पदवीपरिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील बदलांचा परिणाम: ‘व्हालोनिआ’!

0

असे म्हटले जाते की, कोणत्याही समाजाला सभ्य बनविण्यासाठी लोकांना शिक्षित करणे आवश्यक आहे. शिक्षणांचे महत्व सा-यांनाच माहिती आहे, त्यामुळेच कोणताही देश शिक्षणासेवा अधिक दर्जेदार बनवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. प्राचीन काळापासून शिक्षणाक्षेत्र महत्वाचे मानले गेले आहे. पूर्वीच्या काळी राजा-महाराजांची मुले देखील गुरुगृही जाऊन शिक्षण घेत, तसेच आज शाळेत जाणे सर्वांसाठी आवश्यक मानले जाते. भारतात शिक्षण देखील मुलभूत सुविधांमध्ये सामिल करण्यात आले आहे. तसे असूनही शिक्षणाचा स्तर सुधारण्याचे प्रयत्न आजही केले जात आहेत. सुधारणेला वाव प्रत्येक ठिकाणी असतो, शिक्षणाच्या क्षेत्रातही सुधारणेची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. देशाच्या वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयात सध्याच्या शिक्षणाचा स्तर सुधारण्याची गरज आहे. ही गरज ओळखली बिट्स पलानी, हैद्राबाद च्या काही पदवीपरिक्षेच्या विद्यार्थ्यांनी. होय पदवीपरिक्षेच्या विद्यार्थ्यांनीच. त्या़नी केवळ शिक्षणच्या पध्दतीतच बदल केला नाहीतर ते सुलभपणाने आणि स्वस्तात लोकांना मिळावे असा प्रयत्न देखील केला आहे.

स्वप्निल पदवी परिक्षेसाठी बिट्स पिलानी हैद्राबाद इथे शिक्षण घेतात, ते द्वितीय वर्षात आहेत. सुरुवातीपासून त्यांना आणि त्यांच्या मित्रांना असे वाटत होते की, ज्या शिक्षणप्रणालीतून ते जात आहेत, त्यात खूपकाही बदलण्याची गरज आहे. यासाठी इतर कुणाची वाट न बघता स्वप्निल आणि मित्रांनी स्वत:च प्रयत्न सुरु केला. आणि ‘व्हालोनिआ’ या संकल्पनेचा जन्म झाला. ‘व्हालोनिआ’ च्या माध्यमातून स्वप्निल आणि त्यांचे सहकारी शिक्षणासाठी आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करतात. याची सुरुवात एका प्रयोगाने करण्यात आली मात्र या नव्या आणि आगळ्यावेगळ्या संकल्पनेला रूजण्यास वेळ लागला नाही.

‘व्हालोनिआ’चे संस्थापक स्वप्निल वत्स यांचे म्हणणे आहे की, “व्हालोनिआची सुरुवात फारच छान झाली. याचे श्रेय सा-यांना दिले पाहिजे, ज्यांनी या सकारात्मक प्रयत्नाला साथ दिली.”

‘व्हालोनिआ'ची   सुरुवात सोपी नव्हती

बिट्स पिलानी, हैद्राबाद मध्ये शिकणारे हे सारे पहिल्या किंवा दुस-या वर्षाचे विद्यार्थी होते. मात्र शिकत असतानाच व्हालोनिआची सुरूवात करत असतानाच त्यांचा सफल उद्यमी बनण्याचा प्रवासही सुरू झाला. ‘व्हालोनिआ’ची सुरूवात झाल्यानंतर त्यांच्या महाविद्यालयाने त्याचे गांभीर्य़ ओळखले नाही, आणि त्यांच्या सहपाठी मित्रांनी देखील त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. मात्र बदलाची सुरुवात त्यावेळी झाली जेंव्हा व्हालोनिआची पहिली कार्यशाळा बाजूच्या एका शाळेत घेण्यात आली. तेथे ‘बिझनेस प्लान’साठीचे पहिले बक्षीस पटकावले. या विद्यार्थ्यांच्या यशाची ही पहिली पायरी ठरली. त्यावेळी त्यांना काही ज्येष्ठ विद्यार्थ्यांची मदत झाली. मग यशामागे यश मिळवत ‘व्हालोनिआ’ ने आपल्या विश्वासार्हतेची ओळख करून दिली आणि आज ती एक विश्वसनीय संस्था मानली जाते, जिथे उच्च दर्जाचे शिक्षण साहित्य आणि कार्यशाळा घेतल्या जातात. स्वप्निल आणि त्यांचे सहकारी व्हालोनिआच्या यशाने उत्साहित आहेत. ते सांगतात की हैद्राबादच्या एका महाविद्यालयात त्यांनी कार्यशाळेचा प्रस्ताव दिला होता. त्याचवेळी अन्य दोन मोठ्या कंपन्याचेही प्रस्ताव होते मात्र महाविद्यालयाने त्यांना बाजूला करून यांना स्वीकारले. विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या संचालकांनी त्यांचे कौतूक तर केलेच पण जी पध्दत त्यांनी वापरली त्याबाबत उत्साह व्यक्त केला. व्हालोनिआची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की ते विद्यार्थ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

