उद्यमींकडून यशाच्या नवनवीन कहाण्या लिहून घेत आहेत श्रीनिवास!

उद्यमींकडून यशाच्या नवनवीन कहाण्या लिहून घेत आहेत श्रीनिवास!

Sunday March 06, 2016,

9 min Read

एका लहानग्याच्या मनात अनेक प्रश्न येत असत. अनेक गोष्टींची माहिती घेणे आणि त्या समजून घेण्याची त्याला आवड होती. तो स्वत:ला थांबवू शकत नव्हता आणि जी जिज्ञासा असेल ती पित्याला प्रश्न विचारून पूर्ण करुन घेत असे. आकाशात ढग पाहून तो आपल्या पित्याला प्रश्न करी, “ ढगांना त्यांचे रुप रंग आणि आकार कसे मिळतात? तो वडिलांना विचारी की अखेर मानवी शरीर अचानक गरम कसे होते?, मुलांना ताप कसा येतो? हा मुलगा इतका जिज्ञासू होता की तो घड्याळ उघडून पाहत असे की कोणती यंत्र कश्या प्रकारे जोडण्यात आली त्यामुळे हे घड्याळ काम करते! तो हे देखील शोधून काढण्याचा प्रयत्न करत असे की प्रगणक कोणतीही चूक न करता अचूक संख्या कशी शोधून देतो? या मुलाने एक दोन नाही अनेक वस्तू उघडून टाकल्या आणि त्या कश्या काम करतात ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. या मुलासाठी प्रत्येक गोष्टीत एक प्रश्न होता.ज्याची उत्तरे शोधताना तो आपल्या वडिलांची मदत घेत होता. वडिल यूके मध्ये प्रसिध्द डॉक्टर होते. ते कधी त्याला निराश करत नसत, सा-या प्रश्नांची उत्तरे देऊन त्याची जिज्ञासा शमविण्याचा प्रयत्न करत.

image


हा मुलगा जेंव्हा मोठा झाला तेंव्हा त्याने बालपणीच्या या प्रश्नोत्तरातून खूप मोठा मंत्र शिकला होता. त्याला समजले होते की योग्य व्यक्तिलाच योग्य प्रश्न विचारले तर यश मिळते. आणि मग काय? हाच जीवनाचा मंत्र घेऊन हा माणूस आपल्या मार्गाने निघाला होता. आणि आज तो यशाच्या इतक्या मोठ्या मुक्कामाला पोचला आहे की, जगभरच्या उद्यमींना आणि प्रतिभावान युवकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करताना तो महत्वाची भूमिका वठवतो आहे.

image


ज्यांची आपण चर्चा करतो आहोत त्यांचे नाव आहे, श्रीनिवास कल्लीपारा. श्रीनिवास हैद्राबादच्या उद्यमींमध्ये एक चांगले वातावरण आणि शिस्त निर्माण होण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘टि हब’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वस्तुस्थिती ही आहे की ‘टि हब’च्या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते त्याचे संस्थापक आहेत. लहानपणीच्या सवाल-जबाबांच्या गुरुमंत्रातून फायदा घेत श्रीनिवास सध्या उद्यमींचे विश्वासू सल्लागार बनले आहेत. युअर स्टोरी सोबत अंतर्गत चर्चा करताना त्यांनी सांगितले की, लहानपणीच्या सवयीनुसार ते उद्यमींना प्रश्नच-प्रश्न विचारतात. प्रयत्न मात्र असाच असतो की, ते प्रश्न योग्य तेच असावेत. त्यातून ते बोलता बोलता उद्यमीच्या विचार शक्ती आणि क्षमता काय आहेत यांचा अंदाज घेतात. अणि त्याचवेऴी ते त्यांच्या उद्योगांच्या योग्य बिझनेस मॉडेलचा निष्कर्ष काढतात. ते सांगतात, की मी उद्यमींना किंवा स्टार्टअपना त्यांच्या उद्योगाच्या समस्यांचे समाधान देत नाही. पण योग्य ते प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याची योग्य दिशा घेण्यास मदत करतो”

image


श्रीनिवास यांचे मत आहे की, भारतात आंत्रप्रेनेअर्सची शक्ती खूप मोठी आहे आणि ते जगाला बदलण्याची हिंमत ठेवतात.

