मद्रास इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माजी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे वादळग्रस्त महाविद्यालयाला मदत केली

0

वरध या वादळाचा चेन्नईला मोठा तडाखा बसला, यातून अपरिमीत हानी झाली आहे.अश्याच प्रकारचे वादळ ‘हुडहुड’ने दोन वर्षांपूर्वी आंध्रच्या किनारपट्टीला झोडपले होते त्यावेळी विशाखापट्टणम शहरात मोठे नुकसान झाले होते. तसेच विजागच्या वेळी झाले होते. चेन्नई शहरातील हिरवाई नष्ट झाली होती, जोरदार वारा १४०किमी प्रति तास वेगाने वाहिला होता. त्यातून शहरात १७हजार झाडे उन्मळून पडली. या पार्श्वभुमीवर महाविद्यालयाच्या परिसरातील सारी हिरवी झाडे नष्ट झाली होती.

मद्रास इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या(एम आय टी) विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून त्याच्या महाविद्यालयाच्या परिसरातील झाडे लावून हिरवाई परत आणण्याचा प्रयत्न सुरु केला. ऍथेनँऊअम’ या नावाने एक चमू स्थापन करण्यात आली, आणि त्यांनी केटो या संकेतस्थळाच्या मद्तीने काही निधी गोळा करण्यास सुरुवात केली. माजी विद्यार्थ्यानी आवाहन केले की, “ विनाशकारी वादळ वरधने चेन्नईत खूप नुकसान झाले आहे, आणि त्यात एम आय टी मध्ये सारी झाडे नष्ट झाली आहेत. याशिवाय मोठ्या संपत्तीचा नाश झाला आहे. या प्रसंगाला तोंड देण्यासाठी कर्मचारी आणि आपले आजी माजी विद्यार्थी काम करत आहेत. हे नुकसान भरून येण्यासाठी काही वर्षांचा काळ जावा लागणार आहे, जितके लवकर आपण सुरुवात करु तितक्या लवकर ही हानी भरुन येवू शकते”.

एका मुलाखती दरम्यान एका माजी विद्यार्थ्याने सांगितले की, “चार दिवसांपूर्वीच आम्ही अभियान सुरु केले आहे. आम्हाल समजले की एम आयटीच्या कँम्पसचे वादऴांनतर मोठे नुकसान झाले आहे. महाविद्यालय सरकारी आहे, त्यामुळे त्यांना आमच्या निधीची गरज लागणार नाही, पण आमच्या महाविद्यालयाची स्थिती पाहून आम्ही निधी उभारण्याचा निर्णय घेतला.”

या मोहिमेला नाव देण्यात आले ‘एमआयटीचे गतवैभव मिळवून देवूया’, ३०पेक्षा जास्त माजी विद्यार्थी त्यासाठी पुढाकार घेत सरसावले आहेत त्यासाठी त्यांनी डिनशी चर्चा केली आणि विद्यापीठाची मान्यता घेतली आहे. केटोमधून मिळणा-या निधीचा वापर ढिगारे हलविण्यासाठी केला जात आहे, झाडे लावण्यासाठी आणि नवे बांधकाम करण्यासाठी केला जात आहे. याशिवाय ते काही सेवाभावी संस्थांची देखील यासाठी मदत घेत आहेत जेणेकरून झाडे पडल्याने झालेल्या नुकसानाला भरुन काढता येईल.

माजी विद्यार्थ्यानी सांगितले की, “आम्ही सेवाभावी संस्थाना आवाहन केले आहे, झाडाचे पुनर्रोपण कसे करता येईल. किंवा पडझड झाली आहे ती कशी दुरुस्त केली जाईल. हे अभियान १५ जाने.२०१७ पर्यत सुरु राहणार आहे. त्यांनतर आम्ही अंतिमत: कामाला सुरुवात करू.” त्यांनी सांगितले की, पाच लाख इतका निधी जमा करण्याचे उद्दीष्ट आहे.