८१ वर्षांच्या सेवानिवृत्त अभियंताने जागतिक हवामान बदलाशी झुंज देण्यासाठी उभारले १२ कृत्रिम हिमप्रवाह!

0

८१ वर्षांचे ज्येष्ठ चेवांग नोरफेल यांचा जन्म मध्यमवर्गिय कुटूंबात लेहमधील लदाख येथे झाला. लखनौ येथून सिव्हिल मधील अभियंता म्हणून पदविका प्राप्त झाल्यावर ३५वर्ष चोवांग यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली, आणि १९९५मध्ये अधिकृतपणे सेवा निवृत्त झाले. तरीही त्यांचे काम आजही अविरत सुरूच आहे. “ येथे लदाखमध्ये एखादेच गाव बाकी राहिले असेल जेथे मी रस्ता बनविला नसेल, मो-या, पुल, इमारती किंवा सिंचनाच्या योजनांची कामे केली नसतील.” चेवांग यांनी सांगितले. ग्रामीण भागातील त्यांच्या असामान्य कामगिरीमुळे पिण्याच्या पाण्याच्या अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत.

“ मला जाणवले की या भागातील सारे प्रश्न पाण्याशी संबंधित आहेत. अनेक भागात त्याचे दुर्भिक्षच आहे. काही भागात ते वाया गेले आहे.” ते म्हणाले. खेडुत जे प्रामुख्याने शेतीवर अवलंबूनअसतात, त्यांना उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळत नाही. उन्हाळ्यात ज्यावेळी हिमप्रवाह दूर हिमालयाच्या डोंगरात वितळू लागतात आणि पाणी खाली वाहू लागते तो पर्यंत जमिनी कोरड्या पडलेल्या असतात.

त्यातच वातावरण बदल आणि जागतिक हवामानबदलांच्या समस्येमुळेतर स्थिती अजूनच वाईट झाली आहे. पाण्याच्या टंचाईमुळे येथील लोक शहरांमध्ये रोजगार शोधायला बाहेर पडतात. त्याचा वाईट परिणाम आर्थिक स्थितीवर होतो आणि एकमेकांसोबत नांदणा-या जातीजमातीमधील आधीच विरळ असलेल्या लोकवस्ती कमी होत जाते. या प्रश्नावर मार्ग काढताना चेविंग यांनी १९८७मध्ये पाण्याचे प्रवाह नेहमीच्या माहितीमधील वृक्षांच्या मदतीने कसे वाहते राहतील यासाठी काम सुरू केले. त्यातून या भागात पाण्याचे पाट वाहते करण्यात आले. चेवांग यांच्या लक्षात आले की, हळुहळू पाण्याचे प्रवाह खो-यात नेता येतात, जे पाणी गोठल्या स्वरुपात अनेक वर्ष राहू शकते त्यातून कृत्रिम होमप्रवाह तयार केले जाऊ शकतात.

“शुध्द स्वरुपात पाणी साठे तयार करण्याची ही सोपी आणि नेटकी पध्दत होती, माझ्या लक्षात आले की पाणी कालव्यातून गोठत नाही. पण लहान लोखंडी नळांमधून गोठते. जर हे नळ धातूचेअसतील आणि अत्यंत पातळअसतील तर ते उष्णता देखील लवकर ग्रहण करतात.” लगेच काम सुरू झाले, आणि वेळेत पूर्ण करण्यात आले. चेवांग आणि त्यांच्या सहका-यांनी १२ कृत्रिम प्रवाह या भागात तयार केले. ज्यातून पाण्याचे जमिनीखाली प्रवाह तयार झाले. त्यातून दुर्गम भागात गावात पाण्याचे स्त्रोत सिंचनासाठी तयार झाले.

या कृत्रिम पाण्याच्या प्रवाहांची लांबी पाचशे मिटर ते २ किमी पर्यंत आहे, आणि त्यातून शंभर गावांच्या सिंचनाची सोय झाली आहे. चेवांग ज्यांना २०१५मध्ये पदमश्रीने गौरविण्यात आले आहे. त्यांना या भागात लोक प्रेमाने बर्फमानव किंवा हिमप्रवाह मानव म्हणून ओळखतात, ही ओळख त्यांच्या या विषयातील मोठ्या लढ्याची निदर्शक मानली जाते. पाणी टंचाईच्या समस्येला दूर करण्याच्या त्यांच्या अथक प्रयत्नात चेवांग यांनी केलेल्या कामाच्या सिडीज तयार केल्या आहेत ज्या येत्या काळात तरूण अभियंत्यांच्या कामात मार्गदर्शक ठरतील आणि हिमप्रवाहांचे काम अविरत सुरू ठेवता येईल.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया