पोलंडच्या ऑलिंम्पिक विजेत्याने रौप्य पदक विकले तीन वर्ष जुन्या कर्करोग रुग्णाच्या उपचारांसाठी!

पोलंडच्या ऑलिंम्पिक विजेत्याने रौप्य पदक विकले तीन वर्ष जुन्या कर्करोग रुग्णाच्या उपचारांसाठी!

Monday September 05, 2016,

1 min Read

पोलंडचा थाळीफेकपटू पीओर्टर मालाचोक्सी ज्याने रिओ ऑलिंपीकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती, त्याने ओलेक समँन्स्की या तीन वर्षाच्या कर्करोगाशी लढा देणा-या रुग्णाच्या उपचारांसाठी हे पदक लिलावात विक्रीला काढले. याबाबत अनेकांनी जाहीरपणाने ऑलिंपीकच्या ख-या खिलाडूपणाचे प्रतिक म्हणून कौतूक केले आहे.

त्याच्या अलिकडच्या विजयानंतर, पिओर्टर यांने फेसबूकच्या माध्यमातून आवाहन केले की, “ रिओमध्ये मी सुवर्ण पदकासाठी झुंजलो. आज माझे सर्वांना आवाहन आहे की, अधिक मौल्यवान अशा बाबीसाठी झुंज देऊ या. एका छान मुलाच्या आरोग्यासाठी झुंज देऊया. जर आपण मला मदत कराल, माझे रौप्यपदक सुवर्णपदकापेक्षा मौल्यवान ठरेल”.


image


पिओर्टर याने प्रयत्न करुनही जवळपास ८४हजार डॉलर्स जमा झाले. पदकाची किंमत १९ हजार डॉलर्स पर्यंत गेली जेव्हा पोलिश करोडपती डॉमिनीका आणि सेबेस्टीयन कुल्कझायक यांनी शस्त्रक्रीयेच्या खर्चा इतक्या किमतीला हे पदक घेण्यास होकार दिला.

तीन वर्ष वयाचा ओलेक हा रिटेनोब्लास्टोमा या रोगाने आजारी आहे, हा डोळ्यांचा कर्करोग आहे आणि लहान वयातील मुलांना होतो. पिओर्टरच्या मोहिमेला धन्यवाद. ओलेक लवकरच न्यूयॉर्कला उपचारांसाठी रवाना होणार आहे.

तेहतीस वर्षीय पोलिश थाळीफेकपटूने ६७.५५ मिटर थाळीफेकून रौप्यपदक पटकावले होते. हे पदक मांडणीत ठेवून मिरवण्यापेक्षा त्याचा सदुपयोग अश्या प्रकारे करणे त्याला जास्त उपयुक्त तेचे वाटले. हे त्याचे दुसरे ऑलिंपिक पदक होते. यापूर्वीसुध्दा त्याने २००८च्या बिजींग ऑलिंपिक्समध्ये रौप्यपदक मिळवले होते

सौजन्य : थिंक चेंज इंडिया

    Share on
    close