'बेस्ट कॉलेज गोईंग बिजनेसमन'ची यशोगाथा

'बेस्ट कॉलेज गोईंग बिजनेसमन'ची यशोगाथा

Monday November 30, 2015,

2 min Read

स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचं वय काय असावं असं कुणी जर विचारलं तर मुंबईचा यश चंदिरामानी म्हणेल की १८ वर्षे. थोडसं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. कारण १८ व्या वर्षी त्याला 'बेस्ट कॉलेज गोईंग बिजनेसमन' पारितोषिक जाहिर झालं. १८ व्या वर्षी त्यानं स्वत:ची कंपनी सुरु केली. यश हा इलेक्ट्रॉनिक इंजिनियरींग करत होता. पण तिथं त्याचं मन लागलं नाही. मग बीएमस सुरु केलं. त्याचवेळी मिळणाऱ्या पॉकेटमनीतून त्यानं 'व्हाईट नाईट मार्केटींग' कंपनी सुरु केली. ही कंपनी आता चांगला व्यवसाय करत आहे. या कंपनीसाठीच त्याला हा पुरस्कार जाहीर झालाय. मार्केटींग कंपनी स्थिरावली आहे हे लक्षात आल्यानंतर त्यानं 'गो पांडा' हे रेस्टॉरंट सुरु केलंय. त्याच्या शाखांचा आता अधिकाधिक विस्तार होतो आहे. पण तो इथंच थांबला नाही त्यानं डिजीटल मिडिया कंपनी देखील सुरु केलीय. आपल्या दोन्ही कंपनीतून येणारा पैसा तो आपल्या रेस्टॉरंट उद्योगामध्ये लावतोय.

image


यशच्या घरी आधीपासूनच व्यावसायिक वातावरण होतं. त्यामुळं नोकरी करायची नाही हे आधीपासूनच ठरलेलं. पण त्याचबरोबर उद्योगक्षेत्रात स्वत:चे नाव करण्याचाही ध्यास होता. तो चांगला बास्केटबॉलपटू आहे. राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा त्यांनं गाजवल्यात. यामुळंच की काय त्यानं 'नेवर स्टॉप प्लेईंग' ही संस्था सुरु केली. या संस्थेमार्फेत गरीब मुलांना खेळांचं सामान दिलं जातं. शिवाय त्यांना प्रशिक्षक उपलब्ध करुन दिले जातात. यश सांगतो “ मी स्वत: खेळाडू आहे. अनेकांना खेळावसं वाटतं. पण आर्थिक परिस्थितीमुळं अशा मुलांना पुढे जाता येत नाही. आम्ही या मुलांना मदत करतोय.”

image


यश सध्या लॉ'चा अभ्यास करतोय. सध्या गो पांडाचा देशभर विस्तार करण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. शिवाय इंडियन फूड रेस्टॉरंट सुरु करण्याचा त्याचा मानस आहे. यश म्हणतो माझे जे काही बरे वाईट दिवस होते. माझं कुटुंब माझ्या पाठी उभे राहीलं. त्यामुळं मला मानसिक आणि आर्थिक दोन्ही आधार मिळाला. आता माझ्या व्यवसायात अनेक लोक काम करतात. त्यांना एकत्रित बांधून ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. माझी कंपनी माझं घरंच आहे. आणि हे सर्व माझा परिवार. हेच माझ्या यशाचे खरे भागीदार आहेत.