त्यांच्यामते जर कोणत्याही देशाला आपल्या यशाची मोठी कहाणी रचायची असेल तर तर त्याला विकासाचे एक नाही अनेक केंद्र बनले पाहिजे.

त्याचमुळे त्यांनी बंगळूरू सोबतच हैद्राबादला देखील स्टार्टअपचे मोठे केंद्र बनवण्याची जबाबदारी घेतली आहे. आणि ज्या प्रकारे ‘टि हब’ची स्थापना केली आणि तीची प्रगती होते आहे त्यावरून तर हेच पहायला मिळते आहे की ते त्यांच्या यशाचे लक्ष्य नक्कीच पूर्ण करतील.

image


५नोव्हेंबर २०१५ला जेंव्हा ‘टि हब’ची शानदार सुरुवात झाली, त्यावेळी उपस्थित राहून जगप्रसिध्द उद्योजक रतन टाटा, तेलंगणचे राज्यपाल नरसिम्हन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री तारक रामाराव यांनी उद्घाटन समारंभाची शोभा व्दिगुणित केली होती. ‘टि हब’ सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतील उद्योगाचा अद्भूत नमूना आहे. हे तेलंगण सरकार, भारतीय माहिती-विज्ञान संस्था- हैद्राबाद(आय आय टी-हेच) इंडियन स्कूल आणि व्यापार तसेच नलसार यांच्या शिवाय देशातील काही प्रसिध्द खाजगी संस्थाच्या विचार, कष्ट आणि सहकार्य़ यांच्या समन्वयाचा परिणाम आहे.

‘टि हब’चे लक्ष्य हैद्राबाद शहरात उद्यमींना आणि स्टार्टअपच्या विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करणे हे आहे.

आय आयटी-हेच च्या परिसरात ‘टि हब’मध्ये सत्तर हजार चौरस फूट जागा आहे. उद्यमींना काम करण्यासाठी तेथे अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. आज अनेक स्टार्टअप याच ठिकाणाहून आपले काम चालवत आहेत. सर्वात महत्वाची बाब ही सुध्दा आहे की, ‘टि हब’मध्ये इंक्यूबेटर्स आणि ऑक्सेलेटर्स यांच्यासाठी वेगवेगळी जागा दिली आहे. उद्योजक वेळोवेळी सहभागीदारांना आणि दुस-या गुंतवणूकदारांना भेटू शकतील यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रकारे ‘टि हब’ ज्ञान, तंत्र आणि विकासाच्या सा-या संकल्पानाचे स्त्रोत बनला आहे.

सीईओ श्रीनिवासन यांना पूर्ण भरोसा आहे की, टि हबच्या यशाच्या अनेकानेक कहाण्या असतील आणि त्या सा-या चर्चा जगातील कानकोप-यात केल्या जातील.

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की टि हबच्या स्थापनेत बंगळूरू आणि हैद्राबाद यांच्यात काही भांडणे लावणे हे उद्दीष्ट नाही. दोन शहरात भांडणाची बाब योग्य नाहीच. देशाच्या विकासासाठी दोन शहरातील सहकारिता वाढली पाहिजे. त्यातून देशात विकासाचे एक नाहीतर अनेक केंद्र तयार होतील. या शहरात पहिल्या क्रमांकाची स्पर्धा जरुर असावी पण भांडणे मात्र नकोतच.

