प्रवास: लडाखचा एक खडतर जीवनानुभव

अक्षरश: रक्त गोठवणारी थंडी, प्रवासासाठी अतिशय कठीण असा प्रदेश, पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही आणि टप्प्याटप्प्यावर आत्मविश्वास घालवणारी स्थिती अशा अवस्थेत तुम्ही आपली बाईक घेऊन हजारो किलो मीटरच्या प्रवासासाठी निघाल का ? या प्रश्नाचं नैसर्गिक उत्तर नाही असच असंच असणार यात शंकाच नाही. पण या प्रश्नाचं सकारात्मक ‘होय’ असं उत्तर देणारे दोन धाडसी तरूण आपल्यात आहेत असं सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल ? …. पण विश्वास ठेवावाच लागेल. कशाचीही पर्वा न करता या धाडसी मोहिमेवर निघालेल्या या दोन तरूणांची नावं आहेत गौरव जानी आणि पी. टी. गिरिधर राव. भारतातल्या लडाख या प्रवासासाठी कठीण असलेल्या प्रदेशात या दोघांनी भटकंती केली. यांनी नुसताच प्रवास केला नाही, तर जिथं बाहेरचं कुणी जाऊ इच्छित नाही अशा ठिकाणी हे दोघे गेले, तिथल्या लोकांची दुख जाणून घेतली आणि त्यांचा जीवनावर आधारित माहितीपट आणि चित्रपट जगासमोर मांडले. त्यांच्या माहितीपटांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. म्हणूनच हा प्रवास जितका खडतर तितकाच महान आणि प्रेरणादायी असाच आहे.

0

गौरव जानी आणि पी. टी. गिरीधर राव ही दोन अतिशय उत्साही आणि धाडशी प्रवाशी आहेत. या प्रवाशांनी सन 2006 मध्ये डर्ट ट्रॅक प्रोडक्शनची स्थापना केली.

"हम होंगे कामयाब एक दिन!"
"हम होंगे कामयाब एक दिन!"

सर्वसामान्यांनी कधीही पाहिलेली नाही अशा भारतातल्या विस्तीर्ण भूप्रदेशावर प्रवास करण्याबाबत या दोन तरूणांनी विचार करणं सुरू केलं. भारताच्या या भूमीत प्रवास आणि संशोधनाच्या दृष्टीनं चांगली क्षमता असल्याची जाणीव या दोघांना झाली. म्हणूनच जगापासून अतिशय दूर असलेल्या या प्रदेशात जाऊन त्याला वेढलेल्या रहस्यांचा उलगडा करावा, आणि त्याबरोबर या आश्चर्यकारक प्रवासाच्या वृतांताचा दस्तावेज तयार करावा अशा उद्देशानं ते प्रवासाला निघाले सुद्धा. डर्ट ट्रॅक प्रोडक्शननं ‘रायडिंग सोलो टू द टॉप ऑफ द वर्ल्ड’ या आपल्या पहिल्या माहितीपटाची निर्मिती केली. या माहितीपटाच्या माध्यमातून दर्शकांना मुंबई ते लडाखचे चंगठंग पठार असा गौरव जानीनं एकट्यानं केलेला प्रवास अनुभवता आला.

गौरव जानीचा हा प्रवास कष्ट आणि सफलता अशा दोन्ही रंगानं भरलेला होता. गौरवला प्रवासादरम्यान भेटलेल्या लोकांनी अधिक प्रभावीत केले. त्यांचा नुकताच निर्माण झालेला चित्रपट त्याच अनुभवांवर आधारलेला आहे. डर्ट ट्रॅक प्रोडक्शऩला रायडिंग सोलो टू द टॉप ऑफ द वर्ल्डनं आत्तापर्यंत माहितीपटांसाठी देण्यात येणारा देशातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारासह, विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 11 पुरस्कार मिळवून दिले.

त्यांच्या या यशानं त्यांना दुसरी फिल्म बनवण्याची प्रेरणा मिळाली. हिमाचल प्रदेश आणि हिमालय परिसरात गौरवसह चार उत्साही मोटरसायकल प्रवाशांनी कसा प्रवास केला आणि त्यांनी अदभूत यश कसं मिळवलं यावर त्यांची ही नवी फिल्म आधारलेली आहे. आणि त्या नव्या फिल्मचं नाव आहे ‘वन क्रेझी राईड’. ज्या ठिकाणी पुढं जाण्यासाठी मार्गच नव्हता अशा खडतर प्रदेशात या धाडसी प्रवाशांनी अक्षरश: नवा मार्ग शोधून आणि तयार करून ते पुढं पुढं जात राहिले.

