परिमला हरिप्रसाद : गोष्ट एका उत्सुक परिक्षकाची

आपल्या परिश्रमाच्या आणि नवनवीन प्रयोगांच्या बळावर टेस्टींग इंडस्ट्रीत स्वतःची ठसठशीत ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या बंगळूरूच्या एका महिलेची ही कथा आहे. अतिशय प्रेरणादायी असलेल्या या महिलेचं नाव आहे परिमला हरिप्रसाद....

0
परिमला हरिप्रसाद ( चोखंदळ परिक्षक, मूल्य सॉप्टवेअर टेस्टींग )
परिमला हरिप्रसाद ( चोखंदळ परिक्षक, मूल्य सॉप्टवेअर टेस्टींग )

आपलं तारूण्य ज्या व्यक्तीनं माणसं वाचण्यात आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यात घालवलं ती व्यक्ती म्हणजे परिमला हरिप्रसाद. या काळात मिळवलेला अनुभव तीनं भावी आयुष्यात एक चोखंदळ परिक्षक अथवा चिकित्सक म्हणून काम करण्यात वापरला.

परिमलानं तिचं जोखमीचं काम अगदी सहज करण्यात हातखंडा मिळवलाय. तिच्या कामाची पद्धत म्हणजे परिमल मार्गच म्हणावा लागेल. मला विश्वास आहे, तिच्यासोबत काम करणा-यांना तिच्या या पद्धतीचा सुगंध नक्कीच लागला असणार."

मूल्य स़ॉफ्टवेअर टेस्टींगचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप सुंदरराजन यांनी परिमलाबद्दल व्यक्त केलेला हा विश्वासच तिच्या कामाची पावती देऊन जातो.

पदवी पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी चाळीस मुलाखतीमधून बाद झाल्यानंतर या स्थानापर्यंत पोहोचणं ही नक्कीच सोपी गोष्ट नव्हती. मात्र, परिमलानं 11 वर्षांच्या अथक परिश्रमातून स्टार्ट अप टेस्ट लॅब आणि मूल्य स़ॉफ्टवेअर टेस्टींगच्या महत्वाच्या पदावर विराजमान होऊन या इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलंय. परिमला म्हणजे कौशल्यपूर्ण व्यक्तिमत्त्व, सकारात्मक विचार आणि जगण्याची विशाल दृष्टी. तिच्या ओरॅकल कंपनीतल्या परिक्षकाच्या पहिल्या नोकरीपासून ते आतापर्यंत तीनं केवळ परिश्रमाच्या जोरावर टेस्टींगच्या विश्वातलं अढळ पद प्राप्त केलंय.

“माझ्यासाठी परिक्षण म्हणजे एखादं गुप्तहेर कथेचं पुस्तक वाचण्यासारखं आहे. जिथे तुम्हाला प्रचंड मेहनत करून पुरावे गोळा करायचे आहेत. भावनांची गुंतागुंत आणि काही धागेदोर तपासायचे आहेत. इतकंच औत्सुक्याचं आणि थरारक वाटतं मला एखाद्या उत्पादनाची माहिती गोळा करताना.”

परिमला तिच्या कामाविषयी सांगत असते. पण ही अचुकता अनेक कटू अनुभव आणि प्रदिर्घ कालावधीनंतर तिला कमावता आलीय.

बंगळूरूच्या जेएसएस महाविद्यालयातून 2003 साली तीनं पदवी घेतली आणि एका कॅम्पस इंटरव्यूहद्वारे ओरॅकल या कंपनीत परिक्षक म्हणून काम सुरू केलं. मात्र, त्याआधी तिला चाळीस वेळा नकाराला सामोरं जावं लागलं होतं. आपल्या कामाबद्दल आपले सहकारी फारसे खूश नसल्याचं तिच्या काही दिवसातच लक्षात आलं. तिनं या कामाऐवजी अन्य काही पर्याय निवडावा असे तिचे सहकारी तिला सुचवू लागले. या सल्ल्यानं तिला अतर्बाह्य हलवून सोडलं आणि तिच्या सहका-यामधला समंजसपणाचा अभाव तिला दिसला.

