दोघी गृहिणींच्या घरच्या् जेवणाने कॉर्पोरेटस् जगात मिळवली मान्यता!

0

घरच्या जेवणाचे महत्व तोच जाणू शकतो, जो सर्वात जास्त घरापासून दुरावलेला असतो. हॉटेल्स आणि कॅंटिनचे जेवण कितीही रूचकर लागत असले तरी, त्यात तो स्वाद नसतो जो घरच्या अन्नात असतो. तसेच बाहेरील जेवण तुम्हाला रोज खाणे देखील अशक्य असते. कारण स्वास्थ्याच्या दृष्टिने ते अन्न अजिबात चांगले नसते. अशातच घरापासून लांब राहणा-या नोकरदार वर्गांलाअनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कारण आजकालचे जीवनमान देखील खूप व्यस्त झाले आहे. त्यामुळे एकटे राहणा-या लोकांना स्वत: जेवण बनविणे शक्य नसते. त्यांना दिवसातून दोन वेळा बाहेरून जेवण मागवावेच लागते.

मुन्नी देवी बिहार मधील आरा येथे राहतात. त्यांची दोन्ही मुलं अभ्यासासाठी आणि नोकरीसाठी दिल्लीला आली. मुन्नी देवी यांना नेहमीच आपल्या मुलांच्या स्वास्थ्यासंबंधी चिंता असायची. त्या वर्षातून काही दिवस आपल्या मुलांकडे राहण्यासाठी यायच्या. एकदा जेव्हा त्या दिल्लीला आल्या तेव्हा त्यांची भेट आपल्या मुलाच्या मित्राची पत्नी प्रिती यांच्याशी झाली. कारण, प्रिती या देखील बिहारच्याच राहणा-या होत्या. त्यामुळे दोघींमध्ये चांगलीच मैत्री झाली. त्यावेळी दोघींनी असा विचार केला की, मिळून असे काम करावे, ज्यामुळे घरापासून लांब राहणा-या लोकांना घरचे रुचकर आणि पौष्टिक जेवण देता येईल. त्यानंतर दोघींनी या संदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली आणि लवकरच आपल्या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्याचे ठरविले. मे २०१३ मध्ये या दोघींनी मिळून‘कॉर्पोरेट ढाब्या’चा पाया रचला. ही एक कार्यालयात डबा पोहोचवणारी सेवा आहे, जी दिल्ली एनसीआरमध्ये काम करत आहे.


‘कॉर्पोरेट ढाब्या’चा उद्देश कॉर्पोरेट जगतात नोकरी करणा-या लोकांपर्यंत पौष्टिक आणि रूचकर घरचे जेवण पोहोचविण्याचा होता. कंपनीच्या पहिल्याच दिवशी त्यांना ३८ गिरण्यांमधून जेवणाची मागणी आली, जी खूप जास्त होती. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी स्वत:च जेवण बनविले. मात्र सलग वाढणा-या मागणीमुळे काही लोकांना काम करण्यासाठी ठेवण्यात आले. मुन्नी देवी सांगतात की, आम्ही जेवणाच्या गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही. साधारणत: मागणी जास्त वाढायला लागल्यावर काही लोक खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करतात, जेणेकरून वाढत्या मागणीला पूर्ण करता येऊ शकेल आणि जास्तीत जास्त फायदा देखील उचलता येऊ शकेल. मात्र आम्हाला वाटते की, एखादवेळी फायदा कमी झाला तरी चालेल, परंतु गुणवत्ता टिकून राहिली पाहिजे. मुन्नी देवी म्हणतात की, मी ग्राहकांना आपल्या मुलांप्रमाणेच मानते आणि त्याचप्रकारे आम्ही काम देखील करतो.


दिल्ली एनसीआरमध्ये अनेक असे लोक आहेत, जे लोकांपर्यंत जेवणाचा डबा पोहोचविण्याचे काम करतात. मात्र ते केवळ घरात एकटे राहणा-या लोकांनाच आपली सेवा देतात. मात्र कॉर्पोरेट ढाब्याने आपल्या ग्राहकांची संख्या वाढविली आणि कॉर्पोरेट क्षेत्रात जेवणाचा डबा पोहोचविण्याची सेवा सुरु केली.आज कॉर्पोरेट ढाबा एका दिवसात जवळपास ४००-५०० गिरणी कामगारांपर्यंत आपले जेवण पोहोचवितो आणि अनेकदा ही संख्या ६०० चा पल्ला देखील गाठते. हे लोक नोकरी.कॉम, ट्रूली मैडली, पटेल इंजिनियरिंग, मैगनस, यूनिवर्सल, सॉफ्टवेअर, आर्थकॉन ग्रुप, शिक्षा.कॉम, संचार निगम दिल्ली यांसारख्या कंपन्यांमध्ये आपले जेवण पोहोचवितात.


व्यवसाय वाढण्यासोबतच नव्या भागीदाराच्या रूपात आफशा अजीज हे देखील कंपनीमध्ये नुकतेच सहभागी झाले आहेत. त्याव्यतिरिक्त मुन्नी देवी सांगतात की, त्यांच्याकडे काम करणारे अनेक लोक व्यावसायिक आहेत, ज्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. मोहम्मद ताहिर कंपनीचे वरिष्ठ शेफ आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या देशात खूप वर्षे काम केले आहे. तसेच कंपनी जवळ आज जवळपास २५ व्यावसायिक लोकांचा एक चांगला गट आहे. कंपनी कार्यालयाव्यतिरिक्त कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या घरी देखील जेवण पोहोचवते. हे लोक आता केवळ समूह संपर्काच्या माध्यमामार्फतच स्वत:ची प्रसिद्धी करत आहेत, सोबतच त्यांचे ग्राहक तोंडी प्रचार करून कंपनीची प्रसिद्धी देखील करत आहेत. कंपनी आता दिल्ली एनसीआर मध्ये काम करत आहे. येणाऱ्या काळात हे लोक याच क्षेत्रात आपल्या कामाचा विस्तार करू इच्छितात. कंपनीचे मत आहे की, जर त्यांनी त्यांच्या जेवणाची गुणवत्ता कायम ठेवली तर, लोक स्वत:हून त्यांच्याकडे येतील आणि त्यांना प्रसिद्धी वगैर करण्याची गरजच भासणार नाही.

हा एक खूप मोठा बाजार आहे, जेथे अनेक शक्यता आहेत आणि कंपनीचे लक्ष्य येणा-या काळात गुणवत्तेसोबतच आपल्या ग्राहकांची संख्या वाढविणे देखील आहे.


लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किशोर आपटे