या प्रवासादरम्यान आसपासचं अद्भूत सौंदर्य आणि सोबत या प्रवाशांचा उत्साह आपल्याला अगदी जवळून अनुभवता यावा म्हणून या शूरवीरांच्या मोटरसाकलच्या समोरच्या भागावर कॅमेरा बसवला होता. हा कॅमेरा जेव्हा डळवळीत आणि कमकुवत लाकडी पुलावरचा भयभीत करणारा प्रवास दाखवायला सुरूवात करतो, तो ट्रेलरचा शेवटचा 30 सेकंदांचा भाग तुम्ही बघितलाच पाहिजे असा आहे. हा भाग नुसता बघण्यासारखाच नाही, तर अनुभवावा असा आहे. या फिल्मनं 14 वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये 3 पुरस्कार पटकावले.

डर्ट ट्रॅक प्रोडक्शनची नंतरची फिल्म 2013 मध्ये प्रदर्शित झाली. ‘रायडिंग सोलो टू द टॉप ऑफ द वर्ल्ड’ या प्रवासाचं चित्रिकरण करताना गौरवनं लडाखमधल्या ज्या गावाला भेट दिली होती त्या गावात ‘मोटरसायकल चँग पा’ हा चित्रपट आपल्याला परत घेऊन येतो. गौरवची त्या गावात परतण्यामागची प्रेरणा केवळ त्या गावात त्याला भेटलेल्या लोकांनी त्याला प्रभावीत केलं ही नव्हतीच. किंवा आपल्य़ाला प्रभावित केलेल्या लोकांना पुन्हा भेटण्याच्या त्याला तीव्र इच्छा झाली, आणि या इच्छाशक्तीनं त्याला परत जाण्यासाठी प्रेरीत केलं असंही नाही. तर जगाच्या त्या विशिष्ट भागातले लोक आजही कशाप्रकारचं जीवन जगतात याबाबत सखोलपणे समजून घेण्याच्या हेतूनं त्याला त्या गावात परत जाण्याची प्रेरणा झाली होती.

डर्ट ट्रॅक प्रोडक्शन मार्केटिंगच्या वुमन फ्रायडेच्या प्रमुख दीपा वर्णन करताना म्हणतात, “ संपूर्ण ऋतुचक्राचा अनुभव घेण्यासाठी आणि सोबत भटक्यांची जीवनशैली पाहण्यासाठी मुंबई ते ल़डाख दरम्यान एक वर्ष केलेल्या प्रवासावर आधारलेला हा चित्रपट आहे ” “ माणसाच्या दृष्टीनं जगण्यासाठी जी सर्वात जास्त भयंकर स्थिती असते अशा स्थितीत जे लोक जगतात आणि तीच स्थिती ते आपल्या जगण्यासाठी निवडतात अशा विलक्षण लोकांचं जीवन, त्याची जीवनशैली आम्हाला जगासमोर आणायची होती.”  

आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच गौरवनं उन्हाळ्यामध्ये त्या गावाला भेट दिली. लडाखमध्ये उन्हाळा हा तुलनेनं आल्हाददायक असतो. परंतु पुढची सहा महिने, लडाखमधली गावं मोठ्या आणि कडक हिवाळ्यामुळं सोईसुविधांपासून आणि इतर गावांच्या संपर्कापासून विभक्त होतात. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे जिथे जिथे राहण्याची स्थिती सर्वात कठीण होते अशा जगभरातल्या खडतर ठिकाणांच्या यादीत लडाखचा समावेश होतो.

हिवाळ्याच्या दिवसात लडाखचं तापमान -40 अंश सेल्सियस इतकं सुद्धा खाली घसरू शकतं.

“ हा अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे, ” दीपा म्हणाल्या. “ कोणत्याही मदती शिवाय, कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय, तुमच्या सोबत, आसपास कुणीही नसताना, -40 अंश तापमानात, आपण एकट्याच्या बळावर राहणं........ मला वाटत नाही की, आम्ही आमच्या आयुष्यात यापेक्षा कोणती मोठी गोष्ट केली असेल.”

चित्रपटात कधीही न पाहिलेल्या भागाला कॅमे-यात बंदिस्त करून ‘मोटरसायकल चँग पी’ ला चित्रपटप्रेमींना काहीतरी आवाहन करायचं होतं असं दिसतं. अँक्शन, इमोशन आणि शारीरिक संघर्षानं भरलेल्या अशा अतिशय खराब, धोकादायक वातावरणात आणि निराशाजनक स्थितीत गौरवनं हा खडतर प्रवास केला होता.

