देशातील पहिल्या नेत्रहीन सनदी अधिका-याच्या लेखणीतून साकारला इतिहास ‘आय पुटिंग दि आय इन आयएएस '!

देशातील पहिल्या नेत्रहीन सनदी अधिका-याच्या लेखणीतून साकारला इतिहास ‘आय पुटिंग दि आय इन आयएएस '!

Monday October 24, 2016,

3 min Read

नेत्रहिनता त्यांच्यासाठी उणिव न ठरता प्रेरणाच ठरली. राजेश सिंह यांनी प्रदीर्घ संघर्ष केला आणि त्यात यशही मिळवले आणि त्यांच्या सारख्या हजारो नेत्रहिनांसाठीच नाही तर दृष्टी असलेल्यांचेही प्रेरणास्थान बनले. याचसाठी त्यांनी पुस्तक लिहिले ‘आय पुटिंग दि आय इन आयएएस’

आय पुटींग. . . . दृष्टीहिनतेच्या आव्हानाला यशस्वीपणे मात करणा-या पहिल्या अंध सनदी अधिका-याची संघर्षगाथा आहे. हे जरी लेख काच्या स्वत:च्या अनुभवावरील पुस्तक असले तरी ते एखाद्या आत्मचरित्रापेक्षा जास्त त्यांच्या जीवनाच्या संघर्षांच्या कथेला प्रतिबिंबीत करणारी कथा आहे.

image


राजेश यांची सन २०११मध्ये आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. ते पटणा जिल्ह्यातील ज्या धनरुआ गावातले आहेत ते गाव वेगळ्या प्रकारच्या लाडूंसाठी प्रसिध्दआहे. लहानपणी क्रिकेट खेळताना त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली.असे असले तरी त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि युपीएसीची परिक्षा उत्तिर्ण झाले. परंतू नेत्रहिन असल्याचे सांगत सरकारने त्यांच्या नियुक्तीला विरोध केला.

राजेशसिंह यांच्या मते त्यांची भेट तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांच्या कन्या डॉ.उपेंद्रसिंह यांच्याशी झाली ज्यावेळी त्या सेंट स्टिफन्स महाविद्यालयात शिकवत होत्या. मग त्यांनी राजेश सिंह यांना पंतप्रधानांची भेट घालून दिली. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले तात्कालिन मुख्य न्यायाधिश अल्तमस कबीर आणि आभिजीत पटनायक यांच्या खंडपिठाने सरकारला त्यांच्या नियुक्तीचा आदेश दिला. झारखंड केडरचे आयएएस राजेश सिंह यांना भारत सरकारने प्रथम नियुक्ती आसाममध्ये दिली. भाषेच्या अडचणीमुळे त्यांनी बदलीची मागणी केली. त्यानंतर त्यांची स्थायी स्वरुपात झारखंडमध्येच नियुक्ती केली गेली. आत ते त्यांच्या नोकरीमध्ये दिव्यांगासाठीच्या योजना तयार करण्याच्या कामी लागले आहेत. त्यांच्यावर तयार केल्या जाणा-या माहितीपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, झारखंडचे मुख्यमंत्री रघुविर दास, आणि मुख्य सचिव राजबाला वर्माण्याच्या देखील दिव्यांगाना संदेश देताना दिसतील.

image


राजेशसिंह यांना आयएएस होणे सोपे नव्हते. २००६ मध्ये जेंव्हा त्यांनी नागरी परिक्षा उत्तिर्ण केली त्यावेळी ती परिक्षाच नव्हती तर त्यांच्यासाठी मोठी लढाई होती जी त्यांनी जिंकली. ते पहिलेच दृष्टीहीन सनदी अधिकारी नियुक्त झाले. त्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत झगडावे लागले.

राजेश सांगतात की, “ सुरुवातीला सा-या व्यवस्थेला राजी करण्याचे कठीण आव्हान होते. एका पूर्णत: अंध व्यक्तीला भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून परिक्षा देणे कठीण होते. लोक आडकाठी करत होते. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने जेंव्हा निर्णय दिला सांगितले की, दृष्टीकोन आणि नेत्रदृष्टी यात फरक आहे. न्यायालयाने सांगितले की,आयएएस होण्यासाठी दृष्टीकोन हवा दृष्टी नव्हे.”

image


राजेश सिंह यांनी हे पुस्तक आपल्या प्रोबेशनच्या काळात लिहिले आहे. मागच्या फेब्रुवारी महिन्यात लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्याचे प्रकाशन केले. पटना मधील एका अशा तरुणाची कहाणी ज्याला दृष्टी नसल्याने जगण्याचे आव्हान होते. तरीही त्याने सनदी अधिकारी होण्यासाठी संघर्ष केला आणि यश मिळवले.

सुमित्रा महाजन यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी म्हटले होते की, “ दिव्यांग आणि शारिरीकदृष्ट्या कमजोर वर्गातून येणा-या वर्गाची रचनात्मकता, क्षमता आणि कौशल्य व्यर्थ जाता कामा नये. आम्हाला अशा बहुसंख्य समाजात या क्षेत्रातून येणा-यांच्या प्रतिभेची संवेदनशिलपणे दखल घेतली पाहिजे.” राजेशसिंह झारखंड सरकार मध्ये महिला आणि बालकल्याण तसेच सामाजिक सुरक्षा विभागात संयुक्त सचीव आहेत. ते एकात्मिक बाल सुरक्षा योजनेचे संचालक देखील आहेत.

राजेश सांगतात की, “ खरे आव्हान नागरी परिक्षेची तयारी करणे हे नव्हतेच, तर परिक्षेनंतर सहमती करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणे हेच होते. मी भाग्यवान होतो कारण माझे अनेक मित्र माझ्यासोबत होते. अनेक कायदेशीर अडचणी मला पार कराव्या लागल्या. ही चांगल्या किंवा वाईट लोकांची गोष्ट नाही परंतू हे समजण्यासारखे आहे की, दृष्टीहीन लोकांना अपरिहार्य राष्ट्रीय संपत्ती म्हणून कश्याप्रकारे वागवले जाते”.

दिल्ली विद्यापीठातून स्नातक आणि जेएनयुमधून स्नातकोत्तर पदवी मिळवणारे राजेश सिंह कनिष्ठ व्यापार संशोधन फेलो देखील झाले आहेत. त्यांच्या मते जेएनयु ही आपल्या विचार आणि विचारधारांची मोठी प्रयोगशाळा आहे. मात्र देशविरोधी तत्वांना येथे थारा देता कामा नये. जेएनयु खूप चांगली जागा आहे, तरीही येथे कुणी देशविरोधी घोषणा येथे दिल्या तर मी त्यांचा विरोध करतो. मी हे बेधडकपणे सांगू इच्छितो की, जेएनयूने मला खूप काही दिले आहे इथेच मला माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली आणि दृष्टीकोन मिळाला इथे ज्या प्रकारची समानता पहायला मिळते तशी देशात कुठेही नाही.” 

लेखक - एफ एम सलीम

    Share on
    close