हे विचारले की उदयमी आणि स्टार्टअप साठी त्यांनी हैद्राबादची निवड का केली? तेंव्हा ते भाऊक झाले आणि जीवनातील काही आठवणी त्यांनी सांगितल्या. ते म्हणाले की या शहराशी त्यांचे नाते खूपच गहीरे आणि मजबूत आहे. इतकेच नाहीतर येथील काही प्रभावशाली नामवंत घराण्याशी लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

त्यामुळे त्यांना वाटले की हैद्राबादमध्ये काम चांगल्या प्रकारे सहजपणे होऊ शकते. मग राजकीय नेते असोत किंवा अधिकारी त्यांना मदत नक्कीच मिळेल.

त्यांच्या मते, हैद्राबाद जीव-विज्ञान, औषधी-विज्ञान, चिकित्सा आणि कृषी यांचे मोठे केंद्र आहे. आणि त्याच्याशी जोडलेले स्टार्टअप आणि उद्यमी टी हब मध्ये काम करतील तर त्यांनाही मदत होईल आणि संशोधनालाही चालना मिळेल.

यूएस आणि यूके मधील आपल्या शिक्षण आणि अनुभवांबाबत बोलताना श्रीनिवास सांगतात की, अनेक देशांनी सिलीकॉन व्हँलीची अंधाधुंद पणाने नक्कल केली आहे. त्याचमुळे अनेक देशांनी कितीही प्रयत्न केले तरी स्वत:ची सिलीकॉन व्हँली तयार करता आली नाही.अनेक देशांनी ही चूक केली त्यांनी त्याना काय हवे त्यानुसार काम केले नाही. स्थानिक समस्यांवर लक्ष दिले नाही. आपल्या लोकांच्या मुलभूत गरजा काय आहत ते समजावून घेतले नाही. ते हेच समजू शकले नाहीत की त्यांच्यासाठी काय योग्य आहे आणि काय चूक?

ते पुढे म्हणाले की, हैद्राबादमध्ये तेच काम होईल जे येथे करणे आवश्यक आहे. येथील सध्याच्या आव्हानाबाबत बोलताना ते म्हणतात की, तीन-चार वर्षापूर्वी वातावरण खुपच वेगळे होते. प्रत्येक जण बंगळूरूची चर्चा करत होता. राजकारणी, नेता किंवा पत्रकार असो बहुतेक लोकांना स्टार्टअप बाबत योग्य ती माहितीच नव्हती. प्रत्येक उद्यमी बंगळूरूला जात होता. पण मी काही सहका-यांसोबत हैद्राबादचे वातावरण बदलण्यास सुरुवात केली. हळु-हळू बदल झाले. प्रयत्नांना यश येऊ लागले. त्यांना साकरण्यात हैद्राबाद आय आय टीचे योगदान मोलाचे आहे.

महत्वाची बाब ही होती की जेंव्हा२०१४मध्ये तेलंगणा राज्य झाले येथे नवे सरकार आले तेंव्हा बदल झपाट्याने झाले. नव्या सरकारमधील मंत्री तारक रामाराव यांची सक्रियता, तन्मयता आणि कष्ट यातून चांगले धोरण बनले. त्यातूनच टि हबला मूर्त स्वरुप मिऴाले. सरकारने केवळ माहिती-तंत्रज्ञानक्षेत्रालाच नाहीतर स्टार्टअप आणि उद्यमींनाही चांगली मदत केली.

साधारणपणे असे समजले जाते की सरकारचा हस्तक्षेप जितका कमी असेल तितके काम जलद होते, विशेषत: आयटी आणि उद्योग क्षेत्रात. पण तेलंगणात चित्र वेगळेच दिसले. येथील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री तारक रामाराव यांचे प्रयत्न समजुतदारपणा आणि क्षमता यामुळे सर्व ती अावश्यक मदत स्टार्टअप आणि उद्यमींना मिळत आहे.