अर्थात, व्यापक आवाहनाचा हा भाग हा या प्रवासाचा एक असा पैलू होता जो गौरवसाठी आणि त्या चित्रपटावर काम करणारांसाठीही अतिशय ठळक असा डोळ्यात भरणारा होता. म्हणजेच तो त्यांच्या परस्पर संबंधांचा पैलू होता. गौरवनं ‘मोटरसायकल चँग पा’ हा चित्रपट चित्रीत करताना ज्यांच्याशी संवाद साधला त्या उल्लेखनीय लोकांचा प्रभाव त्याच्यावर पडला यात काही संशय नाही. यामुळं त्याला ती जीवनशैली आठवली. आज जरी ती जीवनशैली कालबाह्य झालेली असली तरी ती आजही प्रचलित आहे आणि अनेक अंगानं ती आजही अर्थपूर्ण आहे.

'तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची! '
'तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची! '

“ शहरातलं जीवन खूप कठीण आहे आणि हे सगळे ताणतणाव लक्षात घेता आपल्या वाट्याला सर्वात कठीण काळ आलेला आहे असं लोकांना वाटतं.” दीपा पुढं म्हणतात, “ पण भटके लोक अतिशय खडतर आयुष्य जगत असतात आणि ते त्या कठीण आयुष्याचा जराही देखावा करत नाहीत. त्यांच्यासाठी ते केवळ एक वास्तव असतं, आणि ते जसं जगतात त्याचा त्यांना अभिमानही आहे. ती एक अतिशय सुलभ जीवनशैली आहे, आपल्या शहरी जीवनशैलीतलं त्यात तसुभरही काही नाही.”

चित्रपटाच्या माध्यमातून का होईना , पण या लोकांचं जीवन लोकांसमोर गेल्यानंतर दर्शकांना नक्कीच प्रभावित करतं हे खात्रीनं सांगता येतं. आपण कल्पना करू शकतो की या लोकांच खडतर जीवन पाहिल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट नक्कीच आपल्या हाती लागते आणि ती म्हणजे आपल्या स्वत:च्या जीवनाबाबत आपलं व्यक्तिगत मत किंवा परिक्षण, आपल्या सर्वच गोष्टीं गृहीत धरण्याच्या बाबतीत आपल्याला असलेलं मोठं कौतुक आणि या लोकांच्या खडतर जीवनाच्या तुलनेत आपल्या दररोजच्या तक्रारी किती शुल्लक आहेत याबाबतचा दृष्टीकोन. सध्या ‘मोटारसायकल चँग पा’ हा चित्रपट पोस्ट प्रोडक्शनच्या टप्प्यात आहे आणि डर्ट ट्रॅक प्रोडक्शनच्या टीमने लोकांसमोर जावं या उद्देशानं जगभरातल्या चित्रपट महोत्सवात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे.

आपला चित्रपट डिस्कव्हरी सारख्या टीव्ही चॅनेलवर दिसावा म्हणून डर्ट ट्रॅक प्रोडक्शन प्रदर्शनाचा परवाना मिळवणार आहे. शिवाय हा चित्रपट आयट्यूनवर प्रदर्शित करणार आहे. इथं त्यांचे दोन चित्रपटही विकता येऊ शकतात. “ आपण जे पूर्वी कधीच पाहू शकलेलो नाही असं काही अनुभवण्यासाठी लोकांनी हा चित्रपट बघितला पाहिजे असं वाटतं, ” दीपा म्हणाल्या. “ हा एक पूर्णपणे वेगळा असा अनुभव असेल. आणि तुम्ही जर प्रवाशी किंवा मोटरसायकलिस्ट असाल तर हा चित्रपट वास्तवात त्या ठिकाणी तुम्ही न जाताही तुम्हाला तिथे घेऊन जाईल तुम्ही तिथे गेला आहात असा जीवंत अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. किंवा तुम्हाला त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशी भावना नक्कीच जागी करेल. या चित्रपटाची जादू ही अशी आहे. ही तुमच्यासाठी एक व्हिजुअल ट्रीटच असेल.” ‘मोटरसायकल चँग पा’ संदर्भात अप टू डेट राहण्यासाठी डर्ट ट्रॅक प्रोडक्शनला भेट द्या आणि जवळपास कुठे एखाद्या चित्रपटगृहात तो बघायला मिळतो का ते पहा.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe