ऐका, बोलण्यास असमर्थ असलेल्या मुलांचा "आवाज"

ऐका, बोलण्यास असमर्थ असलेल्या मुलांचा "आवाज"

Friday December 25, 2015,

3 min Read

आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराने जगात एक नवीन क्रांती आली आहे व स्मार्टफोन आणि टॅबलेट च्या प्रयोगाने याला अजून मनोरंजक बनविले आहे. वेगवेगळे शारिरीक व्यंग आणि लकवाग्रस्त मुलांना शिकवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा आणि अॅप्लिकेशनच्या वापराने आपण नवयुगाकडे वाटचाल करीत आहोत. ज्या मुलांना बोलण्यासाठी त्रास होतो आणि छोट्या-छोट्या गोष्टी समजण्यासाठी बराचवेळ लागतो, आता त्यांच्या समस्येचे समाधान झाले आहे. एका चित्रावर आधारित सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन ‘आवाज’ ने त्यांचे आयुष्य बदलले आहे.


image


२५ स्पीच थेरपिस्ट आणि ३०० लकवाग्रस्त मुलांना बरोबर काम करून चेन्नई च्या इनव्हेन्शन टीमने असे टॅबलेट सॉफ्टवेअर ‘आवाज’ चा शोध लावला आहे ज्याच्या मदतीने ही मुले आपल्या शब्दांना चित्रामध्ये बदलून आपल्या मनातले भाव सांगू शकतात. ‘आवाज’ चित्र आणि उत्तम दर्जाचे व्हॉईस सिंथेसिस (आवाजाचे संश्लेषण) च्या मदतीने संदेश बनवून भाषेला अजून उत्तम बनवितो.

याचे पूर्ण श्रेय इनव्हेन्शन लॅब्सचे संस्थापक अजित नारायण यांना जाते. अजित नारायण हे पहिले प्रसिद्ध अमेरिकन मेगा ट्रेडर्स कंपनी मध्ये नोकरी करीत होते आणि सन २००७ मध्ये त्यांनी आपली कंपनी सुरु केली. आयआयटी चेन्नई चे पदवीधर अजित यांनी सन २००९ मध्ये मुक्या लोकांच्या सहाय्यासाठी हे संवाद उपकरण बनविण्याच्या दिशेने आपले पाऊल टाकले. यानंतर त्यांनी आपली दिशा बदलून टॅबलेट आणि स्मार्टफोन च्या सॉफ्टवेअर मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले.


image


अजित नारायण सांगतात की, ‘आयपॅड आणि अॅन्ड्राॅइड आधारित टॅबलेट सारख्या उपकरणाने विशिष्ट गरज असलेल्या मुलांच्या संवाद प्रक्रियेमध्ये क्रांतिकारी परिवर्तन आणले आहे. ते सांगतात की, ‘हे उत्पादन चित्र आणि हातांच्या संकेताद्वारे एक दुसऱ्यांशी बोलण्यास मुलांना मदत करते. ते वेगवेगळे चित्र घेतात आणि त्यांना क्रमबद्ध करतात, मग हे क्रम वाक्यात बदलून ते त्याला वाचू शकतात’.

यामध्ये ‘आवाज’ तीन श्रेणीच्या शोधावर शब्दकोश ऑफर करतो ज्यात मूळ आणि अतिरिक्त शब्द भिन्न संख्येमध्ये एकत्रित केले आहे. भारताव्यतिरिक्त इनव्हेन्शन लॅब आता युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या विकसित देशांच्या बाजारात सॉफ्टवेअर अनुप्रयोगसाठी विकते. अजित यांचा दावा आहे की डेन्मार्क आणि इटली मध्ये ‘आवाज’ हेच एकमात्र लकवाग्रस्त मुलांसाठी उपलब्ध अॅप्लिकेशन आहे. याच्या वापरणे पालक तसेच मुलांच्या जीवनात खूप सुधारणा आहे.

अजित पुढे सांगतात की, ‘लकवाग्रस्त मुले तसेच ऐकण्यासाठी असमर्थ असलेली मुले स्वतःला व्यस्त करण्यासाठी खूप मुश्किलीचा सामना करतात. पण त्यांचे पालक, नातेवाईक तसेच विशेष शाळेतील शिक्षक या संकेताद्वारे त्यांच्या व्यक्त होणाऱ्या भावनांना समजू शकतात, हे उपकरण या समस्येच्या निवारण्यासाठी खूप उपयोगी आहे.’

या कामासाठी अजित यांना २०११ मध्ये एमआयटी टेक्नॉलॉजी च्या नवीन आविष्कारांच्या वैश्विक सूची साठी नामांकित केले आहे. याशिवाय त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून अपंगांच्या सबलीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

‘आवाज’ मुख्यता दोन घटक म्हणजे सिंथेसायझर आणि त्यांच्या सहाय्यतेने संचालित होणाऱ्या लेखी अंदाजानुसार सॉफ्टवेअरला मिळून तयार केले आहे. स्पीच सिंथेसायझरला भिन्न क्षमतेच्या असक्षम मुलांसाठी तयार केले आहे. यामध्ये एक ७ इंचाची टचस्क्रीन एलसीडी, व्हाईस ऑउटपुटसाठी स्पीकर आणि ऑडीओ संकेतासाठी ऑडीओ जॅक, युएसबी पोर्ट, मोनो जॅक पोर्ट, रिचार्जेबल बॅटरीच्या व्यतिरिक्त, पाय असलेल्या खुर्चीवर लावण्याचा पर्याय पण उपलब्ध आहे. लेखी अंदाज सॉफ्टवेअर असक्षम मुलांना वाक्य बनविण्यासाठी आणि तसेच दुसऱ्यांना समजाविण्यासाठी मदत करतात. ‘आवाज’ मध्ये स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून वाक्य तयार केले जातात. हेच अॅप्लिकेशन वर्तमानात इंग्रजी भाषेत जवळजवळ १०००० शब्दांचे सामर्थ्य ठेवते. याशिवाय यात मुलांच्या सोयीसाठी त्यांच्यानुसार अनेक शब्द जोडू शकतो. याप्रकारे ‘आवाज’ त्या मुलांचा आवाज बनण्यास यशस्वी झाले आहे जे आजपर्यंत आपल्या मनातील तसेच डोक्यात चालणाऱ्या विचारांना स्पीच सिंथेसायझर च्या मदतीने दुसऱ्यांच्यासमोर व्यक्त करू शकतात.

असक्षम मुलांचे पालक आणि त्यांचे शुभचिंतक या अॅपला फक्त ९.९९ डॉलर (५०००रुपये) दरमहिन्याला खर्च करून याचा प्रयोग करू शकतात. याच्या खरेदी अगोदर ते त्याच्या परीक्षणासाठी एक आठवडा याचा मोफत प्रयोग करू शकतात.

सध्यातरी "आवाज" इंग्रजी आणि सहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे पण त्याला अधिक भाषांमध्ये आणण्याच्या योजनेवर काम चालू आहे.

लेखक : निशांत गोयल

अनुवाद : किरण ठाकरे