संयुक्त राष्ट्रानी ममता बॅनर्जी यांना कन्याश्री प्रकल्पासाठी गौरविले!

0

संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या सर्वोच्च लोकसेवेच्या कार्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ‘कन्याश्री प्रकल्पा’ला सन्मानीत केले आहे. सन २०११मध्ये सुरू केलेल्या कन्याश्री प्रकल्पामध्ये अटींच्या आधीन राहून मुलींच्या शिक्षणासाठी तसेच सक्षमीकरणासाठी आर्थिक मदत केली जाते.

हा पुरस्कार पश्चिम बंगालच्या जनतेला आणि देशाला अर्पण करताना त्या म्हणाल्या की, “ आमच्या देशवासीयांच्या वतीने आम्ही आनंद व्यक्त करतो, आणि संयुक्त राष्ट्रांच्या लोक सेवादिनी पश्चिम बंगालला पहिला पुरस्कार मिळाला. कन्याश्री ला संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कार मिळाला हा खूप मोठा सन्मान आणि परिचय आहे.”

कन्याश्रीची निवड ६२ देशांच्या सामाजिकता विभागातील योजनांमधून करण्यात आली. बॅनर्जी यांनी हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रांचे सहायक सरचिटणीस यांच्या हस्ते जागतिक संस्थेच्या व्यासपिठावर हेग येथे जावून स्विकारला, जेथे हा समारंभ झाला.

चार लाखपेक्षा जास्त अवलंबीत मुलींची नोंद या योजनेत करण्यात आली आहे, जी १६ हजार संस्थाच्या आणि शाळाच्या समन्वयातून चालविली जाते ज्या पश्चिम बंगाल मध्ये आहेत. कन्याश्री प्रकल्पाने हा पुरस्कार पटकावून हेच सिध्द केले आहे की, गरीब आणि वंचीत घटकांपर्यत देखील शिक्षण पोहोचविता येते, जे लोकसंख्येचा एक भाग आहेत.