image


कॉर्पोरेट जगत आणि स्वत:चा व्यापार सोडून स्टार्टअपमध्ये येण्याचे कारण सांगताना ते म्हणाले की, त्यांच्या रक्तातच उद्यमिता आहे. ते म्हणाले की त्यांचे आजोबा डॉ. सी एल रायुडू यांच्या पासून त्यांनी प्रेरणा घेतली. ते त्याच्या काळातील डाव्या विचारांचे नेते होते. एकत्रित आंध्रप्रदेशची औद्योगिक राजधानी विजयवाडा आणि त्याच्या बाजूचे गन्नवरम यांच्या विकासात डॉ रायुडू यांची महत्वाची भूमिका होती. लोकांच्या भल्यासाठी त्यानी अनेक कार्यक्रम केले. अनेक शाळा सुरू केल्या. हे सारे त्यांनी निस्वार्थीपणे केले. त्यांनी कधीच धन-दौलत मिळवण्याचा विचार केला नाही. आपण समाजाला काय देऊ शकतो? हाच विचार केला. समाजावर कसा आपला चांगला ठसा उमटवता येईल याचा विचार केला.

श्रीनिवास म्हणाले की, “ माझे आजोबा माझ्यावर मोठा प्रभाव टाकून गेले, त्यांनी समाजसेवा केली. सकारात्मक बदलांसाठी प्रयत्न केले. त्यांनी सरकारी पुरस्कारामागे धावण्याचे काम केले नाही”

श्रीनिवास म्हणतात की, “ मला देखील समाजासाठी काही चांगले आणि सर्वोत्तम द्यायचे आहे. समाज आणि जगाला आपल्या चांगल्या कामाने प्रभावित करायचे आहे. आपला ठसा उमटवायचा आहे. माझ्या जीवनाचा हा मंत्र आहे समाजाला काही असे देऊ ज्यानं त्याचा फायदा होईल”.

नैतिकता आणि सिध्दांतांच्या बाबतीतही ते खूपच नेटके आहेत. ते कधीच तत्वांशी तडजोड करत नाहीत. याबाबतीत त्यांचे मामा वसंतकुमार यांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव आहे. डॉ वसंतकुमार आंध्रप्रदेशच्या कॉंग्रेस वर्तुळात नेता आणि माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डुी यांचे सहपाठी मित्र होते. राजशेखर रेड्डी जेंव्हा मुख्यमंत्री होते तेंव्हा त्यांनी श्रीनिवास यांचे मामा डॉ वसंतकुमार यांना कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. आणि विश्वास दिला की जर ते सहभागी होतील तर त्यांना मोठे पद दिले जाईल. पण दुस-या पक्षांत असलेल्या मामांनी तत्वांशी तडजोड केली नाही. आणि ते सत्तेपासून दूरच राहिले. यातील रोचक गोष्ट ही आहे की श्रीनिवास यांचे बालपण यूके मध्येही गेले. तेथेच त्यांचे शालेय शिक्षणही झाले. वडिल नामवंत डॉक्टर होते जे पुढे जाऊन उद्यमी झाले. वडिलांच्या व्यवसायात श्रीनिवास यांनी बराच काळ साथ दिली. तरूण वयात श्रीनिवास यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी विजयवाडा येथे पाठवण्यात आले. युकेत बालपण गेल्याने त्यांना विजयवाडा शहर खूपच अजब वाटत असे. युके आणि भारत यांच्या संस्कृती, लोकांचे राहणे. खाणे –पिणे यात वैविध्य आहे. वातावरणही वेगळे आहे. त्यात जुळवून घेताना त्यांना वेळ लागला.

