केवळ २.५०रुपयांत सॅनिटरी नॅपकीन व डिस्पोजर उपलब्ध करून ग्रामीण स्त्रियांच्या आरोग्याच्या क्षेत्रात क्रांती करणारे श्याम सुंदर बेडेकर

केवळ २.५०रुपयांत सॅनिटरी नॅपकीन व डिस्पोजर उपलब्ध करून ग्रामीण स्त्रियांच्या आरोग्याच्या क्षेत्रात क्रांती करणारे श्याम सुंदर बेडेकर

Monday December 19, 2016,

2 min Read

५४ वर्षीय श्याम सुंदर बेडेकर हे बडोदरा गुजरात येथे राहतात. जरी ते वस्रोद्यागातील रंग आणि रसायने यांचे व्यापारी असले तरी ते सर्वाधिक ओळखले जातात ते संशोधक म्हणूनच. ज्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या क्षेत्रात खूप मोठी क्रांती केली आहे. एक सॅनिटरी नॅपकीन केवळ २.५० रुपयांना उपलब्ध करून आणि ते तयार करणारे यंत्र ज्यातून टेराकोटाच्या या वस्तूमुळे ग्रामीण महिलांना त्यांची विल्हेवाट लावणेही सोयीचे झाले आहे. सन २०१०मध्ये श्याम बेडेकर आणि त्यांच्या पत्नी स्वाती यांनी वात्सल्य फाऊंडेशनची स्थापना केली, अशी सेवाभावी संस्था जी आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात ग्रामीण महिलांसाठी काम करत आहे. त्यांनी सॅनिटरी नॅपकिन्सच्या चांगल्या वापराकरीता प्रोत्साहित करत आहे. स्वाती या स्वत: ज्या ग्रामीण शिक्षिका आहेत, त्यांना गुजरातच्या ग्रामीण भागातील मुली वयात येण्याच्या कारणाने शाळाबाह्य कश्या होतात याची कल्पना आहे.

image


ग्रामीण भागात वयात येणा-या मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे, यासाठी श्यामसुंदर यांनी सखी नावाच्या ब्रँण्डच्या मार्फत केवळ अडिच रुपयात वापरता येण्याजोगा सॅनिटरी नॅपकीन बाजारात आणला. हा नॅपकीन तयार करणारे यंत्रही त्यांनीच तयार केले. सध्या अशा २० नॅपकिन्स तयार करणा-या युनिट वडोदरा जिल्ह्यात आहेत. त्यातून प्रत्येकी ८-१० महिलांना रोजगार देखील मिळाला आहे. त्यांनाच ग्रामीण भागात स्वयंपूर्ण उद्योजिका म्हणून उभे केले आहे.

असे असले तरी आव्हाने आहेतच. “ या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बहुतांश महिला नॅपकिन्स वापरु लागल्या आहेत, पण त्यांना वापरलेल्या नॅपकिन्सला नष्ट करण्याची समस्या होती. कारण कचरा गोळा करण्याची समस्या होती आणि ग्रामीण भागात ही व्यवस्थाच नाही.” श्यामसुंदर सांगतात. १८ ते २०हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिकच्या यंत्राव्दारे जे वापरलेल्या नॅपकिन्सला नष्ट करतात ते परवडण्याजोगे नाही. त्यातूनच श्यामसुंदर यांनी मग शक्कल लढविली. टेराकोटा विनाशक, (कचरा जाळण्याच्या भट्टी) ज्या स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. या भट्ट्या ज्यांना अशुध्दीनाशक या नावाने चार वर्षात १८०० विकल्या गेल्या आहेत. यापैकी पाचशे भट्टया सरकारने सर्व शिक्षा अभियांनांतर्गत शाळांमध्ये लावल्या आहेत.

कच-याची विल्हेवाट आणि आरोग्याच्या सवयी हा ग्रामीण भागात अजूनही चिंतेचा विषय आहे. युरोपातील ९६ टक्के महिलांच्या तुलनेत भारतात केवळ ६ टक्के महिलाच सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचे कारण सहजपणे परवडेल अशा किमतीत त्यांची उपलब्धता नाही, ते वापरण्याबाबत जागरुकता नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण मोठे आहे. त्यातूनच वंध्यत्व, जंतूसंसर्गामुळे होणारे रोग आणि मृत्यू सुध्दा घडतात.

    Share on
    close