्लक्ष करणाऱ्या लोकांमध्येदेखील आढळून येते. असे असले तरीही खालील पाच पुरुषांनी ही धारणा पूर्णपणे खोडून काढली आहे. भारतात प्रसिद्धीचे वलय असलेल्या काही लोकांपैकी निवडक लोकांची आम्ही माहिती देत आहोत. ज्यांनी त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करत लाखो लोकांसमोर आदर्श ठेवला आहे.

फरहान अख्तर

'देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून जेव्हा महिलांवरील अत्याचाराची बातमी ऐकायला किंवा वाचायला मिळते. तेव्हा मला प्रचंड संताप येतो आणि मी खुप निराश होतो', २०१४ साली एका मुलाखतीत फरहान अख्तर यांनी असे सांगितले होते. महिलांवरील अत्याचारांबद्दलच्या त्यांच्या या संतापाचे रुपांतर झाले ते 'मर्द' (MARD : Men Against Rape and Discrimination) या स्वयंसेवी संस्थेमध्ये. महिलांना समान वागणूक मिळावी तसेच त्यांना समाजात आदराने वागणूक मिळावी, याकरिता ही संस्था काम करते. फरहान यांच्या मुलाखतीतच त्यांची महिला अत्याचाराबद्दलची चीड दिसून आली होती.

'मर्द' संस्थेच्या माध्यमातून स्वतः शालेय तसेच महाविद्यालयीन युवांशी जोडले जाण्याचा फरहान यांचा मानस आहे. या त्यांच्या सातत्यपूर्ण कार्य़ाची दखल संयुक्त राष्ट्रसंघांनीदेखील घेतली होती आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या दक्षिणपूर्व आशिया विभागाच्या 'संयुक्त राष्ट्रसंघ महिला सदिच्छा दूत' म्हणून २०१४ साली त्यांची निवड करण्यात आली होती.

राहूल बोस
राहूल बोस

राहूल बोस – अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता

राहूल बोस, भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा. त्यांनी आपल्या कारकिर्दीत काहीशा वेगळ्या आणि अभिनव भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावरच त्यांनी चाहत्यांची मोठी फौज तयार केली. अभिनयाकरिता त्यांनी केलेल्या चित्रपटांची निवड, उदा. चमेली (शरीरविक्रीय करणाऱ्या महिलांवर आधारीत हा चित्रपट होता) तसेच सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा असलेला पुढाकार, या गोष्टींमुळे त्यांची ओळख पुरोगामी विचारसरणीचे तसेच हटवादी अशी झाली आहे. त्यांची स्वयंसेवी संस्था 'द फाउंडेशन' ही दुर्लक्षित गटांना पाठिंबा देते. याशिवाय Terres Des Homes यांच्या एका ध्वनि पुस्तकातदेखील आपले योगदान दिले आहे. गुदगुल्या करणे, मिठी मारणे, स्पर्शाचे नियम (Tickle and hugs: Learning the rules of touching) या विषयावर त्यात मार्गदर्शन करण्यात आले असून, लहान मुलांना लैंगिकशिक्षणाबद्दल जागरुक करण्यात आले आहे. याशिवाय स्त्री-पुरुष समानतेच्या विषयावर त्यांनी ऑक्सफर्ड येथे लेक्चरदेखील दिले आहे.