पण श्रीनिवास यांना भारतात खूप काही वेगळे शिकायला मिळाले. भारताची संस्कृती कला लोकांची शक्ती आणि प्रश्नांना समजण्यासाठी संधी मिळाली. आपले मामा आणि आजोबा यांच्यासोबत राहताना बरेच काही शिकायला मिळाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रीनिवास यांनी ओमेगा इम्यूनोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी युके मधून डायग्नोस्टिक एंजायम आयात करत होती. काही वर्षांनी त्यांच्या या कंपनीला एका मोठ्या फार्माकंपनीने विलीन केले. त्यानंतर ते मोठमोठ्या कॉर्पोरेट संस्थाच्या महत्वाच्या पदांवर कार्यरत राहिले. त्यांनी ट्रान्सजीन बायोटेक लिमिटेड, कम्पूलर्नटेक प्रायव्हेट लिमिटेड, के एक आय कॉर्पोरेशन, आस्पेट सॉफ्टवेअर, पीपलसॉफ्ट सारख्या नामवंत कंपन्यासोबत मोठ्या हुद्द्यावर काम केले आणि आपल्या सेवा दिल्या.

परंतु २००७मध्ये त्यांनी ठरवले की आता स्वतंत्रपणे काम करावे आणि स्टार्टअपच्या दुनियेत आपले सर्वस्व अर्पण करतील. त्यानंतर त्यांनी मग मागे वळून पाहिले नाही. स्टार्टअप मेंटॉर म्हणून जगभरात नाव मिळवलेच पण आपली वेगळी ओळख मिळवली. ते म्हणतात की टि हबची स्थापना हीच त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी कामगिरी आणि यश तसेच आनंद आहे. भावूक होऊन पण तितक्याच आत्मविश्वासाने ते सांगतात की, “ जेंव्हा जगातील कानाकोप-यातील लोक टि हबचे सर्वात चांगले केंद्र म्हणून चर्चा करतील आणि आपल्या यशाच्या कहाणीत त्याचा उल्लेख करतील त्यावेळी माझे स्वप्न पूर्णत्वास गेले असे होईल. त्यावेळी मला गर्वाने सांगता येईल की मी जे ठरवले ते साकार केले आहे. श्रीनिवास यांनी त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण काळाबाबतही सांगितले. ते म्हणाले की, “ माझ्या जीवनात अनेक चढाव उतार पाहिले आहेत. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन शिकायला मिळाले आहे. सर्वात कठीण काळ तो होता ज्यावेळी वडिलांची कंपनी तोट्यात गेली. कर्जदार सतावू लागले आणि मौज करण्यासाठी सोबत करणा-या मित्रांनी साथ सोडली. पण काही चांगली कर्म केली होती त्यांची आठवण ठेवून अनेकांनी मदतही केली. त्यावेळी जाणवले की चांगल्या लोकांची मदत केली पाहिजे तेच अडचणीत आपल्याही कामी येतात.”

उद्यमींच्या यशाच्या नवनव्या कहाण्या लिहिणारे श्रीनिवास म्हणाले की कॉर्पोरेट च्या झगमगीत दुनियेतून स्टार्टअपच्या जगात येण्याची तीन कारणे आहेत 

एक- जगभरातील चांगल्या लोकांसाठी काहीतरी असे काम करायचे होते ज्याची छाप उमटेल. 

दोन- तेच काम करावे ज्याने आनंद मिळेल. ज्या कामात मन रमेल. 

तीन- आपल्या कुटूंबाच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेता येईल.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

उत्तरप्रदेश ते ऑस्ट्रेलियाचा प्रवास करत देशाची आघाडीची गुंतवणूक सल्लागार बनली 'हंसी महरोत्रा'

उबेरचे सहसंस्थापक 'ट्रॅविस कॅलानिक' यांच्याकडून यशस्वी उद्यमी बनण्यासाठीच्या नऊ उपाययोजना

दिल्लीतली 'लॉराटो' एक हजार कायदेतज्ज्ञांच्या माध्यमातून देतेय कायदेविषयक परिपूर्ण सहाय्य

लेखक : डॉ अरविंद यादव, व्यवस्थापकीय संपादक (भारतीय भाषा), युवर स्टोरी

अनुवाद : किशोर आपटे.