मुंबईत तीन दिवसीय योगा-फेस्ट!

0

मुंबईतील योगा प्रेमी आणि साधकांसाठी चेतनामय योग शिबिराचे आयोजन  २४ ते २६ मार्च २०१७ दरम्यान मुंबईत करण्यात आले आहे. सर्वांसाठी विनामुल्य खुल्या असणा-या या योगा महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

योगसाधनेच्या क्षेत्रात ९० वर्षांपासून अग्रेसर असलेल्या कैवल्यधाम योग रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इंस्टिट्यूशन लोणावळा, या संस्थेने हा महोत्सव आयोजित केला असून त्यासाठी योगाच्या केंद्रीय संशोधन परिषद ,आयुष मंत्रालय भारत सरकार यांचे विशेष योगदान लाभले आहे. या महोत्सवात राज्यातील १३ शाळांमधून योग साधक सहभागी होत असून मुंबईतील तीन ठिकाणी हा योग महोत्सव भरविण्यात येत आहे त्यात कैवल्यधाम (मरीन ड्राइव), एसएनडिटी विद्यापीठ(चर्चगेट), आणि के.सी महाविद्यालय (चर्चगेट).


कैवल्यधाम आश्रमचे मुख्य कार्यकारी सुबोध शर्मा यांच्या नुसार, “ या महा योग उत्सवच्या आयोजनाचा हेतू सा-या महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांना आरोग्यमय जीवनासाठी तज्ञ योग गुरू आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन एकाच वेळी विनामुल्य उपलब्ध करून देवून त्यांच्यात जाणिव जागृती निर्माण करणे हा आहे.” कैवल्यधाम आश्रम, बिहार स्कूल ऑफ योगा, अय्यंगार योगाश्रय, आर्ट ऑफ लिव्हींग, महर्षी विनोद रिसर्च फ़ाऊंडेशन, ब्रम्हकुमारीज, सदगुरू महेशदा क्रिया, दि योगा इंस्टिट्यूट, योग विद्या निकेतन, योग विद्या गुरूकूल, आणि घंटाळी मित्र मंडळ या काही प्रमुख संस्था या योग महोत्सवात भाग घेत असून त्यात विविध प्रकारच्या ४० कार्यशाळांमध्ये प्रात्यक्षिके आणि आसनबंध आणि मेडिटेशन यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. शुद्धिक्रिया आणि सूर्यनमस्कार हे देखील योग महोत्वसाचा भाग असतील. २० नामवंत वक्त्यांसोबत व्याख्याने आणि परिसंवाद हे या योग महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे. या महा योग उत्सवाची सांगता २६ मार्च रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश न्या. बीएन श्रीकृष्ण हे असतील. या योग महा उत्सवात आपण सहभागी होण्यासाठी लॉगऑन करा:

www.yogcenter.com/maharashtra-yoga-utsav