सलमान रश्दी

यांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. हे लेखक स्वतःच्या हक्कांबाबत क्रांतिकारी विचारांचे आहेत आणि त्यांचे हे वागणे संतापजनक आणि क्रांतिकारी असे संबोधले जात असे. त्या वेळेस ते स्वतः पुरोगामी असे संबोधत होते. 'हो, त्याशिवाय काय असेल? एकतर तुम्ही स्त्रीवादी असाल किंवा गाढव. निवड ही अखेरीस तुमची आहे. मला तीन बहिणी आहेत आणि एकही भाऊ नाही. माझ्या कुटुंबात सर्व स्त्रियाच आहेत आणि त्या सर्वजणी खंबीर, सामाजिक आणि व्यावसायिक महिला आहेत. त्यांची अडचण म्हणजे त्यांची तुलना कायम पुरुषांशी केली जाते, जी संकल्पना हास्यास्पद आहे आणि जर तुम्ही त्यांना त्याबद्दल सल्ला द्यायला गेलात तर नक्कीच फटकारले जाल. त्यामुळे मी खूप लहानवयातच हे समजून गेलो होतो', असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

अश्विन मुश्रण – अभिनेता, विनोदवीर आणि स्त्रीवादी

एक असे अभिनेते जे कायम त्यांच्या विनोदी भूमिकांकरिता नावाजले जातात मात्र यावेळेस ते स्त्रीवादावरील त्यांच्या भूमिकेमुळे नावाजले गेले आहेत. स्त्रीवादावर आपली भूमिका सखोलपणे मांडताना ते सांगतात की, 'माझ्याकरिता स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांच्या हक्काकरिता आणि स्त्री-पुरुष समानतेकरिता उभे राहणे. तेही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात कोठेही. मी स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव करत नाही. तुम्ही स्वभावाने कसे व्यक्ती आहात, याचा मला फरक पडतो. आणि जर या भूमिकांमुळे मला स्त्रीवादी म्हटले जात असेल तर माझ्या मते, हो मी स्त्रीवादी आहे. या विषयाबद्दलच्या 'भारतीय संस्कृती'तील सर्व कल्पना मला त्रासदायक वाटतात. हे एक वक्तव्य आहे जे देशभरातील स्त्रियांवर अंकूश ठेवण्यासाठी तसेच छळण्यासाठी वापरण्यात येते आणि लाखो स्त्रियांना सबलीकरणापासून दूर ठेवण्याकरिता हा एक सोयीस्कर मार्ग ठरतो.' ऐकलं!

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, रवी शास्त्री, सुरेश रैना आणि अंबाती रायडू

मैदानावर क्षेत्ररक्षण करणारे भारतीय खेळाडू विराट कोहली, रवी शास्त्री, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू हे समाजातील महिलांच्या रक्षणासाठी पुढे सरसावले आहेत. नुकतीच त्यांनी 'रिस्पेक्ट टू प्रोटेक्ट' ही मोहिम राबवली असून, त्याद्वारे त्यांनी महिलांना संरक्षण देण्याकरिता आणि आदराने वागवण्याकरिता समाजाला आवाहन केले आहे. हैद्राबादस्थित महिलांच्या हक्काकरिता कार्यरत असलेली एक स्वयंसेवी संस्था माय चॉईस यांनी या चित्रफितीकरिता पुढाकार घेतला आहे.

या चित्रफितीत महिलांचे रक्षण कसे करावे, तात्पुरता उपाय करण्यापेक्षा या अडचणीचा मुळापासून नायनाट कसा करावा, याकरिता खेळांडूंच्या दृष्टीकोनातून सांगण्यात आले होते. समान संधी तसेच पेहराव, नोकरीबद्दलचे स्वातंत्र्य यांपासून ते महिलांना आर्थिक, सामाजिक तसेच शारिरीक बाबतीत आदराने वागणूक देणे, याबाबत सांगण्यात आले होते. तसेच या मोहिमेत महिला हक्क आणि स्त्री-पुरुष समानता यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनादेखील अधोरेखित करण्यात आल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांच्या यशाची पावती म्हणजे अर्ध्याहून अधिक लोकसंख्येने स्त्रियांवरील अत्याचार हे वाईट कृत्य असल्याचे कबूल केले होते. त्यामुळे स्त्री-चळवळीतील प्रगतीचे हे सकारात्मक सूचक आहे.

लेखक – बिंजल शहा
अनुवाद – रंजिता परब