त्यानंतर केवळ तीनच महिन्यांत परिमलानं स्वतःमध्ये बदल घडवत सॉफ्टवेअर टेस्टींगमधला रस आणि उत्सुकता वाढवली. त्यानंतर मूल्य स़ॉफ्टवेअर टेस्टींगमध्ये रूजू होण्यापूर्वी तीनं मॅकफी सपोर्ट सॉफ्ट इथं काम केलं. "एखादं उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणं आणि एक परिक्षक म्हणून चांगल्या वाईट बाबी सांगणं आपल्याला आवडतं. दुर्देवानं अशी उत्पादनं संख्येनं फार नसतात", असं परिमला सांगते.

सॉफ्टवेअर टेस्टींग हे अतिशय कौशल्यपूर्ण काम आहे. “सगळेच जण लिहू शकतात मात्र माल्कम ग्लॅडवेलच्या लिखाणाची पातळी गाठणं फारच कठीण असतं. एक चांगला परिक्षक होण्यासाठी तुमच्यात असावं लागतं झपाटलेपण,हिम्मत,उत्कृष्टता आणि आशावाद.” त्यानंतर ती टेस्टींगच्या बारकाव्यांबद्दल बोलत राहते. “एखाद्या लहान बाळाचं पोषण करताना काय चांगंल वाईट आहे याची सतत काळजी घ्यावी लागते, तसंच एखादं उत्पादन परिक्षण करताना घ्यावी लागते. अत्यंत सहानूभुती, संज्ञानात्मक विज्ञानाची माहिती, संशोधनात्मक कौशल्य आणि लोकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो. एखाद्या उत्पादनाविषयी जर एखादी व्यक्ती सकारात्मक नसेल तर लवकरच ती आळस करू लागते आणि सहका-यांमध्येही नकारात्मकता पसरवू लागते”.

शिकणं ही केवळ कागदाचं प्रमाणपत्र मिळवण्याची नव्हे तर आयुष्य़भराची प्रक्रिया असते.

टेस्टींगच्या साधनासाठी अधिकाधिक वेळ खर्च करणं आणि नवीन शिकणं यासाठी तिला वेळ द्यायला आवडतं. तुमच्याकडे असलेली साधनं आणि प्रोग्रॅमिंग तुम्हाला परिक्षक म्हणून अधिक सक्षम बनवतं असे परिमला सांगते. संवाद ही टेस्टींगच्या उद्योगात अतिशय गरजेची गोष्ट असल्याचं 2008 साली तीच्या लक्षात आलं, त्यानंतर तिनं शिबीरं आणि व्याख्यानं यांच्यावर भर दिला. वैविध्य आवडणा-या लोकासांठी ब्लॉग सुरू केला आणि आठवड्यातून शिकवणी वर्गही सुरू केले.

अकरा वर्षांच्या करिअरनंतर ती जेव्हा आव्हानंचं सिंहावलोकन करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तुमच्या सहका-य़ांकडून आणि शिक्षकांकडून तुम्हाला योग्य पोचपावती मिळणं कठीण असतं. तुम्ही स्वतः विचारल्यानंतरही लोक बोलायला तयार होत नाहीत. म्हणूनच मूल्यमध्ये लोकांना महत्त्व देण्याची आणि प्रोत्साहित करण्याची संस्कृती किती गरजेची आहे हे समजलं. फार कमी महिला परिक्षक मन लावून काम करताना दिसतात. तसेच टेबलवर बसून नीट ऐकणं किती महत्त्वाचं असते ते परिमलाला जाणवलं, म्हणूनच एक लाजाळू परिक्षक ते डॅशिंग, असा तिचा कायापालट झाला.

वयाच्या पंधराव्या वर्षापासून औत्सुक्य ही एकच गोष्ट परिमलाला बळ देते आहे. एक टेस्टींग इंजिनीअर असली तरी ती डिझाईनबाबत खूप वाचत असते. ती आपल्या विश्वासावर ठाम असते.

