दक्षिण दिल्लीतील हॉटेल्स आणि उपहारगृहातील प्रसाधनगृहे १ एप्रिल पासून लोकांसाठी खुली होतील

दक्षिण दिल्लीतील हॉटेल्स आणि उपहारगृहातील प्रसाधनगृहे १ एप्रिल पासून लोकांसाठी खुली होतील

Monday March 27, 2017,

2 min Read

देशात स्वच्छ भारत अभियानानंतर स्वच्छतेच्या गरजेबाबत जागरूकता निर्माण होताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे दक्षिण दिल्ली महापालिका प्रशासनाने एक अभिनव संकल्पना सुरू केली आहे. एसएडिसीने दिल्लीतील उपहार गृहे आणि हॉटेलातून स्वच्छतागृहे तयार केली असून जी सामान्य लोकांसाठी एक एप्रिलपासून खुली केली जातील.


image


यासाठी हॉटेल्स आणि उपहार गृहे यांना १४ मार्च २०१७ रोजीच आदेश जारी करण्यात आले असून त्यानी स्वच्छतागृहे लोकांना उपलब्ध करून द्यावीत आणि त्यासाठी जास्तीत जास्त पाच रूपये आकारावेत असे सांगण्यात आले आहे. या उपहारगृहांना आणि हॉटेल्सना हे पैसे त्यांच्या देखभाल खर्चासाठी आकारण्यास सांगण्यात आले असून हा निर्णय राज्यपाल लेफ्टनंट जनरल अनिल बैजल यांच्या सूचनेवरून घेण्यात आला आहे. जेणे करून या स्वच्छतागृहांचा वापर साधारण लोकांना करता यावा.

एसएमडिसीचे आयुक्त पुनित गोयल, माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “ हॉटेल आणि उपहारगृहांनी स्वेच्छेने यात सहभागी व्हावे जेणेकरून दिल्ली महापालिका प्रशासनाला त्यांना सक्ति करावी लागू नये”. याबाबत महापालिका अधिकारी म्हणाले की, “ हॉटेल आणि उपहारगृहांनी त्यांच्या दर्शनी भागात याबाबत सूचना देणारे फलक लावावेत, ज्यात लोकांना प्रसाधन गृहाची सुविधा असल्याचे समजेल. या उपहार गृहांच्या व्यवस्थापनाला सूचना देण्यात आल्या आहेत की त्यानी या सेवेसाठी पाच रुपयांपेक्षा जास्त आकार घेवू नयेत. ज्यातून त्यांना या सेवेची देखभाल करता यावी”.

साकेत, शहापूर जाट, आणि हौज खास गावं जी दक्षिण दिल्ली महापालिका प्रशासनाच्या हद्दीत येतात, तेथे या सुविधा देण्यात येत आहेत. यातून लोकांच्या सेवेत किमान ३५०० नव्या स्वच्छतागृहांची भर पडेल, आणि दक्षिण दिल्लीत येणा-यांना दिलास मिळेल की, त्यांना स्वच्छतागृहांची कमतरता भासणार नाही. मागील सप्ताहात राज्यपाल आणि पालिका अधिकारी यांच्या संवादातून ही संकल्पना तयार करण्यात आली. या उपक्रमात हॉटेल चालकांचा आक्षेप अपेक्षित होता. त्याबाबत बोलताना रियाज अलमानी, सीइओ, इम्प्रेसँरियो एंटरटेन्मेंट ऍण्ड हॉस्पिटँलिटी प्रा लि. आणि अध्यक्ष राष्ट्रीय उपहार गृहे संघटना म्हणाले की, “असा नियम लादणे ही जबरदस्ती असेल. हॉटेल्समध्ये आधीच गर्दी असते. त्यात बाहेरच्या लोकांना प्रवेश कसा देणार आणि प्रश्न पैशाचा नसुन सुरक्षेचा आहे”.