खूपच कमी वयात स्वप्निल वत्स यांनी हे काम सुरू केले होते. त्यांच्या स्वत:च्या शिक्षणा दरम्यानच त्यांना व्हालोनिआ साठी देखील काम करावे लागत होते. ते सांगतात की, “ मला माहिती आहे की हे ऐकताना विचित्र वाटेल, मात्र हे खरे आहे की यामुळे मला वेळेचे व्यवस्थापन शिकता आले, तुम्ही जेंव्हा एक उद्यमी असता तेंव्हा नवनवीन लोकांना भेटावे लागते आणि संपर्क वाढत जातो. माझेही असेच झाले. मी रोज नवनवीन लोकांना आणि शिक्षणक्षेत्राशी संबंधित व्यक्तीना भेटत राहिलो. त्या सा-यांकडून मला खूप चांगले अनुभव मिळाले. मी नशीबवान ठरलो कारण मला हव्या त्या गोष्टी लगेच मिळत गेल्या. त्यातून केवळ आमच्या संस्थेला मार्ग मिळाला नाही तर व्यवसाय मजबूत करण्यास मदत झाली.’”

स्वप्निल मानतात की, त्यांचे शिक्षण जस-जसे पुढे होत गेले त्यांना या कामात काही अडचणी येत गेल्या. मात्र त्यातून ते बाहेरही पडले. ते मानतात की, “ तुमच्या जीवनात अनेकदा समस्या येतात, मात्र आपला दृढविश्वास असायला हवा मग मात्र या समस्या सोडवण्यात मौज असते” स्वप्निल अभिमानाने सांगतात की, जेंव्हा ते एखाद्या ठिकाणी जाऊन आपले अनुभव सांगतात तेंव्हा लोकांना आश्चर्य वाटते की, व्हालानिआ चे सारे सदस्य विद्यार्थीच आहेत.

कंपनीचे संस्थापक स्वप्निल वत्स सांगतात की शिक्षणाचा ठराविक साचा आहे, जो शिकवला जातो आहे. मात्र काळ बदलत असल्याने जुनी पध्दत आता बदलली पाहिजे. शिकताना स्वप्निल यांनाही याबाबत गरज लक्षात आली आणि त्यांनी चांगल्या शिक्षण पध्दतीचा संकल्प केला. विद्यार्थी असल्याने मार्ग कठीण होता. मात्र ते सांगतात की यामुळे त्यांचे इतर अनेक फायदेही झाले. सुरुवातीला आपले मित्र आणि कनिष्ठ सहकारी यांनी मदत केली. त्यांनी कंपनीसाठी संकेतस्थळ या मित्रांच्याच मदतीने तयार केली, जी स्वस्त आणि मस्त झाली. मात्र आता स्वप्निल आणि मित्रांचे शिक्षण पूर्ण होत आहे, त्यामुळे आता ते आपली कंपनी व्यावसायिक पध्दतीने चालवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

त्यानी सांगितले की त्यांची कंपनी व्हालोनिआ चा उद्देश सुलभ आणि किफायतीदराने ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे आहे. अशातच ते आपल्या कंपनीतून चांगला नफाही मिळवतात. त्यामुळे पुढच्या वाटचालीत अडचणी येत नाहीत. ते सांगतात की सध्या कंपनी दहा लाखांचा व्यवसाय करते.


लेखक : श्रेयांस सिंघल

अनुवाद : किशोर आपटे.