टेस्टींगपलिकडचं आयुष्य

हे जग जगण्यासाठी एक सुंदर ठिकाण व्हावं असा परिमलाचा प्रयत्न आहे. आपण वापरत असलेली प्रत्येक गोष्ट कुणीतरी तपासलेली असते असा तिचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच भावी पिढ्यांसाठी जगणं सोपं व्हावं अशी तिची इच्छा आहे. लोकांच्या वागण्यावरून खूप काही शिकायला मिळतं म्हणून लोकांशी बोलताना आपण व्यावसायिकतेनच वागत असल्याचं ती सांगते. नेतृत्व, प्रामाणिकता, विश्वास आणि काम करण्याची वृत्ती ही तीची खरी ओळख.

जेव्हा परिमला टेस्टींग करीत नसते तेव्हा ती तुम्हाला एकतर ब्लॉग लिहीताना किंवा एखाद्या टेस्टींगच्या मासिकासाठी लिहीताना दिसेल. तिला खायला आणि फिरायला खूप आवडतं. भारताची खाद्यसफर करण्याची तिची इच्छा आहे. तिच्या मुलांची आणि कुटूंबाची तिला खूपच साथ लाभते. नुकतंच तिने योगा करायला सुरूवात केलीय.

टेक्निकल जगतातील परिमला आणि महिला

पदवीपर्यंत शिक्षण घेणारी परिमला ही तिच्या कुटूंबातील पहिली महिला आहे. तिच्या कुटूंबातील कोणत्याही महिलेनं वयाच्या सव्वीसाव्या वर्षापर्यंत लग्नाला नकार दिला नव्हता. एखाद्या तरूणीला मिळालेलं स्वातंत्र्य काय असतं हे तिनं अनुभवलंय. परिमला सांगते की, “आपल्या समाजातील महिलांना लहानपणापासून ते शिक्षण संपेपर्यत दमनशक्तीला बळी पडावं लागतं. अशातही ज्या महिला बाहेरच्या जगातील अपेक्षांना पु-या पडून आपल्या महत्वाकांक्षा जिवंत ठेवतात त्याच यशस्वी होतात. बाकीच्यांना बाहेरच्या जगातील नोकरीपेक्षा स्वयंपाकघर जास्त सुरक्षित वाटू लागतं. आठ तासांच्या नोकरीनंतरही त्यांनी घरकाम करावं अशी अपेक्षा केली जाते. या अपेक्षांच्या कसोटीवर त्यांच्याकडे चांगली आई, बायको अथवा सून म्हणून पाहिलं जातं.

ती पुढं म्हणते

“तुमच्या दोन पायांमध्ये काय आहे यावरून लोकांचं तुमच्याशी असलेलं वर्तन हे दुजाभाव करणारं नसावं. महिलांना केवळ 33 टक्के आरक्षण देवून हा प्रश्न संपणार नाही. सर्वांना समान वागणूक देणारं वातावरण आपल्याला निर्माण करावं लागेल. घर आणि काम यांच्यामध्ये ती कसा समतोल साधते हे आपल्याला महिलांना विचारावं लागेल. महिला आणि पुरूष हे सर्वत्र समान आहेत हे आपल्याला दोघांच्याही मानसिकतेत भिनवावं लागेल.”

परिमला ही मूल्यची पहिली महिला कर्मचारी पण येणा-या प्रत्येक महिलेच्या विकासासाठी पोषक वातावरण तीनं तयार केलंय. संस्थात्मक धोरण आणि मुलाखतीच्या पद्धतीत तीनं बदल केलाय. ती म्हणते सुदैवानं मूल्य या कंपनीनं मला टेस्टींग जगतासाठी आणि महिलासांठी सुरूवातीपासूनच खूप मदत केलीय आणि स्वातंत्र्यही दिलं.

परिक्षण संपले

याची माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही काय करताय आणि का करताय. तुम्ही पैशासाठी काम करताय की काही लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकण्यासाठी की तुमच्या वेडासाठी काम करताय. स्पष्टता असणं गरजेचं.” म्हणूनच विचारातील स्पष्टता आणि ठामपणावर विश्वास असलेल्या परिमलानं आपल्या वाचकांना प्रेरित आणि प्रोत्साहित करण्यासाठी डॉ सुस यांच्या या सुभाषितानं आपल्या बोलण्याचा समारोप केला.