ट्रम्प प्रशासनात आणखी एक भारतीय आता उप माध्यम सचीव म्हणून रुजू !

ट्रम्प प्रशासनात आणखी एक भारतीय आता उप माध्यम सचीव म्हणून रुजू !

Saturday September 23, 2017,

2 min Read

यूएसचे (संयुक्त राष्ट्र, अमेरिका) अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी राज शहा यांची त्यांचे मुख्य उप माध्यम सचिव म्हणून व्हाईट हाऊसच्या प्रतिष्ठीत संवाद प्रक्रियेसाठी नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांनी नुकतीच याबाबत शहा यांच्या नव्या नियुक्तीबाबत घोषणा केली, त्यापूर्वी जे उप संवाद संचालक म्हणून कार्यरत होते. या शिवाय ते अध्यक्षांचे उपसहायक म्हणूनही काम पाहतील.


image


शहा यांची नवी भूमिका हा नव्याने करण्यात आलेल्या माध्यम आणि संवाद प्रक्रियेतील फेरबदलांचा भाग आहे. ज्यामध्ये संवाद प्रक्रियेत गेल्या आठ महिन्यातील ट्वीटर वरील सक्रीय ट्रम्प यांनी महत्वाचे बदल आणि नियुक्त्या केल्याचे मानले जात आहे. त्यासोबतच ट्रम्प यांनी हे देखील जाहीर केले आहे की, होप हिक्स या त्यांच्या कायमस्वरूपी संवाद संचालक म्हणून काम पाहतील. मागील महिन्यात ऍन्थोनी स्कारामुक्की यांनी केवळ दहा दिवसांत हे पद सोडून गेल्यापासून त्याच त्यांचे कामकाज पहात होत्या.

राजकीय संशोधन आणि व्यूहनिती संवाद यामधील तज्ञ असलेले शहा यांनी ट्रम्प यांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवड प्रक्रीयेत मदत केली होती. त्यांच्या प्रयत्नातूनच ट्रम्प यांच्या लोकशाहीमधील प्रतिस्पर्धी असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या राजकीय स्थानाबाबत आणि वादग्रस्त कारकिर्द जसे की, खाजगी ई-मेल सर्व्हर वापरणे इत्यादी मुदयाबाबत, जो नंतर निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा झाला होता, संवाद आणि प्रचाराचे वादळ उठले होते. व्हाईट हाऊस मध्ये येण्यापूर्वी शहा संशोधन संचालक म्हणून रिपब्लिकन राष्ट्रीय समिती मध्ये आणि अमेरिका रायझींग या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते, जेथे प्रतिस्पर्ध्यांबाबत संशोधन करून डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले जात असते.

रेइन्स प्रिइबस ज्यांनी रिपब्लिकन राष्ट्रीय समितीचे नेतृत्व केले आहे, त्यांनी शहा यांना व्हाईट हाऊस येथे आणले ज्यावेळी ते ट्रम्प यांच्या आस्थापना चे प्रमूख होते. शहा यांची केवळ व्हाईट हाऊस मध्ये नियुक्तीच करण्यात आली नाही तर प्रिइबस यांच्या पश्चात त्यांची महत्वाच्या पदांवर नियुक्ती देखील करण्यात आली जी ट्रम्प आणि जॉन यांनी केली ज्यांनी ही जबाबदारी यापूर्वी प्रिइबस यांना दिली होती.

त्यांच्या मार्मिक शेरेबाजीने आणि ट्वीटस् मुळे, ट्रम्प यांना वादंग आणि परस्पर विसंगती उभ्या करता आल्या, ज्यात त्यांच्या संवाद आस्थापनेला सतत सज्ज राहावे लागले, अगदी व्हाईट हाऊसच्या कर्मचा-यांना खाजगीत आणि सार्वजनिक ठिकाणी देखील भंडावून सोडले, ज्यात ते अध्यक्षीय संभाषणात गुरफटले गेले. हिक्स यांचे आणखी एक उत्तराधिकारी मायकेल दुबक या पदावर केवळ तीन महिने तग धरू शकले होते.

माध्यमातील आधारस्तंभ म्हणून माध्यम सचीव सिएन स्पाइसर, ज्यांना बोलभांड आणि बेधडक असलेल्या ट्रम्प यांचे प्रवक्ता ही खडतर कामगिरी होती, त्यांनी देखील केवळ सहाच महिन्यात हे काम थांबविले होते. त्यावेळी ते संवाद संचालक पदाचा कार्यभार देखील सांभाळत होते. शहा त्यावेळी सराह हक्काबी सॅन्डर्स यांच्यासोबत काम करत होते ज्या स्पाइसर यांच्या उत्तराधिकारी होत्या.